bjp ministry chandrakant patil on maratha reservation under obc demand by manoj jarange patil
Maratha Reservation : मुंबई : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसले आहेत. त्याचबरोबर हजारो मराठा बांधवांनी मुंबईमध्ये ठाण मांडले आहे. ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्यात यावे अशी मागणी जरांगे पाटील करत आहेत. याबाबत आता भाजप नेते आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणे शक्य नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या विषयावर भाष्य केले आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये केलेल्या आंदोलनावर नाराजी व्यक्त केली. चंद्रकांत पाटील म्हणाले की, “आझाद मैदानावर आंदोलनाला परवानगी दिलेली असताना सर्वसामान्य मुंबईकरांना वेठीस धरणे चुकीचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करीत आहेत. आपण महाराजांसोबत तुलना करीत नाही अन्यथा नवीन वाद तयार होईल,” असे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मागण्या कायदेशीरदृष्ट्या टिकणाऱ्या नसतील
कुणबी प्रमाणपत्र सरसकट सर्व मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्यात यावे अशी प्रमुख मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. याबाबत चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, “कायदेशीरदृष्ट्या ज्याचा दाखला नाही अशा मराठा समाजातील व्यक्तींना ओबीसीमधून आरक्षण मिळणे अशक्य आहे. आज वेळ मारून नेण्यासाठी जरी काही मागण्या तशाच मान्य केल्या तरी ते कायदेशीरदृष्ट्या टिकणाऱ्या नसतील,” असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आरक्षण दिले नाही ही फक्त वेळ काढायचे
पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले की, “सगेसोयरेबाबत अध्यादेशही निघालेला आहे आणि आपल्या पितृसत्ता समाजाच्या नियमानुसार सगेसोयरे हे फक्त वडिलांकडचेच मानले जातात आणि अशा सगळ्या सोयऱ्यांना दाखले मिळण्यास सुरुवात झाली आहे. एकाला दाखला मिळतो त्यावेळी त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबातील दहा जणांना याचा फायदा होतो, याचा विचार करता लाखो समाज बांधवांना आता कुणबी दाखल्याचा लाभ होत आहे. शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी तामिळनाडू प्रमाणे का आरक्षण दिले नाही ही फक्त वेळ काढायचे म्हणजे धकविण्याचे आहे,’ अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.