'विधानसभेला हे शोभणारं नाही, कारवाई झालीच पाहिजे'; विधानभवनातील राड्यानंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
मुंबई : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम लागला आहे. मात्र याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. याबाबत राज्यातील कॉंग्रेस तसेच शिवसेना ठाकरे गटाने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पक्षीय बैठक बोलवावी अशी देखील मागणी केली आहे. यावर भाजप नेते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण दलाच्या प्रमुखांशी चर्चा केली. यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, “नागरी सुरक्षेच्या संदर्भात एक बैठक आपण घेतली होती. कारण या संपूर्ण युद्धजन्य परिस्थितीत महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांची बैठक आपण घेतली होती. तसंच आपलं जे सेनादल आहे त्याच्या अधिकाऱ्यांशी थेट बैठक घेतली नव्हती. आज जी बैठक घेतली ती या दिवसांमध्ये जो अनुभव आला त्यातून अधिक काय करायचं? आपली दिशा कशी असली पाहिजे आणि कशी सावधगिरी बाळगली पाहिजे या दृष्टीने सैन्य दलाच्या अपेक्षा समजून घेतल्या. जी काळजी वाटते ती आम्ही सांगितली,” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीबाबत दिली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय सेनेवर विश्वास व्यक्त केला आहे. “आपल्याला कुठे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आपल्या सैन्याने पाकिस्तानला त्यांची जागा दाखवली. त्यांचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. आपल्या सैन्याने पाकिस्तानला त्याची जागा दाखवली. आपल्या सेनेने पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई केली आणि दशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले, पाकिस्तानला माहीत आहे की भारताविरोधात आपण लढू शकत नाही. असं झालं की पाकिस्तानकडून प्रॉक्सी वॉर सुरु करतात,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
पुढे ते म्हणाले की, “पाकिस्तानचा इतिहास सांगतो की ते प्रॉक्सी वॉर करतात. अशात मुंबईला लक्ष्य केलं जाऊ नये म्हणून आम्ही ही बैठक घेतली. या बैठकीत सेनेचे अधिकारी होते. त्यांच्यासह आम्ही हे समजून घेण्याचा प्रयत्न केला की आता पुढे काय काय खबरदारी घेतली पाहिजे? तसंच गुप्तचर यंत्रणांशीही आमची चर्चा सुरु आहे. पुढे रणनीती कशी असेल यावर चर्चा केली,’ असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
भारत पाकिस्तान युद्धाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑपरेशन सिंदूरला अभूतपूर्व असे म्हटले आहे. मुख्यमंत्री फेडणवीस म्हणाले की, “मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. यापूर्वी येथे झालेले दहशतवादी हल्ले हे आर्थिक पायाभूत रचनेवरचा थेट आघात होते. त्यामुळे अशा संवेदनशील ठिकाणी सायबर सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांमधील समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्य सरकार आणि संरक्षण दल यांच्यातील समन्वय अधिक सशक्त करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात यावी, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये नियमित संवाद आणि माहितीचे आदानप्रदान व्हावे,” असे मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले.