Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जुहू चौपाटीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वतः केली स्वच्छता; समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्याचे आवाहन

राष्ट्रीय तटीय अभियानांतर्गत प्रशासनाकडून जुहू चौपाटीवर स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. यावेळी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छता केली. त्याचबरोबर राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी देखील सहभाग घेतला होता. यावेळी राज्याला लाभलेल्या मोठ्या समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी नागिरकांची असल्याची आठवण मुख्यमंत्र्यांकडून करुन देण्यात आली.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 21, 2024 | 10:55 AM
cm eknath shinde on Juhu Chowpatty

cm eknath shinde on Juhu Chowpatty

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय तटीय अभियानांतर्गत समुद्र किनारा स्वच्छता मोहीम हाती घेतली. जुहू चौपाटीवर मुख्यमंत्र्यांनी साफसफाई देखील केली. यावेळी राज्यातील नागरिकांना देखील स्वच्छतेचा संदेश दिला. समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यावेळी राज्यपाल सीपी राधाकृष्णन देखील उपस्थित होते.

सागरी किनारा स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिनाचे आयोजन केले जाते. या अनुषंगाने पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय व श्रम व रोजगार मंत्रालय, महाराष्ट्र शासन, बृहन्मुंबई महानगरपालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या सहकार्याने जुहू समुद्रकिनारा येथे समुद्रकिनारा स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार रवींद्र वायकर, आमदार अमित साटम, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, केंद्रीय वन आणि पर्यावरण विभागाचे विशेष सचिव तन्मय कुमार, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, पर्यावरण आणि हवामान बदल विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे आदी यावेळी उपस्थित होते.

सिंगल युज प्लास्टिकचा वापर बंद करावा

स्वच्छता अभियानासाठी विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती असल्याबद्दल समाधान व्यक्त करून राज्यपाल म्हणाले, “तरुणांमध्ये स्वच्छतेबाबत होत असलेली जागृती ही सकारात्मक बाब आहे. सांडपाणी स्वच्छ आणि प्रक्रिया करूनच सागरात गेले पाहिजे तसेच सागर किनारे प्लास्टिक आणि कचऱ्यापासून मुक्त करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. निसर्गाने आपल्याला दिलेली प्रत्येक गोष्ट स्वच्छ स्वरूपातच निसर्गाला परत दिली पाहिजे, असे सांगून सिंगल युज प्लास्टिकचा वापर बंद करण्याच्या केंद्र सरकारच्या अभियानात राज्याचे पूर्ण सहकार्य असेल,” असेही राज्यपालांनी यावेळी सांगितले.

पुढे राज्यपाल म्हणाले, “प्रत्येक मोठ्या कार्याची सुरुवात लहान लहान बाबींनी होत असते. सागरी किनारा स्वच्छतेसाठी आज जनजागृतीचा दिवस असून किनारा स्वच्छतेची ही सुरुवात मोठे रूप धारण करून ‘स्वच्छ भारत, महान भारत’ संकल्पनेला आकार देईल,” असे मत राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी केले आहे.

#Live I 21-09-2024
📍जुहू चौपाटी, मुंबई

राष्ट्रीय तटीय अभियानांतर्गत समुद्र किनारा स्वच्छता मोहीम – लाईव्ह https://t.co/26WFliDCEH

— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 21, 2024

समुद्र किनारे स्वच्छ ठेवूया – मुख्यमंत्री

या कार्यक्रमावेळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. राज्यातही ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्याचा नुकताच शुभारंभ झाला असून राज्यात 4,500 ठिकाणी हे अभियान राबविण्यात येत आहे. राज्याला 720 किलोमीटर लांबीमध्ये नैसर्गिक सौंदर्य लाभलेले अनेक समुद्रकिनारे लाभले आहेत. जगभरातील पर्यटक देखील स्वच्छ किनाऱ्यांना पसंती देतात. हे किनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली प्रत्येकाची आहे. मुंबईत सखोल स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे, पावसाळ्यानंतर ते नियमित सुरू राहणार असल्याचे सांगून यामुळे प्रदूषणात मोठी घट झाल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे, शासनाच्या सर्व यंत्रणा, सामाजिक संस्था आणि नागरिकांच्या एकत्रित सहभागातून हे शहर आणि समुद्र किनारे स्वच्छ ठेवूया,” असे आवाहन त्यांनी या निमित्ताने केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली.

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले, “समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी जगभर जागृती अभियान राबविले जात आहे. देशात स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मिशन लाईफ या संकल्पनेतील स्वच्छ भारत बनविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया, असे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधानांच्या ‘एक पेड मा के नाम’ या उपक्रमात सहभागी होऊन सर्वांनी किमान एक झाड लावावे,” असे त्यांनी सांगितले. पाण्याच्या पुनर्प्रक्रिया करणाऱ्या स्टार्टअपसाठी केंद्र सरकार मार्फत मदत दिली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

 

Web Title: Chief minister eknath shinde personally cleaned juhu chowpatty he appealed everyone to keep beaches clean

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2024 | 10:55 AM

Topics:  

  • Eknath Shinde

संबंधित बातम्या

Shivsena : राज ठाकरेंना मोठा झटका, दोन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
1

Shivsena : राज ठाकरेंना मोठा झटका, दोन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Thane Politics: ठाण्यात प्रभागरचनेवरून गणेश नाईक- एकनाथ शिंदेंमध्ये वादाचा भडका; ठाकरे गटही आक्रमक
2

Thane Politics: ठाण्यात प्रभागरचनेवरून गणेश नाईक- एकनाथ शिंदेंमध्ये वादाचा भडका; ठाकरे गटही आक्रमक

Shinde-Fadnavis Dispute: शिंदे–फडणवीस यांच्यात नाराजी; नेमकं बिनसलं कुठे?
3

Shinde-Fadnavis Dispute: शिंदे–फडणवीस यांच्यात नाराजी; नेमकं बिनसलं कुठे?

Aaditya Thackeray on Eknath Shinde: “शिंदेंनी महाराष्ट्राला लुटले!”- रस्त्यांवरील खड्ड्यांवरून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
4

Aaditya Thackeray on Eknath Shinde: “शिंदेंनी महाराष्ट्राला लुटले!”- रस्त्यांवरील खड्ड्यांवरून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.