Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhava Movie : ‘छावा’ करमुक्त का करत नाही? काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट सवाल

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी पुन्हा एकदा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 23, 2025 | 04:32 PM
Congress president Harshvardhan Sapkal demands Chhava movie tax free in Maharashtra

Congress president Harshvardhan Sapkal demands Chhava movie tax free in Maharashtra

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट देशभरामध्ये धुमाकूळ घातल आहे. प्रेक्षकांनी चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा चित्रपटाने कोट्यवधी रुपयांची कमाई केली असून अभिनेता विकी कौशलच्या अभिनयाचे देखील कौतुक केले जात आहे. दरम्यान, छावा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी समोर येत आहे. याबाबत कॉंग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. छावा चित्रपटाबाबत मत मांडताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, छावा चित्रपट कादंबरीवर आधारित आहे. त्याला सगळे संदर्भ आहेत. ही कादंबरी एक ठेवा आहे. या कादंबरीवर चित्रपट असेल तर त्यावर कुठलाही आक्षेप नोंदवण्याची गरज नाही. मी काँग्रेसतर्फे हा चित्रपट करमुक्त करण्याची विनंती शासनाला केली होती. पण त्यावर काही झाले नाही असा गंभीर आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे ते म्हणाले की, “छत्रपती संभाजी राजे यांची बदनामी सावरकर, गोळवलकर गुरुजी आणि चिटणीस यांची बखर यात मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. या बदनामीचा समर्थन म्हणून फडणवीस हा चित्रपट करमुक्त करत नाही,” असा गंभीर आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

पुण्यामध्ये लवकरच राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. पुण्यातील कॉंग्रेस नेते व माजी आमदार रवींद्र धंगेकर हे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. याबाबत हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे नेते आहेत. ते वैक्तिक कामासाठी एकनाथ शिंदे यांना भेटले. त्यांनी स्टेटसवर भगवा ठेवला तर गैर काय? माझे त्यांच्याशी बोलणे झाले, ते काँग्रेस सोडून कुठे जाणार नाहीत, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले. बेळगावसह इतर गावांसंदर्भात महाराष्ट्र कर्नाटकमध्ये जुना वाद आहे. यावर तोडगा निघाला पाहिजे. महाराष्ट्र एकीकरण समितीची आणि काँग्रेसची भूमिका एकच आहे,” असे मत हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

महाराष्ट्रात ‘छावा’ चित्रपट टॅक्स फ्री करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, “छावा’ सिनेमा टॅक्स फ्री करा, अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. पण, मला महाराष्ट्रातील जनतेला सांगायतंय की, इतर राज्य जेव्हा चित्रपट टॅक्स फ्री करतात, तेव्हा जो करमणूक कर असतो, तो माफ केला जातो. महाराष्टानं 2017 सालीच यासंदर्भातला निर्णय घेतला आणि महाराष्ट्रात करमणूक कर हा नेहमी‍करिता रद्द केला. आपल्याकडे करमणूक कर नाही. त्यामुळे अशी माफी देण्यासाठी असा करच आपल्याकडे नाही.”, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Congress president harshvardhan sapkal demands chhava movie tax free in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2025 | 04:32 PM

Topics:  

  • Chhaava Movie
  • Congress
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

Rahul Gandhi News: १६ दिवस आणि २३ जिल्हे, १३०० किमी; राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू
1

Rahul Gandhi News: १६ दिवस आणि २३ जिल्हे, १३०० किमी; राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू

पंतप्रधान मोदींकडून ‘RSS’ चं कौतुक! त्रास मात्र काँग्रेसला; खासदाराने संघाला दिली ‘तालिबान’ची उपमा
2

पंतप्रधान मोदींकडून ‘RSS’ चं कौतुक! त्रास मात्र काँग्रेसला; खासदाराने संघाला दिली ‘तालिबान’ची उपमा

भाजपला मोठा धक्का; माजी मंत्र्याचा काँग्रेस पक्षात प्रवेश
3

भाजपला मोठा धक्का; माजी मंत्र्याचा काँग्रेस पक्षात प्रवेश

Bihar Assembly Election 2025 : महाराजगंज जागा कोण जिंकणार? जाणून घ्या या जागेचा निवडणूक इतिहास
4

Bihar Assembly Election 2025 : महाराजगंज जागा कोण जिंकणार? जाणून घ्या या जागेचा निवडणूक इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.