Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Koregaon Panchayat Samiti News: १५ व्या वित्त आयोगाच्या निधी वाटपात महिला सदस्यांवर अन्याय; शिवसेनेच्या सुरेखाताई पाटील आक्रमक

Satara Politics: राज्यात महायुती सरकार असताना आणि जिल्ह्यात भाजप-शिवसेनेची सत्ता असतानाही शिवसेनेच्या महिला सदस्यावर असा अन्याय होत असल्याबाबत विचारले असता, हे अत्यंत चुकीचे आहे. हा निधी २०२२ ते २०२६ या कालावधीतील आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 05, 2026 | 04:50 PM
Satara News, Shiv Sena, Satara Politics

Satara News, Shiv Sena, Satara Politics

Follow Us
Follow Us:
  • BDO सुप्रिया चव्हाण यांनी बदल सुचवण्यास सांगूनही प्रस्तावांचा विचार न करता परस्पर निधी कापला
  • पुरुष सदस्यांना झुकते माप देऊन महिला सदस्यांच्या गणातील विकासकामांना कात्री लावली
  • कपात केलेला निधी तातडीने पूर्ववत न केल्यास जनआंदोलन आणि उच्च न्यायालयात दाद मागणार
Satara News: कोरेगाव पंचायत समितीच्या १५ व्या वित्त आयोगाच्या सन २०२२-२३ ते २०२५-२६ सालातील निधी वाटपावर किन्हई गणाच्या शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्या सुरेखाताई रमेश पाटील यांनी गंभीर आक्षेप घेत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महिला सदस्यांना जाणीवपूर्वक कमी निधी देण्यात आला असून पुरुष सदस्यांना अधिक निधी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच अन्याय कायम राहिल्यास लोकांसमोर जाण्यासोबतच न्यायालयातही दाद मागणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

सुरेखाताई पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण यांनी पंचायत समितीला १५ व्या वित्त आयोगांतर्गत चार वर्षांसाठी एकूण ७ कोटी २६ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाल्याची माहिती दिली होती. त्यानुसार पंचायत समितीच्या व्हॉट्सॲप गटावर आलेल्या माहितीनुसार त्यांच्या किन्हई गणासाठी केवळ ४० ते ४२ लाख रुपये मंजूर करण्यात आल्याचे दिसून आले. मात्र त्यांच्या किन्हई पंचायत समिती गण क्षेत्रासाठी मूळ आराखड्यानुसार सुमारे ८१ लाख रुपयांची कामे मंजूर असल्याचा त्यांनी दावा केला.

Rohit Patil Disqualified: दौंडचे नगरसेवक रोहित पाटील यांचे पद रद्द; जात प्रमाणपत्र ठरले अवैध

त्यांच्या म्हणण्यानुसार, २०२२ ते २०२६ या कालावधीतील मंजूर आराखड्यातील कामे तातडीने सुरू व्हायला हवी होती. गटविकास अधिकाऱ्यांनी सदस्यांना आवश्यक असल्यास कामांमध्ये बदल सुचवण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांनी ६० लाख रुपयांची नवीन कामे आणि २० लाख रुपयांची पूर्वीची कामे कायम ठेवण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र त्यांच्या सूचनांचा कोणताही विचार न करता निधीमध्ये कपात करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

पाटील यांनी स्पष्ट केले की, निधीतील बदल करण्याचा अधिकार हा संबंधित सदस्य, गट समिती व पंचायत समितीच्या सभागृहाचा आहे. प्रशासनाने परस्पर निधीचे पुनर्वाटप केले असल्यास त्यामागील कारणमीमांसा शासनाच्या २०२१ च्या नियमांनुसार देणे बंधनकारक आहे. सभागृहात हा मुद्दा उपस्थित करून प्रशासनाकडून स्पष्टीकरण मागण्यात आले आहे, पुढील सभेत देखील विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

निधी वाटपात महिला सदस्यांवर अन्याय झाल्याचाही त्यांनी आरोप केला. त्यांच्या मते, महिला सदस्यांना तुलनेने कमी निधी देण्यात आला असून पुरुष सदस्यांना अधिक निधी देण्यात आला आहे. सभापतींना सर्वाधिक, उपसभापतींना त्यापेक्षा कमी आणि आणखी एका पुरुष सदस्याला अधिक निधी देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. या वाटपासाठी कोणता निकष लावण्यात आला, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

Supreme Court News: कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयाचे सूचक विधान; हिंसेने नव्हे संवादाने

पत्रकारांनी सभापतीही महिला असून त्यांना अधिक निधी मिळाल्याबाबत विचारले असता, सभापती या स्वतः महिला आहेत. त्यांनी स्वतःसाठी अधिक निधी घेतला असेल तर इतर महिला सदस्यांना कमी निधी का देण्यात आला, याचे उत्तर त्यांनी द्यावे, अशी मागणी सुरेखाताई पाटील यांनी केली.

राज्यात महायुती सरकार असताना आणि जिल्ह्यात भाजप-शिवसेनेची सत्ता असतानाही शिवसेनेच्या महिला सदस्यावर असा अन्याय होत असल्याबाबत विचारले असता, हे अत्यंत चुकीचे आहे. हा निधी २०२२ ते २०२६ या कालावधीतील आहे. त्यावेळी विद्यमान सदस्य किंवा सभापती नव्हते. मग पुरुष सदस्यांचा त्यावर अधिक हक्क कसा मानला गेला? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

भाजपच्या वाठार स्टेशन गणातील पंचायत समिती सदस्या अनिता भोईटे यांनी या विषयावर आंदोलनाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट करताना सुरेखाताई पाटील म्हणाल्या, मी लोकांसमोरही हा विषय मांडणार असून आवश्यक असल्यास कायदेशीर न्यायालयातही दाद मागणार आहे.

यावेळी त्यांनी पंचायत समितीच्या मासिक बैठकीत पत्रकारांना प्रवेश नाकारण्याच्या पद्धतीलाही विरोध दर्शविला. जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभेत पत्रकारांना उपस्थित राहण्याची परवानगी असते. मग पंचायत समितीच्या बैठकीत पत्रकारांना का रोखले जाते? ही भूमिका चुकीची असून पत्रकारांना बैठकीत बसू दिलेच पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

Web Title: Satara news koregaon panchayat samiti 15th finance commission fund disparity surekha patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 04:50 PM

Topics:  

  • Koregaon
  • Satara News
  • Satara Politics
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे गटाचा आज युक्तिवाद; अंतिम निर्णय आता नेमकी कधी?
1

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे गटाचा आज युक्तिवाद; अंतिम निर्णय आता नेमकी कधी?

Satara News : लिंब उड्डाण पूल की अपघाताचा सापळा? चढ-उताराच्या रस्त्यावर सुरक्षेचा अभाव
2

Satara News : लिंब उड्डाण पूल की अपघाताचा सापळा? चढ-उताराच्या रस्त्यावर सुरक्षेचा अभाव

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था
3

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था

‘विरोधकांना उत्तर द्यायला सह्याद्रीचे वाघ आहेत’; माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे विधान
4

‘विरोधकांना उत्तर द्यायला सह्याद्रीचे वाघ आहेत’; माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.