Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 29 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Harshwardhan Sapkal: MPSC पेपरफुटीवरून राजकीय संघर्ष पेटला, हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Harshwardhan Sapkal News: MPSC पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्या तक्रारीनंतर औसा पोलिसांनी ही कारवाई केली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 29, 2026 | 04:54 PM
Harshwardhan Sapkal: हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल (Photo Credit- X)

Harshwardhan Sapkal: हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • MPSC पेपरफुटीवरून राजकीय संघर्ष पेटला
  • हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल
  • वाचा सविस्तर बातमी!
Harshwardhan Sapkal News: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कथित पेपरफुटीवरून राजकीय संघर्ष पेटला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका सोशल मीडिया पोस्टनंतर या वादाला अधिकच धार आली. औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण?

आमदार अभिमन्यू पवार यांचा आरोप आहे की, पेपरफुटीमध्ये त्यांचा कोणताही संबंध नसतानाही, सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांच्यावर संशय निर्माण करण्याचा आणि त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या तक्रारीच्या आधारे औसा पोलिसांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकारणात एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांनी काय केले होते ट्विट?

मंगळवारी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत लिहिले, “एमपीएससी पेपरफुटी प्रकरणाचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस आहेत का? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एमपीएससी (अन्न आणि औषध निरीक्षक भरती) पेपरफुटीचे प्रकरण आता पुणे महानगरपालिका कार्यालयापर्यंत पोहोचले आहे. विशेषतः, या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे माजी पीए आणि आता भाजप आमदार असलेले अभिमन्यू पवार यांच्यावर संशय व्यक्त केला जात असल्याची चर्चा आहे.”

‘२०१४ नंतर जगाचे संदर्भ बदलले, आज भारताचा जगात एकही मित्र नाही’ हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्रावर निशाणा

हर्षवर्धन सपकाळ यांनी ‘X’ वरील आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले, “फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात, २०१७-१८ च्या मेगा भरती पोर्टल घोटाळ्याची, तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या तलाठी भरती २०२३; म्हाडा; पोलीस भरती; वन विभाग भरती; मृदा आणि जलसंधारण विभाग भरती आणि सध्याच्या अन्न व औषध निरीक्षक भरती घोटाळ्याची तातडीने निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. ज्यांनी राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची स्वप्ने उद्ध्वस्त केली आणि त्यांच्या भविष्याशी क्रूर खेळ खेळले, ते जोपर्यंत उघडकीस येत नाहीत, तोपर्यंत काँग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही.”

भाजप सरकारचा कार्यकाळ पेपरफुटीने गाजला

सोशल मीडियावर आणखी एका पोस्टमध्ये हर्षवर्धन सपकाळ यांनी लिहिले, “भाजप सरकारने शिक्षण क्षेत्राचे व्यापारीकरण केले, औद्योगिक क्षेत्र उद्ध्वस्त केले आणि तरुणांची स्वप्ने धुळीस मिळवली.” त्यांनी लिहिले, “भाजप सरकारचा कार्यकाळ पेपरफुटीने गाजला आहे. नीट, टेट आणि आता एमपीएससी, जे सरकार विद्यार्थ्यांची मेहनत वारंवार वाया घालवते, त्याला सत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही.” हर्षवर्धन सपकाळ यांनी एक्स (X) वरील दुसऱ्या एका पोस्टमध्ये लिहिले, “पेपरफुटी, भरती घोटाळे, ग्रेडिंगमधील अनियमितता आणि पुरावे समोर येत असूनही, सरकार गप्प आहे. या मौनामुळे संशय अधिकच बळावतो.”

Harshwardhan Sapkal News: मुख्यमंत्र्यांच्या तोंडी पानटपरीवरील टपोरीची भाषा शोभत नाही; ‘मिसिंग लिंक’वरून सपकाळांचा पलटवार 

Web Title: Case registered against harshvardhan sapkal over mpsc paper leak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 04:53 PM

Topics:  

  • Harshwardhan Sapkal
  • Maharashtra Political
  • MPSC
  • Paper Leak Case

संबंधित बातम्या

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान शरद पवारांचा मोठा डाव! पंतप्रधान मोदींना दिले बारामतीचे आमंत्रण; राजकीय वर्तुळात खळबळ
1

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान शरद पवारांचा मोठा डाव! पंतप्रधान मोदींना दिले बारामतीचे आमंत्रण; राजकीय वर्तुळात खळबळ

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळात धडाकेबाज निर्णय! अनुसूचित जातीपासून ते कृषी विभागापर्यंत… वाचा एका क्लिकवर
2

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळात धडाकेबाज निर्णय! अनुसूचित जातीपासून ते कृषी विभागापर्यंत… वाचा एका क्लिकवर

Rohit Pawar PC: १२ लाखांत फुटला MPSC चा पेपर, ५ लाख ॲडव्हान्स; रोहित पवारांचा नवा बॉम्ब
3

Rohit Pawar PC: १२ लाखांत फुटला MPSC चा पेपर, ५ लाख ॲडव्हान्स; रोहित पवारांचा नवा बॉम्ब

Anti Paper Leak Bill 2026: केंद्र सरकारचा नवीन ‘पेपर लीक’ कायदा नक्की काय आहे? जाणून घेण्यासाठी एकदा वाचाच..
4

Anti Paper Leak Bill 2026: केंद्र सरकारचा नवीन ‘पेपर लीक’ कायदा नक्की काय आहे? जाणून घेण्यासाठी एकदा वाचाच..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.