Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी कोण? भाजपकडून आज केली जाणार घोषणा; देवेंद्र फडणवीस की…

महायुतीतील नेत्यांमधील पद आणि पदावरून संघर्ष मंगळवारीही सुरूच होता. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायंकाळी उशिरा एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 04, 2024 | 07:23 AM
विरोधी पक्षाच्या आमदारांचा विधिमंडळाच्या पासचा खुला बाजार

विरोधी पक्षाच्या आमदारांचा विधिमंडळाच्या पासचा खुला बाजार

Follow Us
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये महायुतीला चांगले यश मिळाले असून, बहुमताचा आकडाही पार केला आहे. त्यानुसार, आता महायुतीकडून सरकार स्थापनेच्या हालचाली वाढल्या आहेत. 5 डिसेंबरला नवीन सरकार स्थापन होणार आहे. तत्पूर्वी आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल याची घोषणा भाजपच्या वरिष्ठांकडून केली जाणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासूनची ताणली गेलेली उत्सुकता आज संपणार आहे.

हेदेखील वाचा : Chief Minister: काळजीवाहू मुख्यमंत्री ‘या’ खात्यांवर ठाम; फडणवीस-शिंदेंच्या बैठकीत तोडगा नाहीच, आज काय होणार?

भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीतील नेत्यांमधील पद आणि पदावरून संघर्ष मंगळवारीही सुरूच होता. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी सायंकाळी उशिरा एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला. अडीच तास चाललेल्या या बैठकीनंतर आता सर्व काही ठीक असल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्याची घोषणा बुधवारी होण्याची शक्यता आहे. भाजपचे निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन मुंबईत पोहोचले आहेत.

दरम्यान, आज सकाळी 11 वाजता होणाऱ्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची नेतेपदी निवड होणार हे निश्चित मानले जात आहे. यानंतर त्यांची महायुतीच्या नेतेपदी निवड होणार आहे.

एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेनुसार पद द्या; शिवसेनेची मागणी

दुसरीकडे, शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना त्यांच्या प्रतिष्ठेनुसार पद देण्याची मागणी केली. शिंदे यांना पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री करावे, अशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे. मात्र, मुख्यमंत्रिपदाबाबत भाजप जो काही निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल, असे आमच्या नेत्याने म्हटले आहे.

स्थानिक स्वराज्यच्या निवडणुकांपर्यंत मुख्यमंत्रिपद असावे

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत आम्हाला मुख्यमंत्रिपद मिळाले असते तर त्याचे परिणाम चांगले झाले असते. आता मुख्यमंत्रिपद मिळणार नसल्याने शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद तसेच गृहमंत्रिपद मिळावे, अशी आमच्या सर्व आमदारांची इच्छा आहे.

महायुतीच्या बैठकीवर संभ्रम

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वृत्ती पाहता महायुतीच्या बैठकीबाबत सस्पेंस आहे. शिंदे महायुती सरकारमध्ये सहभागी होणार की बाहेरून पाठिबा देणार? याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, भाजप अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापनेकडे वाटचाल करत आहे. त्याचबरोबर सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय त्यांनी शिंदे यांच्यावर सोडला आहे.

हेही वाचा: Devendra Fadnavis: ‘वर्षा’वर घडामोडींना वेग; फडणवीस शिंदेंच्या भेटीसाठी दाखल, काय निर्णय होणार?

Web Title: Bjp will announce today the name of cm of maharashtra nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2024 | 07:15 AM

Topics:  

  • cm of maharashtra
  • devendra fadnavis

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
1

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Gadchiroli News : गडचिरोलीत उभा राहणार हरित पोलादाचा प्रकल्प; महाराष्ट्र सरकारचा जॉन कॉकरिलसोबत मोठा करार
2

Gadchiroli News : गडचिरोलीत उभा राहणार हरित पोलादाचा प्रकल्प; महाराष्ट्र सरकारचा जॉन कॉकरिलसोबत मोठा करार

Pune News : पुणे ठरतेय GCC चे हब; वर्षभरात 800 पेक्षा अधिक ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास
3

Pune News : पुणे ठरतेय GCC चे हब; वर्षभरात 800 पेक्षा अधिक ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास

‘म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला फसवणीस नाव दिले’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर घणाघाती हल्ला
4

‘म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला फसवणीस नाव दिले’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर घणाघाती हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.