Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुधीर मुनगंटीवार यांनी उलघडले राजकीय पत्ते; मंत्रिपद काढून घेतल्याबद्दल स्पष्टच बोलले

भाजपमध्ये मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक बडे नेते नाराज आहेत. संधी न दिल्यामुळे नाराज नेत्यांमध्ये सुधीर मुनगंटीवार यांचे देखील नाव घेतले जात आहे. त्यांनी यावर स्वतः भाष्य केले.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 05, 2025 | 10:44 AM
BJP leader Sudhir Munangtiwar commented on not being given a chance in his cabinet

BJP leader Sudhir Munangtiwar commented on not being given a chance in his cabinet

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण तापले आहे. यंदाची निवडणूक चुरशीची होणार असल्याची शक्यता असताना महायुतीला एकतर्फी यश मिळाले. ऐतिहासिक असे मताधिक्य मिळाल्यानंतर देखील महायुतीमध्ये रस्सीखेच सुरु होती. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संधी न मिळाल्यामुळे महायुतीमधील अनेक जेष्ठ नेते नाराज आहेत. खातेवाटपामुळे देखील नाराजीनाट्य सुरु होते. यामध्ये अजित पवार गटाचे छगन भुजबळ तर शिंदे गटाचे तानाजी सावंत नाराज होते. त्याचबरोबर भाजपमधील अनुभवी नेते असलेले सुधीर मुनगंटीवार यांना देखील मंत्रिपदाची संधी नाकारण्यात आली. यानंतर आता सुधीर मुनगंटीवार यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे.

महायुतीमध्ये नाराजीचा महापूर आला होता. यानंतर अनेक नेत्यांनी माध्यमांसमोर आपली नाराजी उघड देखील केली होती. त्याचबरोबर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांसमोर आपण नाराज नसल्याचे देखील म्हटले होते. त्यानंतर आता सुधीर मुनगंटीवार यांनी एका वाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजकीय विषयांवर भाष्य केले. तसेच त्यांच्या मंत्रिपदाबाबत देखील वक्तव्य केले.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

सुधीर मुनगंटीवार हे मंत्रिपद नसल्यामुळे भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा होती. यावर मुनगंटीवार म्हणाले की, पहिल्यांदा पराभव झाल्यानंतर राजकारण सोडण्याचा विचार केला. पण प्रमोद महाजनांमुळे पुन्हा सक्रिय झाल्याचं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. ते म्हणाले की, “प्रमोद महाजनांनी १९८९ मध्ये पराभव झालेल्या उमेदवारांची बैठक बोलावली होती. त्यावेळी विनोबा भावेंचा दाखला देत राजकारण सोडण्याचा विचार बोलून दाखवला. हजारो गोड पाण्याच्या नद्या समुद्राला मिळतात, पण समुद्र गोड होत नाही. पण तरीही नद्या वाहायच्या थांबत नाहीत. समुद्राच्या पाण्याचे बाष्पिभवन होऊन गोड पाणी मिळतं असं प्रमोद महाजन म्हणाले. त्यानंतर मी पुन्हा राजकारणात सक्रिय झालो.” अशी आठवण सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितली.

महाराष्ट्र संबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

त्याचबरोबर त्यांच्या मंत्रिपदाबाबत देखील वक्तव्य केले आहे. सुधीर मुनंगटीवार म्हणाले की, “मला मंत्रिपद का मिळालं नाही याची निश्चित माहिती नाही. पण ज्याला कुणाला माझं मंत्रिपद काढून घेण्यात आनंद वाटला त्याला नंतर खंत वाटेल असं काम करण्यासाठी मी मेहनत घेणार असा विश्वास भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. पक्षाचा मूळ विचार कायम ठेवण्यासाठी काही जणांना बलिदान द्यावं लागतं. मलाही तेच करावं लागलं. पण सत्तेचं संगमरवरी स्मारक बांधताना मूळ विचारांची कबर विसरू नये,” असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांचा रोख कोणाकडे असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Web Title: Bjp leader sudhir munangtiwar commented on not being given a chance in his cabinet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2025 | 10:44 AM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Sudhir Mungantiwar

संबंधित बातम्या

‘दिमागी नक्षलवाद’च्या टीकेवरून फडणवीस-सपकाळ आमनेसामने; सोनिया गांधींच्या व्हिडिओवरून राजकारण तापले
1

‘दिमागी नक्षलवाद’च्या टीकेवरून फडणवीस-सपकाळ आमनेसामने; सोनिया गांधींच्या व्हिडिओवरून राजकारण तापले

‘मुख्यमंत्री फेलोशिपमुळे प्रशासनाला नव्या पिढीच्या विचारांची जोड’; फेलोंना देवेंद्र फडणवीसांचे परिवर्तनाचे आवाहन
2

‘मुख्यमंत्री फेलोशिपमुळे प्रशासनाला नव्या पिढीच्या विचारांची जोड’; फेलोंना देवेंद्र फडणवीसांचे परिवर्तनाचे आवाहन

जालन्याची नवी ओळख ‘सिल्क, सीड आणि स्टील’; ‘जालनाई’ ब्रँडचा शुभारंभ, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
3

जालन्याची नवी ओळख ‘सिल्क, सीड आणि स्टील’; ‘जालनाई’ ब्रँडचा शुभारंभ, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

‘महाराष्ट्रातील उद्योग बंद पडत आहेत, सरकारचे गुंतवणुकीचे दावे फोल’; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात
4

‘महाराष्ट्रातील उद्योग बंद पडत आहेत, सरकारचे गुंतवणुकीचे दावे फोल’; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.