BJP state vice president Madhav Bhandari targeted the Mahavikas Aghadi
पुणे : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका जाहीर झाल्यानंतर राजकारण तापले आहे. अनेक नेत्यांनी जोरदार टीकास्त्र डागले असून पुन्हा एकदा राजकीय वाद होत असल्याचे दिसून येत आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. “२०१९ मध्ये विधानसभा निवडणूक नंतर निकाल आले आणि राज्यातील राजकारण बदलले गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात युतीने एकत्रित त्या निवडणूक लढवल्या आणि निकालात आम्हाला 161 जागा देखील मिळाल्या. त्यामुळे राज्यात सरकार युतीचे येणे आवश्यक होते. पण शिवसेनेने जनतेचा, भाजपचा विश्वासघात केला आणि उद्धव ठाकरे हे काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाऊन आघाडी सोबत त्यांनी सरकार स्थापन केले. त्यांचा अडीच वर्षाचा कारभार हा दुर्देवी होता. कोरोना काळात तत्कालीन राज्य सरकार अपयशी ठरले. यादरम्यान अनेक भ्रष्टाचार झाले हे राज्याचे दुर्देव आहे,” असे मत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी व्यक्त केले आहे.
लेखक विनायक आंबेकर लिखित “किंगमेकर क्रॉनिकल_ वसुली व घोटाळ्याचे पर्व “पुस्तकाचे प्रकाशन भाजप नेते आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्या हस्ते शनिवारी पार पडले. यावेळी भंडारी म्हणाले, “किंगमेकर क्रॉनिकल हे पुस्तक आज प्रकाशित केले हे चांगले आहे. मराठी मध्ये राजकीय विषया बाबत अभ्यासपूर्ण फारसे लिखाण येत नाही. राजकीय घटना कादंबरी स्वरूपात सर्वजण वाचतात. कादंबरीमध्ये थोडे विस्ताराने लिखाण करता येते. सर्व घटनामागील दडलेल्या गोष्टी, हितसंबंध, अंतस्थ हेतू उलगडून दाखवण्याचा प्रयत्न आंबेकर यांनी या पुस्तकातून केला आहे. आंबेकर यांनी हे लिखाण आज लिहिले नसून त्याची तयारी आधीच त्यांनी केली होती.”
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आंबेकर म्हणाले, “विविध घटना बद्दल किंवा पंतप्रधान ते मुख्यमंत्री सर्वांबद्दल अर्वाच्च भाषेत बोलणारे असे का बोलतात ते जनतेने समजून घेणे आवश्यक आहे. असे करताना त्यांना जनतेपासून काय लपवयचंय हे जनतेला माहिती व्हावे या साठी हे पुस्तक लिहिले आहे. कोरोना काळ आणि महाविकास आघाडी काळातील घोटाळ्यांची साखळी या पुस्तकातून स्पष्ट केली आहे. मी जे लिखाण केले ते ज्या तथ्य गोष्टी दिसल्या त्याबाबत आणि त्यामागील भूमिका विशद केली आहे. जनतेसमोर आघाडी काळातील विविध घटनांमागील हितसबंधाची, बोगस कार्यपध्दतीची पूर्ण माहिती मिळावी हा माझा उद्देश आहे. एका व्यक्तीला असा भ्रम झाला आहे की,आपण बोलू ते सर्व सत्य आहे परंतु वस्तुस्थिती तशी नाही हे मी दाखवून दिले आहे. आघाडी सरकारच्या काळातील घोटाळ्यांच्या सर्व प्रकरणा मागील तथ्य या पुस्तकात मांडले गेले आहे” असे मत विनायक आंबेकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
युद्धकाळामध्ये कॉंग्रेस पक्षाने केंद्र सरकारच्या पाठीशी पूर्ण पाठिंबा दिला होता. यानंतर आता कॉंग्रेसकडून देखील भारतीय सैन्याला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यात्रा काढली जात आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “काँग्रेसने जय हिंद यात्रा काढली. आमची अपेक्षा एवढेच असेल ती राजकीय यात्रा करू नका आणि आपल्या सेनेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू नका. ज्या पद्धतीने राहुल गांधी कालपासून बोलायला लागले आहेत की, सेने प्रति अविश्वास त्यांच्या बोलण्यातून दिसत आहे. एकीकडे सेनेवर अविश्वास दाखवतात आणि दुसरीकडे जय हिंद यात्रा काढायची. जय हिंद तेव्हाच म्हणता येईल जेव्हा सेनेच्या पाठीशी तुम्ही विश्वास दाखवाल,” असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेसला फटकारले आहे.