Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra News : राज्यात आरोग्यसेवेचा दर्जा सुधारणार! देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘लिव्हिंग लॅब’ ची सुरुवात

Maharashtra News : महाराष्ट्रात ‘सर्वांसाठी आरोग्य’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यस्तरीय ‘लिव्हिंग लॅब’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 13, 2026 | 07:06 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • रोजगार आणि उद्योगनिर्मितीच्या संधींचाही शोध  
  • आरोग्यसेवेची गुणवत्ता व समानता सुधारण्याचे व्यापक  उद्दिष्ट 
  • आरोग्य व्यवस्था आणि प्रत्यक्ष सेवा देणाऱ्या घटकांवर समन्वय मजबूत केला जाईल
 

Maharashtra News : महाराष्ट्रात  ‘सर्वांसाठी आरोग्य’ या ध्येयाला पूरक ठरणारी आरोग्य नवोन्मेष आणि गुणवत्ता सुधारणेसाठीची राज्यस्तरीय ‘लिव्हिंग लॅब’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरु करण्यात आला असून या माध्यमातून आरोग्य सुविधांचा दर्जा आणि गुणवत्ता मानकांचे पालन सुधारण्यासह राज्यातील नागरिकांसाठी कौशल्य विकास व रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर सुद्धा भर देण्यात येणार आहे.

स्थानिक आरोग्यविषयक प्राधान्यक्रम निश्चित करणे, समुदायांसोबत उद्देशानुरूप उपाय तयार करणे आणि प्रत्यक्ष आरोग्य व्यवस्थेत नव्या पद्धतींची चाचणी घेणे, हा या व्यासपीठाचा उद्देश आहे. शासन, आरोग्यसेवा प्रदाते, खासगी क्षेत्र, शैक्षणिक संस्था, नवोन्मेषक आणि विकास भागीदारांचे अनुभव व क्षमता एका सामायिक व्यासपीठावर आणून सध्याची आरोग्य व्यवस्था आणि उपचार मार्ग अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न ‘लिव्हिंग लॅब’च्या माध्यमातून करण्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांचा हा प्रयत्न आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल आरोग्य, डेटा आणि ‘प्रिसिजन हेल्थ’सह नवोन्मेष व तंत्रज्ञानाच्या क्षमतांचाही यासाठी उपयोग केला जाणार आहे.

रोजगार आणि उद्योगनिर्मितीच्या संधींचाही शोध

खासगी आरोग्य क्षेत्राची व्याप्ती व क्षमता सार्वजनिक आरोग्याच्या प्राधान्यक्रमांशी जोडणे, ही या उपक्रमातील महत्त्वाची संधी आहे. विविध भागधारकांच्या सहभागातून स्थानिक गरजांना प्रतिसाद देणारे व्यवहार्य, परवडणारे आणि सुलभ उपाय विकसित करता येतील. यशस्वी उपायांचा महाराष्ट्रासह अन्य ठिकाणीही विस्तार करण्याची क्षमता तपासली जाईल. उपक्रमाच्या पुढील टप्प्यांत समुदायाच्या आरोग्यविषयक गरजांशी निगडित स्थानिक कौशल्यविकास, रोजगार आणि उद्योगनिर्मितीच्या संधींचाही शोध घेतला जाणार आहे.

Shrikant Shinde: ठाणे जिल्ह्यातील शाळा आणि आरोग्य केंद्रांचा कायापालट होणार! ४०० कोटींचा आराखडा; श्रीकांत शिंदेंचे निर्देश

आरोग्यसेवेची गुणवत्ता व समानता सुधारण्याचे व्यापक  उद्दिष्ट

केवळ नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याऐवजी दुर्गम व आरोग्यसेवेपासून वंचित घटकांसह प्रत्येक नागरिकापर्यंत नवोन्मेष पोहोचविण्यावर या संकल्पनेत भर आहे. शासन, समुदाय, नवोन्मेषक आणि भागीदारांच्या सहभागातून परिणामकारक उपायांची चाचणी, त्यातून मिळणाऱ्या अनुभवांचे वेगाने विश्लेषण आणि आरोग्यसेवेची गुणवत्ता व समानता सुधारणाऱ्या उपायांचा व्यापक विस्तार करण्याचे उद्दिष्ट आहे.

आरोग्य व्यवस्था आणि प्रत्यक्ष सेवा देणाऱ्या घटकांमधील समन्वय मजबूत केला जाईल

पुरावेनिर्मिती आणि सहकार्याचे व्यासपीठ म्हणून ‘लिव्हिंग लॅब’ विकसित केली जाणार आहे. समुदायाच्या गरजा आणि स्थानिक मालकी या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी ठेवून नवोन्मेष, आरोग्य व्यवस्था आणि प्रत्यक्ष सेवा देणाऱ्या घटकांमधील समन्वय अधिक मजबूत केला जाईल.

‘द फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया’चा ‘मान्यता’ हा प्रमुख उपक्रम या दृष्टिकोनाचे प्रारंभिक उदाहरण आहे. मातृ आरोग्यसेवा बळकट करण्याच्या शासनाच्या प्रयत्नांना पूरक असलेल्या या उपक्रमातून खासगी क्षेत्रातील गुणवत्ता सुधारणा प्रारूप सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसोबत कशा प्रकारे कार्य करू शकते, हे दिसून येते. ‘एमएसडी फॉर मदर्स’ या उपक्रमाचा समन्वय करीत असून, या सहयोगी प्रारूपाच्या विकासासाठी विविध भागीदारांचा समूह एकत्र आणत आहे. नवोन्मेषाचे व्यवहार्य व शाश्वत उपायांमध्ये रूपांतर करून व्यवस्था बळकट करण्यासाठी भागीदारीचा उपयोग केला जाणार आहे.

Pratap Sarnaik: महामार्गांवर धावणार ‘हवाई रुग्णवाहिका’! अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये मिळणार उपचार; सरनाईकांची मोठी घोषणा

Web Title: Maharashtra living lab healthcare innovation quality improvement jobs sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 07:06 PM

Topics:  

  • CM Devendra Fadanvis
  • cm of maharashtra
  • Department of Health
  • Government
  • Government of Maharashtra

संबंधित बातम्या

Maharashtra UK Partnership : ब्रिटनचे राज्य सचिव महाराष्ट्रावर फिदा; परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
1

Maharashtra UK Partnership : ब्रिटनचे राज्य सचिव महाराष्ट्रावर फिदा; परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Farmers News : ‘राज्यातील शेतकऱ्यांसाठी कठीण काळ’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया
2

Maharashtra Farmers News : ‘राज्यातील शेतकऱ्यांसाठी कठीण काळ’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया

Government Action On Underage Drinking : 23 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुणांना दारू पाजल्यास… सरकारचा कडक इशारा, पाहा नवीन नियम
3

Government Action On Underage Drinking : 23 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुणांना दारू पाजल्यास… सरकारचा कडक इशारा, पाहा नवीन नियम

2026 Nobel Prize in Economics: अर्थशास्त्रातील नोबेलवर अमेरिकेची मोहोर! ‘या’ दोन दिग्गज अर्थतज्ज्ञांच्या नावांची घोषणा
4

2026 Nobel Prize in Economics: अर्थशास्त्रातील नोबेलवर अमेरिकेची मोहोर! ‘या’ दोन दिग्गज अर्थतज्ज्ञांच्या नावांची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.