Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“ये अंदर की बात है, संजय राऊत महायुती के साथ है…; भाजप नेत्याच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केल्यामुळे जेष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 12, 2025 | 07:20 PM
Sudhir Mungantiwar lashed out at Sanjay Raut for criticizing Sharad Pawar.

Sudhir Mungantiwar lashed out at Sanjay Raut for criticizing Sharad Pawar.

Follow Us
Follow Us:

नांदेड : दिल्लीमध्ये जेष्ठ नेते शरद पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी शरद पवार यांनी एकनाथ शिदेंच्या राजकारणाचे कौतुक देखील केले. मात्र यामुळे ठाकरे गट नाराज झाला आहे. ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांवर नाराजी व्यक्त करुन हल्लाबोल केला. यावरुन राजकारण तापले आहे. भाजपचे नेते व मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

नांदेडमध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. मुनगंटीवार म्हणाले की, “संजय राऊत यांच्यासारख्या राज्यसभेत असणाऱ्या मोठ्या माणसाचे अतिशय छोटे मन आहे. ये अंदर की बात है, संजय राऊत महायुती के साथ है.  असं वातावरण, स्वतः ते निर्माण करतात. महाभारतात कर्णाचा पराभव होण्याचे कारण शैल्य होता. त्याचा जो रथ चालक होता. मला वाटतं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला संपवण्याचा विडा उचललाय,” असा घणाघात सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे ते म्हणाले की, “महाराष्ट्र पुरोगामी आहे. या पुरोगामी महाराष्ट्रात वैचारिक विरोध असू शकते. पण अशा पद्धतीने कोणी कोणाचा सत्कार करायचा नाही, जन्मदिवसाच्या सदिच्छा द्यायचा नाही, त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी व्हायचं नाही, हे कोत्या मनाचे लक्षण आहे. संजय राऊत धीरे धीरे महाविकास आघाडी संपावी यासाठी ते अंतकरणापासून अशा वक्तव्याने ते प्रयत्न करतात. त्यांना माझ्या मनापासून सदिच्छा आहेत. शुभकामना आहेत, ईश्वर महाविकास आघाडी संपवण्याच्या संकल्पनाला शक्ती देवो,” असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर

शरद पवार व एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, “कुणी कोणाला भेटल्यावर राजकारण होतं हे योग्य नाही, शरद पवार यांची 75 वी साजरी झाली, तेव्हा सगळे राजकीय पक्षाचे नेते त्यांच्यासोबत होते. कुणाच्या भेटीने दोन पक्ष एकत्रित येतील दोन सेकंदात अजून एवढे तरी राजकारणाचा ऱ्हास झालेला नाही. राजकारणात वैचारिक मतभेद असू शकतात. वैचारिक मतभेद आहेत म्हणून भेटी घ्यायच्या नाही, भेट घेतल्यावर संध्याकाळी रजिस्टर मॅरेज करणार आहेत असा भाव असल्यासारखा आहे. परवा देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली, पुन्हा ते सुरू झालं, मला वाटते हे गैर आहे. कोणती ही मैत्री व्हायची असेल तर अशी उघडपणे भेट घेऊन होत नाही, ती गुप्त होते,” असे स्पष्ट मत भाजप नेते व मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Bjp sudhir mungantiwar lashed out at sanjay raut for criticizing ncp sharad pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2025 | 07:20 PM

Topics:  

  • sanjay raut

संबंधित बातम्या

Tukaram Mundhe on Sanjay Raut : ‘पुरावे द्या,’ संजय राऊतांच्या FDA वरील आरोपांवर तुकाराम मुंढेचं उत्तर
1

Tukaram Mundhe on Sanjay Raut : ‘पुरावे द्या,’ संजय राऊतांच्या FDA वरील आरोपांवर तुकाराम मुंढेचं उत्तर

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
2

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

‘त्यादिवशी राऊतांचं तोंड काळं करण्यासाठी..,’ राऊतांच्या आरोपांवर नितेश राणेंचं प्रत्युत्तर, सिंधुदुर्गच्या जमिनीवरून राजकारण तापलं
3

‘त्यादिवशी राऊतांचं तोंड काळं करण्यासाठी..,’ राऊतांच्या आरोपांवर नितेश राणेंचं प्रत्युत्तर, सिंधुदुर्गच्या जमिनीवरून राजकारण तापलं

Sanjay Raut Counters Devendra Fadnavis: तुम्ही तर लोकशाहीच चोरलीय!’; संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार
4

Sanjay Raut Counters Devendra Fadnavis: तुम्ही तर लोकशाहीच चोरलीय!’; संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.