cm devendra fadnavis on rahul gandhi press conference on election commission voting stealing
गोवा : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवरुन वाद निर्माण झाला आहे. निवडणुकीच्या मतदानाच्या शेवटच्या काही तासांमध्ये मतदानाची आकडेवारी वाढली असल्याचा आरोप कॉंग्रेसकडून केला जात आहे. यामध्ये आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाने मतांची चोरी केली असल्याचा आरोप केला आहे. याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेत राहुल गांधी यांनी अनेक गंभीर आरोप केले आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रियावर दिली आहे.
ओबीसी राष्ट्रीय महाअधिवेशन गोव्यात पार पडले आहे. यामध्ये करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील सहभागी झाले होते. या अधिवेशनात त्यांनी ओबीसींच्या हिताचे निर्णय आपल्या सरकारनेच घेतल्याचे सांगितले आहे. याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या टीकेवर देखील प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, राहुल गांधी यांचा खोटं बोलून अपयश लपवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मला याबाबत वाटते वाटते. त्यांनी एकदा त्यांनी चेक करावे, कदाचित त्यांचा एक तर मेंदू चोरीला गेला आहे किंवा मेंदू मधून चीप चोरीला गेली आहे म्हणून ते वारंवार असं बोलत असतील, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ओबीसी राष्ट्रीय महाअधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाबाबत देखील मत व्यक्त केले. ते म्हणाले की, मला आज आनंद आहे या ठिकाणी ओबीसी महासंघाने देखील हे मान्य केलं, की महाराष्ट्रात आणि देशात गेल्या दहावर्षात 57 ओबीसी हिताचे निर्णय झाले त्यापैकी 50 निर्णय हे आमच्या सरकारने महाराष्ट्रात घेतले आहेत आणि 7 निर्णय हे पंतप्रधान मोदींनी घेतले आहेत असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. ओबीसी समाजाच्या विविध मागण्या आहेत त्या पूर्ण करणारे आमचे सरकार आहे, आता नवीन काही मागण्या समोर आल्या आहेत. त्याही पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाला दिले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यासोबत युतीच्या चर्चेवर सकारात्मक आणि सूचक वक्तव्य केले आहे. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मला माहिती नाही, मी त्यांचे वक्तव्य ऐकले नाही त्यामुळे मला काही म्हणायचं नाही असेही स्पष्ट करीत काही बोलण्यास नकार दिला आहे.