
Nitin Nabin : यूपीत विजयाची हॅट्ट्रिक साधणार; 2027 मध्ये पुन्हा सत्ता मिळवण्याचा नितीन नवीन यांचा दावा
Nitin Nabin : उत्तर प्रदेश येथे 2027 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) संघटनात्मक तयारीला वेग दिला आहे. कार्यकर्त्यांच्या बळावर भाजप 2027 मध्ये सलग तिसऱ्यांदा ऐतिहासिक विजय मिळवेल, असा विश्वास पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी व्यक्त केला.
मथुरा येथे पार पडलेल्या भाजपच्या दोन दिवसीय नियोजन बैठकीच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
मथुरेतील परखम येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय गो-विज्ञान संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रात ही बैठक पार पडली. आगामी तीन महिन्यांचा कृती आराखडा, संघटनात्मक उपक्रम, मित्रपक्षांशी समन्वय आणि 2027 च्या विधानसभा निवडणुकीची तयारी यावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
उत्तर प्रदेशमधील नितीन नवीन यांचा हा पाचवा दौरा होता. यापूर्वी त्यांनी पश्चिम, अवध, काशी आणि गोरखपूर विभागांचा दौरा केला होता. मथुरेत दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजप प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांनी त्यांचे स्वागत केले.
बैठकीच्या सुरुवातीला नितीन नवीन यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. तसेच विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष दिवंगत अशोक सिंघल यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली.
बैठकीला संबोधित करताना नितीन नवीन यांनी बूथ पातळीवर संघटना अधिक सक्रिय आणि मजबूत करण्यावर भर दिला. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक जनसंपर्क अभियान राबवण्याचे आवाहन त्यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमुळे उत्तर प्रदेशमध्ये विकासकामे घराघरांत पोहोचली आहेत. पक्षाचे समर्पित आणि मेहनती कार्यकर्तेच भाजपच्या विजयाचे खरे बळ आहेत. त्यांच्या जोरावर पक्ष 2027 मध्ये सलग तिसऱ्यांदा ऐतिहासिक विजय मिळवेल, असे नितीन नवीन म्हणाले.
आंध्र प्रदेशसाठी 20 नोव्हेंबर ठरणार धोक्याचा? चक्रीवादळाचा बसणार तडाखा, मुसळधार पावसाचा इशाराही जारी
भाजप प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी यांनीही बैठकीत विरोधकांवर टीका केली. समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, काँग्रेस, आझाद समाज पक्ष आणि एआयएमआयएम यांसह कोणत्याही विरोधी पक्षाला उत्तर प्रदेशमध्ये यश मिळणार नसल्याचा दावा त्यांनी केला. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप ऐतिहासिक विजय मिळवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महिला, गरीब, युवक आणि शेतकरी या चार घटकांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र आणि राज्य सरकारने विविध कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून केलेल्या कामांचा आधार घेत भाजप जनतेसमोर जाणार असल्याचेही चौधरी यांनी सांगितले.
चारधाम यात्रेत भाविकांच्या संख्येने केला मोठा रेकॉर्ड; 65.55 लाखांहून अधिक भाविकांनी लावली हजेरी
या बैठकीला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजप प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी, राष्ट्रीय महामंत्री (संघटन) बी. एल. संतोष, राष्ट्रीय महामंत्री आणि प्रदेश प्रभारी विनोद तावडे, राष्ट्रीय महामंत्री स्मृती इराणी, हरीश द्विवेदी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
Ans: भाजप कार्यकर्त्यांच्या बळावर उत्तर प्रदेशमध्ये 2027 मध्ये सलग तिसऱ्यांदा ऐतिहासिक विजय मिळवेल, असा विश्वास नितीन नवीन यांनी व्यक्त केला.
Ans: उत्तर प्रदेशातील मथुरा येथील परखममधील पंडित दीनदयाळ उपाध्याय गो-विज्ञान संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रात ही बैठक पार पडली.
Ans: आगामी तीन महिन्यांचा कृती आराखडा, संघटनात्मक उपक्रम, मित्रपक्षांशी समन्वय आणि २०२७ च्या विधानसभा निवडणुकीची तयारी यावर चर्चा झाली.