Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Drought Update: पिकांचे पंचनामे आणि अहवालानंतरच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत; बावनकुळेंची माहिती

Maharashtra Drought: राज्यात २६५ तालुक्यांमध्ये भीषण दुष्काळ जाहीर झालेला असताना आणि बळीराजा पाण्यासाठी टाहो फोडत असताना, राज्य सरकारच्या धोरणावरून काँग्रेसने सरकारला धारेवर धरले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 29, 2026 | 08:39 AM
maharashtra drought 2026, Marathwada drought, Vidarbha drought hotspots,

maharashtra drought 2026, Marathwada drought, Vidarbha drought hotspots,

Follow Us
Follow Us:
  • पीक नुकसानीचे पंचनामे व संपूर्ण अहवाल प्राप्त झाल्यावरच दुष्काळी मदतीचा निर्णय
  • २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपसमितीची बैठक
  • महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली २९ सप्टेंबरला मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक
Chandrashekhar Bawankule on Maharashtra Drought:राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळण्याची अपेक्षा असतानाच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मदतीबाबत महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. पिकांचे पंचनामे आणि संपूर्ण अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मदतीचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. आजच्या आज मदत जाहीर केल्यास काही शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे परिस्थितीचा सविस्तर आढावा घेणे आवश्यक असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

मंत्रिमंडळ उपसमितीची आज होणार बैठक

राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ उपसमितीची मंगळवार, २९ सप्टेंबरला बैठक होणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील या उपसमितीकडून राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील परिस्थिती, पीक नुकसान, पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि शेतक-यांना द्यावयाच्या मदतीबाबत आढावा घेतला जाणार आहे. राज्य सरकारने २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर केल्यानंतर ही बैठक महत्वाची मानली जात आहे. या उपसमितीत गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, पंकजा मुंडे, दत्तात्रय भरणे, जयकुमार गोरे, संजय राठोड, प्रताप सरनाईक आदी सदस्य आहेत.

Maharashtra Drought : राज्यातील दुष्काळावर केंद्रीय कृषीमंत्री अॅक्शन ..

कसोटीच्या काळात डगमगून जाऊ नका: कृषिमंत्री भरणे

राज्यात पावसाने ओढ दिल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. उभी पिके जळून खाक झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर, राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे, हे निसर्गाचे संकट आहे, मात्र या कसोटीच्या काळात शेतक-यांनी डगमगून जाऊ नये. राज्य सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, केंद्राच्या मदतीची वाट न पाहता आपण लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करू, अशी ग्वाही भरणे यांनी दिली आहे.

…अन् डेटा सेंटर्सच्या वाट्याला मुबलक पाणी : काँग्रेस

राज्यात २६५ तालुक्यांमध्ये भीषण दुष्काळ जाहीर झालेला असताना आणि बळीराजा पाण्यासाठी टाहो फोडत असताना, राज्य सरकारच्या धोरणावरून काँग्रेसने सरकारला धारेवर धरले आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या वाट्याला दुष्काळ आणि दुसरीकडे डेटा सेंटर्सच्या वाट्याला मुबलक पाणी आणि वीज, हा कुठला विकास?’ असा घणाघाती सवाल काँग्रेसने राज्य सरकारला विचारला आहे.

Maharashtra Drought : दुष्काळ जाहीर करण्यात सरकारकडून उशीर; सतेज …

काँग्रेसने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून पोस्ट करत सरकारच्या धोरणांवर टीका केली, काँग्रेसने या धोरणातील विरोधाभास उघड करत राज्य सरकारच्या विकास मॉडेलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दुष्काळात शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाणी अपुरे पडत आहे, पण डेटा सेटर्ससाठी मात्र पाणी आणि वीज मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिली जात आहे: हा विकास नेमका कुणासाठी आहे? असा सवाल काँग्रेसने केला आहे.

 

महसूलमंत्री बावनकुळेंची माहिती पवारांच्या पत्रावर प्रतिक्रिया

शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राबाबत विचारले असता, बावनकुळेंनी थेट शब्दांत उत्तर दिले. विरोधी पक्ष म्हणून पत्र देणे हे त्यांचे कामच आहे, पण केवळ पवारांनी पत्र दिले म्हणून आम्ही मदत करत आहोत, असे नाही.
आमच्याकडे विविध पक्षांच्या नेत्यांची आणि आमदारांची दोन हजारांहून अधिक पत्रे आली आहेत मुख्यमंत्री स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करतू आहेत, जे तालुके दुष्काळाच्या यादीतून सुटले आहेत. त्याचाही अभ्यास करून न्याय दिला जाईल, अशी ग्वाही व्यांनी दिली.

 

 

 

Web Title: Chandrashekhar bawankule on maharashtra drought relief

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 08:38 AM

Topics:  

  • Chandrashekhar Bavankule
  • Maharashtra Drought 2026
  • Maharashtra Government
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Drought : जालन्यात दुष्काळाचा मच्छीमारांना मोठा फटका; सोमठाणा तलावात मत्स्यउत्पादन २० टक्क्यांवर
1

Maharashtra Drought : जालन्यात दुष्काळाचा मच्छीमारांना मोठा फटका; सोमठाणा तलावात मत्स्यउत्पादन २० टक्क्यांवर

Maharashtra Drought: जावळीचा Trigger-1 मध्ये समावेश करा; दुष्काळी सवलतींसाठी शिवसेनेची मागणी
2

Maharashtra Drought: जावळीचा Trigger-1 मध्ये समावेश करा; दुष्काळी सवलतींसाठी शिवसेनेची मागणी

Karad News : कराड तालुक्यात दुष्काळाची झळ; संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची पृथ्वीराज चव्हाणांची मागणी
3

Karad News : कराड तालुक्यात दुष्काळाची झळ; संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची पृथ्वीराज चव्हाणांची मागणी

Washim: दुष्काळग्रस्त यादीत वाशिमचे सहाही तालुके समाविष्ट, पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश
4

Washim: दुष्काळग्रस्त यादीत वाशिमचे सहाही तालुके समाविष्ट, पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.