
Khed Politics:
Pune Jain Housing Board: जैन बोर्डिंग प्रकरणावरून एकनाथ शिंदेंचा धंगेकरांचा सल्ला; म्हणाले…
अतुल देशमुख हे गेल्या दशकभरापासून तालुक्यात सक्रिय राजकारणात कार्यरत आहेत. त्यांनी सुरुवातीला भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला होता. परंतु विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये प्रवेश केला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांच्या मतदारसंघातील जागा उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेकडे गेल्याने त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून पक्षाकडून दुर्लक्ष होत असल्याची भावना देशमुख यांच्यामध्ये निर्माण झाली होती. त्यामुळेच त्यांनी आता नव्या राजकीय मार्गाचा स्वीकार करत ‘धनुष्यबाण’ हाती घेण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
शिवसेना (एकनाथ शिंदे गट) खेड तालुक्यात नव्याने संघटन उभी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर अतुल देशमुख यांच्या प्रवेशामुळे पक्षाला मोठा बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. देशमुख यांचे ग्रामीण भागातील मजबूत नेटवर्क, कार्यकर्त्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध आणि सक्रिय जनसंपर्क यामुळे शिंदे गटाची संघटनात्मक ताकद वाढेल, असा पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा विश्वास आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, देशमुख यांचा अधिकृत पक्षप्रवेश सोहळा येत्या आठवड्यात भव्य कार्यकर्ता मेळाव्यात होण्याची शक्यता आहे.
पुन्हा शाहबाज आणि मुनीरच्या प्रेमात ट्रम्प! ASEAN परिषदेदरम्यान ‘महान व्यक्ती’ म्हणत केले कौतुक
देशमुख यांच्या निर्णयामुळे खेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेला मोठा धक्का बसणार आहे. आधीच अंतर्गत गटबाजी आणि नेतृत्वाकडून दुर्लक्ष या कारणांमुळे पक्ष अडचणीत होता. आता देशमुख यांच्या जाण्याने स्थानिक संघटनेत असंतोष निर्माण होऊ शकतो, अशी चर्चा आहे.
देशमुख यांच्या या हालचालीनंतर खेड तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश ‘गेमचेंजर’ ठरू शकतो, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. दरम्यान, देशमुख यांच्या शिंदे गटात प्रवेशासाठी जुन्नर तालुक्यातील काही प्रभावी नेत्यांची मध्यस्थी झाल्याची चर्चा आहे. या बदलामुळे शिवसेनेत नव्या उमेदवारांना बळ मिळेल, तर काही जुन्या पदाधिकाऱ्यांच्या कपाळावर आठ्या उमटल्या आहेत.
धक्कादायक! पोरानेच केला बापाचा ‘सायबर गेम’! लावला ‘इतक्या’ लाखाचा चुना; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
राजकीय महत्त्वाकांक्षा आणि कार्यकर्त्यांमधील वाढती नाराजी या दोन्ही पार्श्वभूमीवर देशमुख यांचा निर्णय अत्यंत रणनीतिक मानला जात आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तोंडावर झालेला हा बदल तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलू शकतो. येत्या काही दिवसांत खेड तालुक्यातील राजकारणात नवे आघाडी-गठबंधनाचे प्रयोग पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.