Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेस नेते वडेट्टीवारांचे खुद्द भाजप प्रदेशाध्यक्षांनीच केलं कौतुक; राजकीय चर्चांना उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने बांधावर गेले. पूरग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. अशा प्रसंगात सर्वच जण आपआपल्या परीने मदत करतात.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 26, 2025 | 02:59 PM
भाजप प्रदेशाध्यक्षांकडून वडेट्टीवारांचे कौतुक

भाजप प्रदेशाध्यक्षांकडून वडेट्टीवारांचे कौतुक

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचे आमदार एक महिन्याचे वेतन देणार, अशी घोषणा केली. मात्र, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी सहा महिन्यांचे वेतन देण्याची घोषणा करून स्वतःच्या पक्षातील आमदारांचेच नव्हे तर सत्ताधारी आमदारांचेही टेन्शन वाढवले आहे. यावरून आता राजकारण होण्याची शक्यता असून, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माध्यमातून वडेट्टीवारांचे अभिनंदन केले. मात्र, सर्वच आमदार त्यांच्यासारखे गडगंज नसतात, अशी टिप्पणीही केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने बांधावर गेले. पूरग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. अशा प्रसंगात सर्वच जण आपआपल्या परीने मदत करतात. परिस्थिती गंभीर आणि नाजूक आहे. ती हाताळताना सर्वांनाच काळजी घेण्याची गरज आहे. उलटसुलट वक्तव्य करणे सर्वांनीच टाळले पाहिजे. राजकारण आणि कुरघोडी करण्याची ही वेळ नाही, अशा शब्दांत रवींद्र चव्हाण यांनी विरोधकांना कानपिचक्या दिल्या.

हेदेखील वाचा : Anjali Damania On Nitin Gadkari Fraud : अंजली दमानियांचा नितीन गडकरींवर पहिलाच मोठा आरोप; प्रत्येक किलोमीटर मागे पैसे खात..”

दरम्यान, वडेट्टीवारांनी सहा महिन्यांचे वेतन द्यायचे ठरवले असले तरी त्यावर आपत्ती घेण्याचे कारण नाही. मात्र, हे करताना सर्वच आमदार वा लोकप्रतिनिधी गडगंज नाहीत, हे सुद्धा लक्षात घ्यावे, याकडेही रवींद्र चव्हाण यांनी लक्ष वेधले.

ग्रामीण भागातील आमदारांना सातत्याने फिरावे लागते

वडेट्टीवारांच्या घोषणेवर रवींद्र चव्हाण म्हणाले, त्यांनी सहा महिन्यांचे वेतन द्यायचे ठरवले. त्याबद्दल वडेट्टीवारांचे अभिनंदन. मात्र, लोकप्रतिनिधींना प्रवास भत्त्यासाठी वेतन मिळत असते. ग्रामीण भागातील आमदारांना सातत्याने फिरावे लागते. वडेट्टीवार यांची भावना चांगली असली तर अशा प्रसंगी राजकारण करणे योग्य नाही.

काही लोकप्रतिनिधी प्रचंड गडगंज

काही लोकप्रतिनिधी प्रचंड गडगंज असतात, तर दुसरीकडे ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींना प्रवास भत्ता अपुरा पडतो. त्यांना इतर कामांसाठी स्वतः व्यवस्था करावी लागते. राज्यातील नैसर्गिक संकट मोठे आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांना सरकार मदत देणारच आहे. यात काही शंका नाही, असे ते म्हणाले.

Web Title: Congress leader vijay wadettiwar was praised by the bjp state president ravindra chavan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2025 | 02:59 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • political news
  • Ravindra Chavan
  • Vijay wadettiwar

संबंधित बातम्या

ठाण्यात भाजपला मोठा धक्का; रवींद्र चव्हाणांच्या कार्यपद्धतीला कंटाळून 5 नगरसेवकांनी उचलले मोठे पाऊल
1

ठाण्यात भाजपला मोठा धक्का; रवींद्र चव्हाणांच्या कार्यपद्धतीला कंटाळून 5 नगरसेवकांनी उचलले मोठे पाऊल

Sanjay Raut On Bihar Elections : “हा तर ‘एकदम महाराष्ट्र पॅटर्न! बिहार निवडणुकीच्या निकालावर खासदार संजय राऊतांची टीका
2

Sanjay Raut On Bihar Elections : “हा तर ‘एकदम महाराष्ट्र पॅटर्न! बिहार निवडणुकीच्या निकालावर खासदार संजय राऊतांची टीका

Supriya Sule: महाराष्ट्रामध्ये राजकीय हालचालींना वेग; खासदार सुप्रिया सुळे वर्षा बंगल्यावर दाखल, कारण काय?
3

Supriya Sule: महाराष्ट्रामध्ये राजकीय हालचालींना वेग; खासदार सुप्रिया सुळे वर्षा बंगल्यावर दाखल, कारण काय?

आगामी निवडणुकीसाठी राज्यात महायुती; नगरपालिकेची निवडणूक होणार अधिक चुरशीची
4

आगामी निवडणुकीसाठी राज्यात महायुती; नगरपालिकेची निवडणूक होणार अधिक चुरशीची

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.