cm devendra fadnavis target uddhav thackeray political news
जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगाव दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी फडणवीस यांनी आज धरणगाव येथे क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृती मंदिर येथे पुष्पांजली अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे भव्य उदघाट देखील केले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधून अभिवादन केले. त्याचबरोबर अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय विषयांवर भाष्य केले आहे.
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी महायुती आणि भाजपवर जोरदार टीका केली. यावरुन आता भाजपच्या नेत्यांनी देखील प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना प्रमुखांचा ब्रॅंड पुसून टाकण्याचा प्रयत्न केला तर भाजपचे महाराष्ट्रात नामोनिशाण मिटवून टाकू असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, बोलबच्चन भैरवींना मी उत्तर देत नाहीत, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात आदिवासी समाजाचे मोठे योगदान राहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व आदिवासी स्वातंत्र्य सेनानींचा गौरव झाला पाहिजे, यासाठी वेगवेगळे कार्यक्रम काही वर्षांपासून हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून क्रांतिकारी नाईक यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनासाठी यापूर्वी धरणगावात आलो होतो. आता स्मारकाच्या उद्घाटनाची संधीही मिळाली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
गोपीचंद पडळकर यांनी देखील उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “आज देशात हिंदुत्वाच वातावरण तयार झालं आणि त्यातच उद्धव ठाकरे यांनी असं बोलणं हे दुर्देवाची बाब आहे. उद्धव ठाकरे यांना शोभत नाही. त्यांनी मताच्या राजकारणासाठी दाढ्या कुरवाळणा बंद करावं” अशी बोचरी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. “उद्धव ठाकरे यांना घरात बसायची वेळ भाजपमुळे आली आहे. लोकांनी 2024 ला त्याचा वाचपा काढला आणि भाजपला निवडून दिले. उद्धव ठाकरेंना रोज चार लोक सोडून जातात, त्यामुळे त्यांची मानसिकता खचली आहे. तुम्ही पण उद्धव ठाकरेंकडे जास्त लक्ष देऊ नका. उद्धव ठाकरे यांच्या घरी रोज लाल दिव्याच्या गाड्या जायच्या, आज त्यांच्या घरी कोणीही जात नाही. त्यामुळे आता भाजपचे माप काढण्यात वेळ वाया घालवू नये,” असा टोला गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.