
CM Devendra Fadnavis Support DCM Eknath Shinde in Satara Drug Case News
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. गृहमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र पोलिसांचे अभिनंदन आणि कौतुक केले. ते म्हणाले की, “साताऱ्यात पोलिसांनी धाड टाकून ड्रग्जचा इतका मोठा साठा जप्त केला, त्यासाठी मी सर्वप्रथम पोलीस दलाचे अभिनंदन करतो. जो धंदा चालला होता, त्याचा पर्दाफाश पोलिसांनी केला. या प्रकरणात जाणीवपूर्वक एकनाथ शिंदेंचं नाव आणण्याचा प्रयत्न चुकीचा आहे, अयोग्य आहे, निषेर्धाह आहे. आतापर्यंत समोर आलेल्या पुराव्यात एकनाथ शिंदे यांच्या परिवाराचा संबंध दुरावन्याने आढळून आलेला नाही. आम्ही याप्रकरणाची पूर्ण चौकशी करत आहोत,” असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
हे देखील वाचा : तपोवनाच्या वृक्षतोडीवर उच्च न्यायालयाचा निर्णय; राज्य सरकारला दिली चपराक
पुढे त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर झालेल्या आरोपांवर देखील मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “या अंमली पदार्थांच्या प्रकरणात राजकीयदृष्टया आणि जाणीवपूर्वक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव जोडण्याचा प्रयत्न केला जात असून हा प्रकार अत्यंत चुकीचा आणि निषेधार्थ आहे. आतापर्यंत झालेल्या तपासात आणि पुढे आलेल्या पुराव्यानुसार या प्रकरणात कुठेही उपमुख्यमंत्री शिंदे अथवा त्यांच्या परिवाराचा कुठलाही संबंध समोर आलेला नाही. दुरान्वयेही शिंदे यांचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचे सांगतानाच अत्यंत चुकीच्या पद्धतीने या प्रकरणात शिंदे यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठराखण केली.
हे देखील वाचा : आगामी महापालिका निवडणुकीसाठी फडणवीस-शिंदेंचा प्रचाराचा धडका; तर अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष…
त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. सदनिका घोटाळा प्रकरणामध्ये त्यांना अटक वॉरंट जारी झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. एका वर्षात राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांची विकेट गेली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्याकडील खात्यांची जबाबदारी आता अजित पवार यांच्याकडे देण्यात आली आहे, असे फडणवीस यांनी म्हटले. यापलीकडे देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटे यांच्या आमदारकीचा राजीनामा, अटक वॉरंट याबद्दल कोणतीही टिप्पणी केली नाही.