Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Abhijeet Dipke Challenge To PM Modi: पंतप्रधानांनी आधी पदवी जाहीर करावी; अभिजित दिपकेंचे पंतप्रधानांना थेट आव्हान

Abhijeet Dipke : आरटीआय कार्यकर्त्यांचा असा युक्तिवाद आहे की, हे संपूर्ण प्रकरण नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या सीजेपी कार्यकर्त्यांना देण्यात आलेल्या कायदेशीर मदतीशी आणि त्यासाठी जाहीर केलेल्या कायदेशीर संरक्षण निधीशी जोडलेले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 03, 2026 | 02:34 PM
Abhijeet Dipke Police Security Demand, Cockroach Janata Party,

Abhijeet Dipke Police Security Demand, Cockroach Janata Party,

Follow Us
Follow Us:
  • अभिजित दीपके यांचे शिक्षण आणि वडील भगवान दीपके यांच्या मालमत्तेची चौकशी
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधी त्यांची पदवी सार्वजनिक करावी- अभिजीत दिपके
  • मी माझे शिष्यवृत्ती पत्र आणि शैक्षणिक कर्जाचे पत्र दाखवायला तयार- अभिजीत दिपके
Abhijeet Dipke Challenge To PM Modi: “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधी त्यांची पदवी सार्वजनिक करावी. त्यानंतर मी माझ्या शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचा आणि शैक्षणिक खर्चाचा संपूर्ण तपशील जाहीर करेन,” अशा शब्दांत कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिले आहे. पण अभिजीत यांच्या या आव्हानानंतर आता राजकारण तापण्याची शक्यता आहे.

आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी नुकतीच अभिजीत दीपके यांचे वडील भगवान दीपके यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना दीपके यांनी थेट नरेंद्र मोदींनाच, “माझी पदवी खरी आहे. नरेंद्र मोदी यांची पदवीही खरी असेल, अशी मला आशा आहे.” असं आव्हान दिलं आहे.

Maharashtra Religion Conversion Law: ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा २०२६’ राज्यात लागू; काय आहेत तरतुदी!

एका भाजप कार्यकर्त्याने आरटीआय दाखल करून माझे शिक्षण आणि वडिल्याच्या मालमत्तेची चौकशी केली आहे. यात माझ्या वडिलांनी, माझे शिक्षण कसे पूर्ण केले, याची माहिती मागवली आहे. पण मला त्या आरटीआय कार्यकर्त्याला विचारायचे आहे की, तुमचे नेते त्यांची पदवी दाखवतील का, मी माझे शिष्यवृत्ती पत्र आणि शैक्षणिक कर्जाचे पत्र दाखवायला तयार आहे. तुमचे नेते त्यांच्या खऱ्या पदव्या दाखवतील का?” असा थेट सवाल अभिजीत दिपके यांनी अमित तिवारी यांना केला आहे. तसेच, काही लोकांना शिक्षणाबद्दल एवढी अडचण का आहे. एका सामान्य कुटुंबातील मुलाने बोस्टन विद्यापीठात जाऊन शिक्षण घेतल्यास कोणाला अडचण का असावी? शिक्षणाबद्दल इतके आक्षेप का घेतले जात आहेत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

गुजरातच्या सुरत येथील आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी अभिजीत दीपकेंचे वडील भगवानर दीपके यांच्या आर्थिक परिस्थितीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी निवडणूक आयोग आणि केंद्रीय जीएसटी विभागाला पत्र लिहून म्हटले आहे की, भगवानराव दीपके हे महाराष्ट्र सरकारचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. त्यामुळे, एका सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्याला आपल्या मुलाच्या परदेशातील उच्च शिक्षणाचा खर्च कसा परवडला, याची चौकशी व्हायला हवी.

आरटीआय कार्यकर्त्यांचा असा युक्तिवाद आहे की, हे संपूर्ण प्रकरण नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या सीजेपी कार्यकर्त्यांना देण्यात आलेल्या कायदेशीर मदतीशी आणि त्यासाठी जाहीर केलेल्या कायदेशीर संरक्षण निधीशी जोडलेले आहे. या आधारावर, त्यांनी अभिजीत दीपकेच्या वडिलांच्या मालमत्तेची आणि आर्थिक परिस्थितीची चौकशी करण्याची मागणीही केली आहे.

Tax Devolution To Maharashtra: केंद्राकडून राज्यांना १.०९ लाख कोटींचा कर हप्ता जारी, महाराष्ट्राला किती?

कपिल सिबल यांच्या १ कोटी रुपयांच्या निधीवरही प्रश्नचिन्ह

अमित तिवारी यांनी केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाला (CBEC) पत्र लिहिले आहे. त्यांनी ज्येष्ठ वकील आणि राज्यसभा खासदार कपिल सिबल यांनी जाहीर केलेल्या १ कोटी रुपयांच्या कायदेशीर संरक्षण निधीवर १८ टक्के जीएसटी भरल्याबद्दल चौकशीची मागणी केली आहे. या रकमेच्या कर परिणामांचीही चौकशी झाली पाहिजे. खरं तर, कपिल सिबल यांनी नीट पेपरफुटी प्रकरणात दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या सीजेपीच्या आंदोलकांना कायदेशीर मदत देण्यासाठी १ कोटी रुपयांचे योगदान जाहीर केले होते. आता, एका आरटीआय कार्यकर्त्याने या रकमेसंदर्भात जीएसटीशी संबंधित प्रश्न उपस्थित केले असून चौकशीची मागणी केली आहे.

याची सुरुवात अभिजीत दीपकेच्या शिक्षणासंदर्भात दाखल केलेल्या आरटीआयने झाली. अभिजीत दीपकने एक व्हिडिओ प्रसिद्ध करून आपल्या शिक्षणाचा, शिष्यवृत्तीचा आणि शैक्षणिक कर्जाचा तपशील दिला. त्यानंतर हे प्रकरण त्याच्या वडिलांच्या आर्थिक परिस्थितीपर्यंत पोहोचले. सीजेपीच्या कायदेशीर संरक्षण निधीवर प्रश्न उपस्थित केले गेले. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून संघटनेच्या नोंदणीची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. आणि आता, कपिल सिबल यांनी जाहीर केलेल्या १ कोटी रुपयांच्या निधीची जीएसटी चौकशी करण्याची मागणीही या वादाचा भाग बनली आहे.

Web Title: Cjp chief abhijeet dipke challenges pm narendra modi over educational degree

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 02:34 PM

Topics:  

  • abhijeet dipke
  • CJP Protest
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Sindhudurg News : सावंतवाडीत ‘सेवा संकल्प अभियान’ला सुरुवात; आरोग्य तपासणीसह नागरिकांसाठी विविध उपक्रम
1

Sindhudurg News : सावंतवाडीत ‘सेवा संकल्प अभियान’ला सुरुवात; आरोग्य तपासणीसह नागरिकांसाठी विविध उपक्रम

Dombivli News : मोदींच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत ‘आशीर्वादाचा दिवा’, रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ‘सेवा संकल्प अभियान’ सुरु
2

Dombivli News : मोदींच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत ‘आशीर्वादाचा दिवा’, रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ‘सेवा संकल्प अभियान’ सुरु

हिंजवडीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता मिटणार; PMRDA ने आखला ‘हा’ नवीन प्लॅन
3

हिंजवडीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता मिटणार; PMRDA ने आखला ‘हा’ नवीन प्लॅन

PM Modi Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बाणगंगेवर महाआरती, मंगलप्रभात लोढांचे आयोजन
4

PM Modi Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बाणगंगेवर महाआरती, मंगलप्रभात लोढांचे आयोजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.