Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shaktipeeth highway : इच्छामरणाची परवानगी द्या! शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे रक्ताने पत्र

शक्तिपीठ महामार्ग कायमचा रद्द व्हावा या मागणीसाठी बाधित शेतकऱ्यांनी आपल्या रक्ताने लिहिलेल्या निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे सामूहिक इच्छा मरणाची इच्छा व्यक्त केली.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 02, 2026 | 06:03 PM
Farmers write a letter in blood to the CM Fadnavis demanding Shaktipeeth highway permanently cancel

Farmers write a letter in blood to the CM Fadnavis demanding Shaktipeeth highway permanently cancel

Follow Us
Close
Follow Us:

Shaktipeeth highway : नांदेड : नववर्षाच्या प्रारंभ दिनाचा जल्लोष सर्वत्र साजरा होत असताना शक्तिपीठ महामार्ग कायमचा रद्द व्हावा या मागणीसाठी बाधित शेतकऱ्यांनी आपल्या रक्ताने लिहिलेल्या निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे सामूहिक इच्छा मरणाची परवानगी देण्यासाठी नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यां मार्फत निवेदन सादर केले आहे.

नांदेड जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी पूर्ण व अप्पर पेनगंगा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील सुपीक बागायती जमीन वाचविण्यासाठी गेली पावणेदोन वर्षे निकराचा लढा देत आहे. अर्धापूर तालुक्यातील जमिनी मधील केळी व हळद ही पिके विदेशात निर्यात होतात. अशा या समृद्ध परिसरातील शेती व शेतकरी उध्वस्त होण्याची भीती असून स्थानिक रोजगारावरही यामुळे संकट निर्माण होण्याचा धोका आहे. अशा या गंभीर संकटामुळे शेतकऱ्यांनी टोकाचा निर्णय घेतला आहे.

हे देखील वाचा : तुमच्या मुलाला एकटं राहायला आवडतं का? घाबरू नका, कदाचित तो असू शकतो पुढचा ‘एलोन मस्क’

२०० हून अधिकाऱ्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या

या महामार्गासाठी आरेखन व मोजणी करण्याच्या उद्देशाने आलेल्या पथकास – शेतकऱ्यांनी अनेक वेळा संघटितरित्या विरोध करून परतवून लावले असूनही – शासन अजूनही मोजणीस्सठी दमनकारी मार्गाने प्रयत्नशील आहे. या निवेदनावर शक्तिपीठ महामार्ग विरोधी – कृती समितीचे समन्वयक सुभाष मोरलवार, सतीश कुलकर्णी गजानन तीमेवार, प्रमोद इंगोले, कचरू मुधळ, अधिकाऱ्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. यांच्यासह विठ्ठलराव गरुड, पराग अडकिने, प्रदीप गावंडे, ज्ञानोबा हाके, अनिल चव्हाण, बापूराव ढोरे, ईश्वर सवंडकर, दिलीप कराळे, धोंडीराम कल्याणकर, सतीश देसाई, बालाजी इंगोले, सुभाष कदम, तुकाराम खुर्दा मोजे, सोनाजी बुट्टे, माधव इंगोले, शंकर तिमेवार, सुरज मालेवार, आनंदराव नादरे, दिलीप भिसे यांच्यासह बाधित शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

हे देखील वाचा : महापालिका निवडणुकीत मोठा ट्वीस्ट; मनसेचे दोन उमेदवार नॉट रिचेबल, कालपासून एकही फोन नाही

अपघात रोखण्यासाठी काम करावे

दैनंदिन जीवनात घडणाऱ्या अपघातांमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होत आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाने वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. तसेच रस्ते अपघात रोखण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. वाहन अपघातांना आळा बसावा तसेच नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने दरवर्षी संपूर्ण देशभरात रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते. यावर्षी रस्ता सुरक्षा अभियान २०२६ हे १ जानेवारी ते ३१ जानेवारी कालावधीत परिवहन या विभागामार्फत राबविण्यात येत असून, या अभियानाचा शुभारंभ आज प्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेड येथे करण्यात आला.

धोकादायक वाहनामुळे होणाऱ्या अपघातावर नियंत्रण

या उद्‌घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले होते. तसेच पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार आणि नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी कर्डिले यानी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करून रस्ते अपघात कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना दिल्या. नांदेड जिल्ह्यात डंपर व हायवा वाहनांच्या धोकादायक वाहनचालनामुळे होणाऱ्या अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

Web Title: Farmers write a letter in blood to the cm fadnavis demanding shaktipeeth highway permanently cancel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2026 | 06:03 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • nanded news
  • Shaktipeeth Highway

संबंधित बातम्या

Nanded News : अशोक चव्हाण यांचे स्वप्न उतरणार सत्यात? ‘विकसित नांदेडचा संकल्पनामा’चा प्रकाशन सोहळा पार
1

Nanded News : अशोक चव्हाण यांचे स्वप्न उतरणार सत्यात? ‘विकसित नांदेडचा संकल्पनामा’चा प्रकाशन सोहळा पार

“जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहे तोवर…”; Akhil Bhartiya Sahitya संमेलनात मुख्यमंत्री स्पष्टच बोलले
2

“जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहे तोवर…”; Akhil Bhartiya Sahitya संमेलनात मुख्यमंत्री स्पष्टच बोलले

मुख्यमंत्री फडणवीसांसह रविंद्र चव्हाणही आज कोल्हापुरात; प्रचाराचा करणार शुभारंभ
3

मुख्यमंत्री फडणवीसांसह रविंद्र चव्हाणही आज कोल्हापुरात; प्रचाराचा करणार शुभारंभ

Maharashtra Politics : भाजपाकडून निष्ठावंत बेदखल! ऐनवेळी शिंदे शिवसेनेत, राष्ट्रवादीत अनेकांनी केला प्रवेश
4

Maharashtra Politics : भाजपाकडून निष्ठावंत बेदखल! ऐनवेळी शिंदे शिवसेनेत, राष्ट्रवादीत अनेकांनी केला प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.