
BJP राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ 'मामां'च्या गळ्यात पडणार? Z+ सुरक्षा अन्...; नेमकं प्रकरण काय?
भाजपला लवकरच नवीन अध्यक्ष मिळण्याची शक्यता
साध्य जेपी नड्डा आहेत भाजपचे अध्यक्ष
शिवराज सिंग चौहान यांना संधी मिळण्याची शक्यता
BJP Politics: गेल्या अनेक महिन्यांपासून भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक राज्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडणुका झालयावर भाजपची राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता आहे असे म्हटले जात आहे. अध्यक्षपदासाठी अनेक नेत्यांची नवे समोर येत आहे. दरम्यान साध्य मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे भाजपचे अध्यक्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांना आयएसआय दहशतवादी संघटनेने जीवे मारण्याची धमकी दिल्याचे समजते आहे. त्यानंतर केंद्र सरकारने त्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. शिवराज सिंह चौहान यांना केंद्र सरकारने अतिरिक्त झेड प्लस सुरक्षा पुरवली आहे. कोणत्याही वादग्रस्त विधानपासून लांब असणाऱ्या मंत्र्याला अशी धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान चौहान हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची शक्यता असल्यानेच त्यांना अशा प्रकारची धमकी देण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे चौहान यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. भोपाळ येथील त्यांच्या निवासस्थानी आणि दिल्लीतील निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
BJP Politics : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोण? महाराष्ट्रातील ‘या’ नावाची जोरदार चर्चा सुरु
गेले अनेक महीने भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक नेत्यांची नावे चर्चेत येत आहेत. धर्मेंद्र प्रधान यांचे नाव आघाडीवर आहे. तर कधीकधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नावे देखील चर्चेत असल्याचे म्हटले जाते.
धर्मेंद्र प्रधान होणार भाजपचे पुढचे अध्यक्ष?
बिहार विधानसभा निवडणुकीत जदयू-भाजपाच्या प्रचंड विजयानंतर ओडिशात आलेले केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे भव्य स्वागत करण्यात आले. भुवनेश्वर विमानतळावर धर्मेंद्र प्रधान यांच्या जल्लोषी स्वागताच्या फोटोंमुळे भाजपाने राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी या नवीन चाणक्यची निवड केली आहे अशी अटकळ निर्माण झाली आहे. ५६ वर्षीय धर्मेंद्र प्रधान सुरुवातीपासूनच या पदाच्या शर्यतीत आहेत.
BJP National President: वय, कामगिरी आणि रणनीती; धर्मेंद्र प्रधान होणार भाजपचे पुढचे अध्यक्ष?
बिहारमध्ये पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या निवडणूक रणनीतीची अंमलबजावणी करून त्यांनी केवळ प्रचंड विजय मिळवला नाही तर बंगालसाठीही दिशा निश्चित केली. म्हणूनच धर्मेंद्र प्रधान यांना राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी एक प्रबळ दावेदार मानले जाते. बिहार निवडणुकीत एनडीएच्या प्रचंड विजयानंतर आणि भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आल्यानंतर, प्रधान ओडिशामध्ये पोहोचल्यावर विमानतळाबाहेर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. बिहारमधील विजयानंतर, प्रधान यांनी भगवान जगन्नाथाचे दर्शन घेण्यासाठी पुरी मंदिराला भेट दिली. धर्मेंद्र प्रधान सध्या मोदी सरकारमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत. प्रधान यांच्याव्यतिरिक्त, महाराष्ट्राचे नेते विनोद तावडे यांचे नावही भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहे.