
Satara Politics, Satara ZP Election, Shambhuraj Desai Speech,
मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहात घडलेल्या प्रकाराबद्दल सविस्तर माहिती दिली आम्ही 33 सदस्य मतदानासाठी जात होतो आमची बैठक झाली अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाचा उमेदवार कोण हे ठरलं होतं .संदीप मांडवे व अनिल देसाई या दोन सदस्यांवर गुन्हा दाखल झाला ते आमच्याबरोबर बैठकीला हजर होते ज्यांचं अपहरण झालं म्हणून सांगितलं ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य बापूसाहेब शिंदे यांच्याबरोबर होते बैठकीच्या ठिकाणी देखील साध्या विषयातील पोलीस होते अटक करायचे होते तर तिथे का केले नाही कारण तिथे दोन हजार शिवसैनिक होते तिथे पोलिसांचे आमच्या सदस्यांना हात लावण्याचे धाडस झाले नाही असे शंभूराज देसाई म्हणाले.
Indian Air Force ची माहिती लीक? आसाममधून Pakistan चा गुप्तहेर अटकेत; गेल्या तीन वर्षांपासून…
या सभागृहात देखील आम्ही सुरक्षित आहोत की नाही असे वाटण्याची वेळ आली आहे आम्ही चौथ्या मजल्यावर चाललो होतो मांडवे म्हणत होते की पालकमंत्री आहेत मला मतदानासाठी जाऊ द्या त्यावेळी चार चार पोलिसांनी दोन्ही दंडाला धरले दोघांनी कमरेला धरून सदस्यांसकट फरपटत घेऊन गेले खासदार नितीन काका यांना पायऱ्यांवरून खाली पाडलं असेही देसाई म्हणाले .जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये साध्या विषयातील शंभर पोलीस म्हणजे ही मोगलाई आहे का आम्ही मंत्री आहोत आमदार आहोत चार लाख लोकातून निवडून आलो आहोत एवढा माधुरी पणा केला त्या गोंधळात मला काय लागलं माहिती नाही माझ्या शर्टावर रक्त संदीप मांडवे यांच्या शर्टवर रक्त होतं माझ्या बॉडीगार्डच्या लक्षात आल्यानंतर त्याने रुमाल काढून दिला तोपर्यंत आम्ही आमच्या दोन्ही सदस्यांना पळवत घेऊन गेलो असे शंभूराज देसाई यांनी सांगितले
पोलीस अधीक्षक तुषार दोषी हे घर गड्यासारखे वागले माझी विनंती आहे त्यांना तात्काळ निलंबित करा सेवेतून बडतर्फ करा त्यांची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करा हा आम्ही अन्याय सहन करणार नाही माझी हात जोडून विनंती आहे मंत्र्यांवर अरेरावी करणाऱ्या मंत्र्यांना जखमी करणाऱ्या पोलीस दलाचे प्रमुख दोषी एलसीबी चे पोलीस निरीक्षक अरुण देवकर सहाय्यक पोलीस निरीक्षक गरजे आणि त्यांच्याबरोबरचे 100 पोलीस यांच्यावर तत्काळ कारवाई केली जावी अशी मागणी देसाई यांनी केली.
Kerala Crime: अंगावर काटा आणणारी घटना! एकाच घरातील 5 जणांचा मृतदेह, दोन महिला फासावर;
शंभूराजे देसाई यांच्या मागणीनंतर विधानसभेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत ताबडतोब साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी ज्यांनी लोकांना ढकलाढकली केली जखमी केली आणि महत्त्वाचे म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवले त्यांचे सरकारने निलंबन करावे असे निर्देश मी देत आहे असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या .या सभागृहात आमदार सांगतात ते खरं मानलं जातं तर मंत्री सांगताहेत म्हणल्यावर ते खरंच मानलं पाहिजे हा आतापर्यंतचा प्रघात आहे एवढी घटना घडल्यानंतर सरकारकडून कालच चौकशीचे आदेश द्यायला हवे होते .ती काही कारणाने गेले नाहीत असे गोरे म्हणाल्या.
जालना येथील मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चा प्रकरणात वादग्रस्त ठरलेले आणि साताऱ्याचे विद्यमान पोलीस अधीक्षक तुषार दोषी हे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. विधान परिषदेत दोशी यांच्या निलंबनाच्या झालेली मागणी आणि त्यावर उपसभापती निलंबोरे यांनी दिलेले आदेश यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे .सातारा जिल्हा पोलीस दलातील महत्त्वाच्या अधिकार पदावरील पोलीस अधिकारी यांची एकाच वेळी निलंबनाची मागणी झाल्याने साताऱ्याच्या जिल्हा परिषदेचे धक्काबुक्की प्रकरण चांगलेच महागात पडण्याची चिन्हे आहेत .तुषार दोषी यांची कार्यपद्धती वादग्रस्त ठरल्याने त्यांची बदली जाण्यावरून करण्यात आली होती त्यानंतर ते साताऱ्यात बदलून आले .या प्रकरणांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री या नात्याने खरंच कारवाई करणार का का या कारवाईचा केवळ फार्स केला जाणार .बडे अधिकारी वाचवून काही ठराविक पोलिसांना बळीचा बकरा केला जाणार या प्रकरणाविषयी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहेत .निलंबन मागणीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे .