जगदीप धनखडांबाबत कपिल सिब्बल यांचे मोठे विधान (फोटो सौजन्य - Instagram)
राज्यसभा खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी शनिवारी अर्थात ९ ऑगस्ट २०२५ रोजी माजी राष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारताचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड राजीनामा दिल्यापासून बेपत्ता आहेत. त्यांच्या ठावठिकाणाबद्दल काहीही माहिती नाही. त्याच वेळी, जगदीप धनखड यांच्याबद्दल बोलताना सिब्बल यांनी गृह मंत्रालयावरही टीका केली आहे.
काँग्रेस खासदार आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यावेळी म्हणाले की, “माजी उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांच्या राजीनाम्यानंतर, आम्हाला त्यांच्या ठावठिकाणाबद्दल काहीही माहिती नाही. मी आधी ‘लापता लेडीज’ या हिंदी चित्रपटाबद्दल ऐकले होते, परंतु ‘बेपत्ता’ उपराष्ट्रपतींबद्दल मी पहिल्यांदाच ऐकले आहे.”
विरोधकांना माजी उपाध्यक्षांचे संरक्षण करावे लागेल- सिब्बल
याशिवाय कपिल सिब्बल हे राज्यसभेत पुढे म्हणाले की, “आता असे दिसते की विरोधकांना त्यांचे माजी उपाध्यक्ष जगदीश धनखड यांचे संरक्षण करावे लागेल. मी त्यांना आधी फोन केला होता; त्यांच्या वैयक्तिक सचिवांनी (पीए) फोन उचलला आणि सांगितले की ते सध्या आराम करत आहेत. त्यानंतर कोणीही फोन उचलला नाही, हे अगदीच बुचकळ्यात टाकण्यासारखे आहे
जगदीप धनखड कोणाचाही फोन उचलत नाहीत
त्याचवेळी काँग्रेस खासदार यांनी खुलासा करत म्हटले की, “इतर अनेक नेत्यांनाही असाच अनुभव असून त्यांनीही असेच म्हटले आहे की, जगदीप धनखड फोन उचलत नाहीत. मग आपण काय करावे? आपण हेबियस कॉर्पस दाखल करावे की आणखी काही? गृहमंत्रालयाला या संदर्भात माहिती मिळाली असेल, म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यावर निवेदन द्यावे.” “मला माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची काळजी वाटते.” असेही त्यांनी यावेळी आवर्जून म्हटले आहे.
जगदीप धनखड यांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या राजीनाम्यामागे बिहार कनेक्शन? ‘या’ बाबी ठरताहेत चर्चेचं कारण…
नक्की काय घडले होते?
जगदीप धनखड यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी गेल्या महिन्यात २१ जुलै रोजी अचानक आपल्या पदाचा राजीनामा जाहीर केला. २१ जुलै रोजी संसदेत पावसाळी अधिवेशन सुरू झाले. राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून पहिल्या दिवसाच्या कामकाजासाठी जगदीप धनखड देखील सभागृहात उपस्थित होते.
परंतु पहिल्या दिवसाचे कामकाज संपल्यानंतर, २१ जुलै २०२५ च्या रात्री जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा जाहीर केला आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राजीनामा पाठवला आणि सांगितले की ते तात्काळ आपले पद सोडणार आहेत आणि त्यांचा राजीनामा त्वरीत स्वीकारण्यात आला होता. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी या निर्णयावर नाराज असल्याचेही सांगण्यात आले होते.
उपराष्ट्रपती पदावरुन जगदीप धनखड का झाले पायउतार? राजीनाम्याबाबत संशयाचा वास