Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘देशाला मोदीजी हवे आहेत’, CM Devendra Fadnavis यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल, संविधानाच्या मुद्द्यावरून काँग्रेसला सुनावलं!

देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल! 'देशाला मोदीजी हवे आहेत' म्हणत संविधान, लोकशाही आणि रेजिम चेंजच्या मुद्द्यावरून विरोधकांना सुनावलं.

  • By विवेक
Updated On: Nov 02, 2026 | 09:18 PM
Sant Shiromani Maharaj Smarak

Sant Shiromani Maharaj Smarak

Follow Us
Follow Us:
  • ‘देशाला मोदीजी हवे आहेत’; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
  • लोकशाही आणि संविधानाच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर निशाणा
  • संविधान बदलण्याचा आरोप करत काँग्रेसला घेरलं
 

मुंबई : देशात लोकशाही आणि संविधानाच्या मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेसमधील राजकीय संघर्ष चांगलाच पेटला आहे. INDIA आघाडीकडून काल (रविवार, 1 नोव्हेंबर) दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलन करण्यात आलं. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन पार पडलं. तसंच, भाजपकडूनही काँग्रेसविरोधात आंदोलन पार पडलं. यावरून आता राज्यात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘देशाला मोदीजी हवे आहेत. आम्ही लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलो आहोत,’ असं म्हणत त्यांनी विरोधकांच्या आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

‘राहुल गांधी, तुम्ही किस खेत की मुली?’

फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांचाही उल्लेख केला. इंदिरा गांधी यांनीही संविधान आणि लोकशाही संपवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना ते शक्य झालं नाही, असा टोला त्यांनी लगावला.
ही लढाई केवळ भाजप किंवा मोदी सरकारची नसून देशाच्या संविधानासाठी असल्याचं सांगत विचार काहीही असू द्या, लोकशाही वाचवण्याच्या लढाईत सहभागी व्हा, असं आवाहनही त्यांनी केलं.

‘भाजपाच्या तोंडात संविधान, मनात मनुस्मृती’, Harshvardhan Sapkal यांचा फडणवीसांवर घणाघात! PM मोदी, अमित शाहांनासुद्धा घेरलं

काँग्रेसवर आंतरराष्ट्रीय षडयंत्राचा आरोप

काँग्रेसच्या आंदोलनांमागे आंतरराष्ट्रीय षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. देशातील राजकीय व्यवस्था आणि संविधानिक संस्था बदलण्याच्या प्रयत्नांना त्यांनी ‘रेजिम चेंज’ असं संबोधलं.

बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंकेतील राजकीय घडामोडींचा दाखला देत भारतात असं काहीही घडू देणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

इंदिरा गांधींच्या आणीबाणीचा दाखला

काँग्रेसने अनेकदा संविधानासोबत छेडछाड केल्याचा आरोप करत फडणवीस यांनी १९७५-७७ च्या आणीबाणीचा उल्लेख केला. इंदिरा गांधींच्या कार्यकाळात मूलभूत अधिकारांवर निर्बंध आणण्यात आले होते, असं ते म्हणाले. काँग्रेसचा आजचा चेहरा बदलला असला तरी विचार तेच आहेत, असा टोला लगावत त्यांनी ‘बॉटल नई है, शराब वहीं है’ असं विधान केलं.

लाल संविधानाच्या पुस्तकावरून राहुल गांधींना टोला

राहुल गांधी यांच्या हातातील लाल रंगाच्या संविधानाच्या पुस्तकावरूनही फडणवीस यांनी टीका केली. संविधानाचं पुस्तक दाखवलं जातं, मात्र त्यामागील विचारांवर प्रश्न उपस्थित केले जात असल्याचं ते म्हणाले. संविधानिक संस्थांवर मोर्चे काढण्याच्या विरोधकांच्या भूमिकेवरही त्यांनी आक्षेप घेतला.

दरम्यान, फडणवीसांच्या या आक्रमक विधानांमुळे भाजप आणि काँग्रेसमधील संविधानावरून सुरू असलेला राजकीय संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

Sanjay Raut : अमित शाहांना गृहमंत्रिपदावरून हटवा! संजय राऊतांची मोदींकडे मोठी मागणी; 13 कोटी घुसखोरांच्या मुद्द्यावरून थेट सवाल

💡

Frequently Asked Questions

  • Que: देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर काय टीका केली?

    Ans: राहुल गांधी यांना देशात अतिडावी व्यवस्था निर्माण करायची असल्याचा आरोप करत फडणवीस यांनी त्यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवर टीका केली.

  • Que: फडणवीस यांनी रेजिम चेंज म्हणजे काय सांगितलं?

    Ans: निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय सत्ता आणि देशातील संस्थात्मक व्यवस्था बदलण्याच्या प्रयत्नांना त्यांनी रेजिम चेंज असं संबोधलं.

  • Que: लाल संविधानाच्या पुस्तकावरून फडणवीस काय म्हणाले?

    Ans: राहुल गांधी लाल रंगाचं संविधानाचं पुस्तक दाखवत असल्याचा उल्लेख करत फडणवीस यांनी त्यावर टीका केली. त्या पुस्तकाच्या माध्यमातून विरोधक कोणता संदेश देत आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Web Title: Cm devendra fadnavis attack rahul gandhi congress vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 09:18 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • PM Narendra Modi
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

‘भाजपाच्या तोंडात संविधान, मनात मनुस्मृती’, Harshvardhan Sapkal यांचा फडणवीसांवर घणाघात! PM मोदी, अमित शाहांनासुद्धा घेरलं
1

‘भाजपाच्या तोंडात संविधान, मनात मनुस्मृती’, Harshvardhan Sapkal यांचा फडणवीसांवर घणाघात! PM मोदी, अमित शाहांनासुद्धा घेरलं

Sanjay Raut : अमित शाहांना गृहमंत्रिपदावरून हटवा! संजय राऊतांची मोदींकडे मोठी मागणी; 13 कोटी घुसखोरांच्या मुद्द्यावरून थेट सवाल
2

Sanjay Raut : अमित शाहांना गृहमंत्रिपदावरून हटवा! संजय राऊतांची मोदींकडे मोठी मागणी; 13 कोटी घुसखोरांच्या मुद्द्यावरून थेट सवाल

Sanjay Raut : फडणवीसांच्या ‘चीन फंडिंग’ आरोपांवरून महाराष्ट्रात रणकंदन! संजय राऊतांनी फडणवीसांना सुनावलं
3

Sanjay Raut : फडणवीसांच्या ‘चीन फंडिंग’ आरोपांवरून महाराष्ट्रात रणकंदन! संजय राऊतांनी फडणवीसांना सुनावलं

Amit Shah : खऱ्या संसदेत राहुल गांधींचा नंबर कधीच लागणार नाही; अमित शाहांचा घणाघात
4

Amit Shah : खऱ्या संसदेत राहुल गांधींचा नंबर कधीच लागणार नाही; अमित शाहांचा घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.