
कॉँग्रेस नेते उदित राज यांची संघावर टीका
सरसंघचालकांच्या विधानावर घेतला आक्षेप
सरसंघचालकांचे विधान संविधानाच्या विरोधात असल्याची टीका
नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू राष्ट्राबाबत केलेल्या विधानावर कॉँग्रेस नेते उदित राज यांनी जोरदार टीका केली आहे. मोहन भागवत यांनी हिंदुस्तान हिंदू राष्ट्र असल्याचे विधान केले होते. यावर आता कॉँग्रेस नेते उदित राज यांनी मोहन भागवत यांना खुले आव्हान दिले आहे. हिंदू राष्ट्र असे काही नसून मोहन भागवत यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी हिंदू राष्ट्र करून दाखवावे.
काय म्हणाले होते सरसंघचालक डॉ. मोहन भागवत?
सूर्य रोज पूर्वेला उगवतो. ही क्रिया कधीपासून सुरू आहे हे आपल्याला माहिती नाही. मग यासाठी देखील आपल्याला सांविधानिक मान्यता घेणे आवश्यक आहे का? भारत हिंदू राष्ट्र आहे. जो कोणी भारताला आपली माता मानतो आणि येथील संस्कृतीचा आदर करतो, जो आपल्या पूर्वजांचा गौरव ओळखतो असा एक व्यक्ती पृथ्वीवर जिवंत आहे तोवर, भारत एक हिंदू राष्ट्र आहे. ही संघाची विचारसरणी आहे.
उदित राज यांची टीका काय?
उदित राज यांनी मोहन भागवत यांच्या हिंदू राष्ट्र या विधानावर टीका केली आहे. त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना खुले आव्हान दिले आहे. सरसंघचालकांचे विधान संविधानविरोधी असल्याचे ते म्हणाले. हिंदू राष्ट्र आहे ही कल्पना चुकीची आहे. भागवत यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी हे करायला हवे. आतापर्यंत त्यांनी दुसऱ्यांना म्हणायला लावले. आता स्वतः मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ही अत्यंत चुकीचे, आक्षेपार्ह आणि संविधानविरोधी आहे.
मोहन भागवत यांनी स्पष्टच सांगितलं
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्याख्यानमालेमध्ये बांगलादेशमधील हिंदूवरील हल्ल्यांवर प्रतिक्रिया दिली. मोहन भागवत म्हणाले की, बांगलादेशमधील हिंदू अल्पसंख्याक आहेत. तेथील परिस्थिती कठीण आहे. परंतु अथा कठीण परिस्थितीत सुरक्षिततेसाठी तिथल्या हिंदूंनी एकजूट राहायला हवे. जगातील हिंदूंनी त्यांना मदत केलीच पाहिजे.” असे मत संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे.
पुढे ते म्हणाले, “आपल्याला करता येण्यासारखे जे काही आहे, ते आपण केले पाहिजे आणि आपण ते करत आहोत. भारत सरकारला बांगलादेशातील हिंदूसाठी काहीतरी करावे लागेल. कदाचित ते करतही असतीत काही गोष्टी समोर येतात, काही गोष्टी समोर येत नाहीत, कधी परिणाम दिसतात, तर कधी दिसत नाहीत. पण, त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे, असे सूचक वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.