Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“आमच्याच तंगड्या वर करतो अन्…; भाजप आमदार बबनराव लोणीकर यांचे वादग्रस्त विधान, राजकारण तापलं

Babanrao lonikar controversial statement : भाजप आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी मतदारांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. यावरुन आता राजकारण तापले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 26, 2025 | 11:04 AM
bjp mla Babanrao lonikar controversial statement on voters maharashtra political news

bjp mla Babanrao lonikar controversial statement on voters maharashtra political news

Follow Us
Close
Follow Us:

Babanrao lonikar controversial statement  : मुंबई : भाजपचे आमदार व माजी मंत्री बबनराव लोणीकर हे राजकीय वर्तुळामध्ये सध्या चर्चेत आले आहेत. बबनराव लोणकर यांनी वादग्रस्त विधान केले आहे. लोणकर यांनी मतदारांचा अपमान होईल अशा स्वरुपाचे विधाने केली आहेत. यावरुन आता राजकीय वादंग निर्माण झाला आहे. लोकशाही असलेल्या आपल्या देशामध्ये राजकीय नेत्यांची अशी एरेरावी करणारी भाषेवरुन विरोधकांनी जोरदार निशाणा साधला आहे. ठाकरे गटाचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील बबनराव लोणकर यांचा खरपूस समाचार घेतला आहे.

भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी एका गावामध्ये भाषण केले. यावेळी टीकेला उत्तर देताना लोणकर यांची जीभ घसरली. त्यांनी मतदारांबाबत वादग्रस्त विधान केले. लोणीकर म्हणाले की, “ते कुचळवाट्यावर बसलेले पाच-सहा कारटे त्याच्या मायचा पगार बबनराव लोणीकरने केला, त्याच्या बापाला पेरणीसाठी सहा हजार रुपये पंतप्रधान मोदी यांनी दिले. तुझ्या मायच्या, तुझ्या बहिणीच्या व बायकोच्या नावावर लाडकी बहीण योजनेचे पैसे आले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारने दिले आहेत. तुझ्या पायातील बूट अथवा चप्पल आमच्यामुळेच आहेत. तुझ्या हातातलं डबड, तो देखील आमच्यामुळेच आहे. आमचेच पैसे घेतो आणि आमच्याच तंगड्या वर करतो आमचंच घेतो आणि आम्हालाच बोलतो का? आमचं घेऊन आमच्याबद्दल लिहितोस का?” अशी घणाघाती टीका माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

यावरुन विरोधकांनी जोरदार टीका सुरु केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावरुन टीका केली आहे. दानवे यांनी लोणीकर यांचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. दानवे यांनी लिहिले आहे की, “ही ब्रिटिशांची देशी आवृत्ती! लोकशाहीत ही भाषा बरी नव्हे बबनराव. कारण..तुमचे कपडे,बूट या जनतेमुळे..आमदारकी जनतेमुळे..तुमच्या गाडीतील डिझेल जनतेमुळे..तुमचे विमानाचे तिकीट जनतेमुळे..नेतेगिरी जनतेमुळे..विधानसभेतील स्थान जनतेमुळे.. यांचे हे बोल लक्षात ठेवा. निवडणूक येते आहे!” अशा शब्दांत अंबादास दानवे यांनी जोरदार टीका केली आहे.

ही ब्रिटिशांची देशी आवृत्ती! लोकशाहीत ही भाषा बरी नव्हे बबनराव. कारण.. तुमचे कपडे,बूट या जनतेमुळे..
आमदारकी जनतेमुळे..
तुमच्या गाडीतील डिझेल जनतेमुळे..
तुमचे विमानाचे तिकीट जनतेमुळे..
नेतेगिरी जनतेमुळे..
विधानसभेतील स्थान जनतेमुळे..
यांचे हे बोल लक्षात ठेवा. निवडणूक येते आहे! pic.twitter.com/RcSleViNGL — Ambadas Danve (@iambadasdanve) June 26, 2025

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

या प्रकरणावरुन कॉंग्रेस प्रदेशाााध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या वक्तव्याला घृणास्पद म्हटले आहे. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “हे खूपच घृणास्पद वक्तव्य आहे. लोणीकरांनी किती लोणी खाल्लं, किती तूप खाले, त्याचं काय-काय केलं हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो. अशा पद्धतीने जनतेला, शेतक-याला कोणी हिणवत असेल तर आम्ही ते सहन करणार नाही. त्यामुळे लोणीकरांनी यासंदर्भात माफी मागावी अथवा भाजपाने त्यांना पक्षातून निलंबित करावं, अन्यथा आम्ही त्यांना कुठल्याही गावात फिरू देणार नाही”. असा इशारा महाराष्ट्र कॉंग्रेसकडून देण्यात आला आहे. भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या वादग्रस्त विधानावर भाजप वरिष्ठ नेते काय प्रतिक्रिया देणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

Web Title: Bjp mla babanrao lonikar controversial statement on voters maharashtra political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2025 | 11:04 AM

Topics:  

  • Ambadas Danve
  • babanrao lonikar
  • Latest Political News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.