Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“जय हिंद यात्रा ही राजकीय यात्रा करू नका…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कॉंग्रेस पक्षाला फटकारले

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने केलेल्या कामगिरीच्या कौतुकासाठी कॉंग्रेसकडून जय हिंद यात्रा काढली जात आहे. मात्र ही यात्रा राजकीय नसावी असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी फटकारले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: May 18, 2025 | 12:32 PM
cm devendra fadnavis press confernce in dehu pune on hindi Language in Maharashtra

cm devendra fadnavis press confernce in dehu pune on hindi Language in Maharashtra

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : भारताने ऑपरेशन सिंदूर करुन जगासमोर भारतीय सैन्याची ताकद जगापुढे दाखवून दिली आहे. यामध्ये पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. तसेच त्यानंतर पाकिस्तानने केलेले सर्व हल्ले भारतीय दलाने हाणून पाडले आहे. यानंतर संपूर्ण देशभरातून भारतीय सैन्याचे कौतुक केले जात असून अभिनंदन केले जात आहे. तसेच देशातील अनेक राज्यांमध्ये तिरंगा यात्रा काढल्या जात आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मत व्यक्त केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य करत टीकांवर देखील प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय सैन्याचे कौतुक करत पाकिस्तानला फटकारले आहे. फडणवीस म्हणाले की, “आज भारताची डिफेन्स कॅपॅबिलिटी पाकिस्तान पेक्षा चार ते पाच पट जास्त आहे. सैन्य क्षमता पाहता जगातील पहिल्या पाच मध्ये भारताचा समावेश आहे. पाकिस्तानी गुडघे टेकल्यावर भारताने युद्धविराम केला” असे स्पष्ट मत भाजप नेते व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे ते म्हणाले की, “संपूर्ण भारत भारतीय सैन्याच्या पाठीशी आहे. त्यामुळे केवळ शहरात नाही किंवा मोठ्या गावात नाही तर ग्रामपंचायत स्तरावर प्रत्येक व्यक्ती हा सैन्याच्या पाठीशी उभा आहे, हे दर्शवलं पाहिजे. हे पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर खापरखेडा येथे तिरंगा यात्रा काढली जात आहे. अतिशय भव्य अशी तिरंगा यात्रा खापरखेडा येथे काढण्यात आली. आशिष देशमुख यांनी सगळ्या पक्षाच्या लोकांना आमंत्रित केलं होतं. इथे पक्षाचा विषय नाही, हा भारताची तिरंगा यात्रा आहे,” असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

युद्धकाळामध्ये कॉंग्रेस पक्षाने केंद्र सरकारच्या पाठीशी पूर्ण पाठिंबा दिला होता.  यानंतर आता कॉंग्रेसकडून देखील भारतीय सैन्याला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यात्रा काढली जात आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “काँग्रेसने जय हिंद यात्रा काढली. आमची अपेक्षा एवढेच असेल ती राजकीय यात्रा करू नका आणि आपल्या सेनेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू नका. ज्या पद्धतीने राहुल गांधी कालपासून बोलायला लागले आहेत की, सेने प्रति अविश्वास त्यांच्या बोलण्यातून दिसत आहे. एकीकडे सेनेवर अविश्वास दाखवतात आणि दुसरीकडे जय हिंद यात्रा काढायची. जय हिंद तेव्हाच म्हणता येईल जेव्हा सेनेच्या पाठीशी तुम्ही विश्वास दाखवाल,” असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेसला फटकारले आहे.

Web Title: Cm devendra fadnavis target congress over jay hind yatra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2025 | 12:32 PM

Topics:  

  • Congress
  • devendra fadnavis
  • political news

संबंधित बातम्या

मामा राहिला बाजूला अन् भाच्याने उरकले लग्न: राहुल गांधी आले सलमानच्या रांगेत?
1

मामा राहिला बाजूला अन् भाच्याने उरकले लग्न: राहुल गांधी आले सलमानच्या रांगेत?

Shaktipeeth highway : इच्छामरणाची परवानगी द्या! शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे रक्ताने पत्र
2

Shaktipeeth highway : इच्छामरणाची परवानगी द्या! शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे रक्ताने पत्र

Nanded News : अशोक चव्हाण यांचे स्वप्न उतरणार सत्यात? ‘विकसित नांदेडचा संकल्पनामा’चा प्रकाशन सोहळा पार
3

Nanded News : अशोक चव्हाण यांचे स्वप्न उतरणार सत्यात? ‘विकसित नांदेडचा संकल्पनामा’चा प्रकाशन सोहळा पार

Sunil Tingre : निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराचा अर्ज ठेवला जाणार
4

Sunil Tingre : निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराचा अर्ज ठेवला जाणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.