Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महायुतीमध्ये श्रेयवादाची चढाओढ कायम? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पूर्ण नाव घेण्याच्या सूचना

राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. महायुतीच्या नेत्यांनी लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार सुरु आहे. मात्र योजना नक्की कोणाची ही यावरुन महायुतीच्या नेत्यांमध्ये चढाओढ सुरु आहे. यावर आता मंत्री शंभुराज देसाई यांनी आपली भूमिका स्पष्टी केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 13, 2024 | 02:38 PM
महायुतीच्या नेत्यांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध

महायुतीच्या नेत्यांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. महायुती व महाविकास आघाडी मधील सर्व घटक पक्षांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. महायुतीने प्रचार करताना लाडकी बहीण योजनेचा पुरेपर प्रचार सुरु केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार हे लाडकी बहीण योजनाची जोरदार जाहिरातबाजी करत आहेत. मात्र योजनेमुळे महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. लाडकी बहीण नक्की अजित पवारांची, एकनाथ शिंदेंची की देवेंद्र फडणवीसांची असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर आता मंत्री शंभूराज देसाई यांनी महायुतीच्या नेत्यांना स्पष्टपणे सूचना दिल्या आहेत.

काय म्हणाले शंभूराज देसाई?

मंत्री शंभूराज देसाई यांनी पुण्यामध्ये दगडूशेठ गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या उल्लेखावरुन निशाणा साधला. महायुतीमधील नेते अजित पवार हे योजनेचा उल्लेख करताना मुख्यमंत्री शब्द वापरत नसल्यामुळे त्यांना हा अप्रत्यक्ष टोला लगावला आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. शंभूराज देसाई म्हणाले की, कालपासून इतर लोकही हे नाव घ्यायला लागले आहेत. नवीन योजना होती. त्यामुळे बऱ्याचदा अनावधानाने फक्त लाडकी बहीण योजना असं नाव घेतलं जायचं. पण आता महायुतीतले सगळे पक्ष या योजनेचा उल्लेख करताना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ असा करत आहेत. महिलांना जर विचारलं की ही योजना कुणी आणली? तर त्या स्पष्ट सांगत आहेत की एकनाथ शिंदेंनी आणली. त्यामुळे महिलांमध्ये हे नक्की आहे की ही योजना एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं आणली आहे, असे मत शुंभराज देसाई यांनी व्यक्त केले.

या प्रकरणाची चौकशी

पुढे ते म्हणाले की, अशा प्रकरणांची चौकशी चालू आहे. महिला लाभापासून वंचित राहू नयेत, यासाठी सरकारी विभागातील कर्मचाऱ्यांना फॉर्म भरण्यासाठी नेमलं होतं. पण जेव्हा अशा बाबी लक्षात आल्या, तेव्हा फक्त अंगणवाडी सेविकांच्या मार्फतच फॉर्म भरून घेतले जातील, असं नियोजन केलं आहे. ज्यांनी कुणी एवढ्या चांगल्या योजनेत चुकीची नावं, फॉर्म भरून, फोटो लावून गैरप्रकार केलेत, त्याची चौकशी करण्याचे आदेश सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी माहिती देखील शंभूराज देसाई यांनी दिली आहे.

Web Title: Credit war continues over mazi ladki bahin yojana in mahayuti mukhymantri ladki bahin yojana scemes full name should be taken

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2024 | 02:38 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Eknath Shinde

संबंधित बातम्या

Shiv Sena Symbol Dispute : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
1

Shiv Sena Symbol Dispute : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश

Thackeray-Shinde Dispute: एकनाथ शिंदे….; शिवसेना पक्षचिन्हाच्या अंतिम सुनावणीपूर्वीच असीम सरोदेंचे गंभीर आरोप
2

Thackeray-Shinde Dispute: एकनाथ शिंदे….; शिवसेना पक्षचिन्हाच्या अंतिम सुनावणीपूर्वीच असीम सरोदेंचे गंभीर आरोप

Ajit Pawar News: अजित पवारांनी छगन भुजबळांना झापलं… ; बैठकीत नेमकं काय घडलं?
3

Ajit Pawar News: अजित पवारांनी छगन भुजबळांना झापलं… ; बैठकीत नेमकं काय घडलं?

‘स्मार्ट सुनबाई’ प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पोस्टरचं अनावरण
4

‘स्मार्ट सुनबाई’ प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पोस्टरचं अनावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.