Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : झिरवळांना यावेळीही माफी की राजीनामा? CM फडणवीसांनी पहिल्यांदाच दिली आक्षेपार्ह व्हिडिओवर प्रतिक्रिया

शासकीय निवासस्थानातील मंत्री झिरवळ यांच्या व्हिडिओमुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 27, 2026 | 04:49 PM
CM Devendra Fadnavis live press on narhari zirwal controversial video

CM Devendra Fadnavis live press on narhari zirwal controversial video

Follow Us
Follow Us:

CM Fadnavis on Narhari Zirwal : मुंबई : राज्याच्या राजकारणामध्ये सध्या अनेक राजकारण्यांची प्रकरणे समोर येत आहे. यामध्ये अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्री नरहरी झिरवळ (Narhari Zirval) वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. झिरवळ याचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शासकीय निवासस्थानातील मंत्री झिरवळ यांच्या व्हिडिओमुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणावरुन झिरवळांवर जोरदार टीका झाल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मंत्री नरहरी झिरवळ यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल होण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भात नरहरी झिरवळ यांच्याशी फोनवर चर्चा झाली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले की, “नरहरी झिरवळ यांनी मला फोनवरुन संपर्क करुन सांगितलं आहे की, हा व्हिडीओ तीन. चार व्हिडीओ जोडून चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आला आहे. त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे. मी त्यांना याबाबत तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला आहे,” असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे.

हे देखील वाचा : झिरवळांना अडकवण्यासाठी कुणी सापळा रचला; वडेट्टीवारांचा विधानसभेत लेटरबॉम्ब

आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, “या व्हिडीओची शहानिशा करण्यात येईल. तसंच त्या व्हिडीओची सत्यता पडताळून त्यांच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार आणि आम्ही योग्य निर्णय घेऊ,” असे सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. पुढे फडणवीस म्हणाले की, “मागच्या काळात घडलेल्या घटनेची (मंत्रीमंडळ ईडी कारवाई) चौकशी झाली तेव्हा झिरवळ यांच्यापर्यंत संबंध गेला नाही. आता जे व्हिडीओ समोर आलेत ते गंभीर आहेत. त्यांची सत्यता पडताळली जाईल. व्हिडीओ खरे असतील तर कारवाई केली जाईलच,” असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केले.

हे देखील वाचा : नरहरी झिरवाळ आणि मुख्यमंत्र्यांची गुप्त भेट; वादग्रस्त ‘चित्रफीत’ प्रकरणाने राष्ट्रवादीत खळबळ

नेमकं प्रकरण काय?

विधानसभा उपाध्यक्ष आणि दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांची एक कथित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या व्हिडीओमध्ये झिरवाळ यांच्यासोबत पवन यादव नावाचा तृतीयपंथी दिसत असून, यादववर मुंबईतील कुरार पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. प्रसारित झालेली ही चित्रफीत सुमारे सात महिन्यांपूर्वीची असल्याचे बोलले जात आहे. शासकीय निवासस्थानातील या दृश्यांमध्ये तृतीयपंथी पवन यादव हा झिरवाळ यांच्यासोबत बिछान्यावर बसलेला दिसत आहे. तसेच त्यांच्या शेजारी खाद्यपदार्थ आणि मद्याच्या बाटल्याही दिसून येत आहेत. एका लोकप्रतिनिधीच्या शासकीय निवासात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली व्यक्ती अशा परिस्थितीत दिसल्याने नैतिकतेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: Cm devendra fadnavis live press on narhari zirwal controversial video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 04:49 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Maharashtra Politics
  • Narhari Zirval

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
1

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर
2

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा
3

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
4

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.