Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजप- शिवसेनेत जुंपली! पाणीपुरवठा, मेट्रो प्रकल्पाचे श्रेय भाजपला, एकनाथ शिंदेंचे Mira Bhayandarसाठी योगदान काय?

Mira Bhayandar Politics : मिरा-भाईंदरमधील विकासकामांच्या श्रेयावरून भाजप आणि शिवसेनेतील राजकीय संघर्ष चिघळला आहे. भाजप नेते नरेंद्र मेहता यांनी पाणीपुरवठा आणि मेट्रो प्रकल्पाचे श्रेय भाजपला देत शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, एकनाथ शिंदे यांचे मिरा-भाईंदरसाठी नेमके योगदान काय?

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 23, 2026 | 12:16 PM
भाजप- शिवसेनेत जुंपली! पाणीपुरवठा, मेट्रो प्रकल्पाचे श्रेय भाजपला, एकनाथ शिंदेंचे मिरा-भाईंदरसाठी योगदान काय?

भाजप- शिवसेनेत जुंपली! पाणीपुरवठा, मेट्रो प्रकल्पाचे श्रेय भाजपला, एकनाथ शिंदेंचे मिरा-भाईंदरसाठी योगदान काय?

Follow Us
Follow Us:
  • भाजप- शिवसेनेत जुंपली!
  • पाणीपुरवठा, मेट्रो प्रकल्पाचे श्रेय भाजपला
  • एकनाथ शिंदेंचे मिरा-भाईंदरसाठी योगदान काय?
  • नरेंद्र मेहतांचा थेट सवाल
विजय काते, भाईंदर : मिरा-भाईंदर शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या मेट्रो आणि सूर्या पाणीपुरवठा प्रकल्पांचे श्रेय भाजपला देत भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मिरा-भाईंदर शहरासाठी पाणी आणि मेट्रोसारखे महत्त्वाचे प्रकल्प भाजपच्या प्रयत्नांमुळेच मार्गी लागले असून, या प्रकल्पांमध्ये शिवसेनेचे नेमके योगदान काय, असा थेट सवाल मेहता यांनी उपस्थित केला. विशेष म्हणजे, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याने महायुतीतील अंतर्गत राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.(Mira Bhayandar Politics)

मिरा-भाईंदर भाजपच्या वतीने दिवाळी स्नेहसंमेलन आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन रविवारी भाईंदर येथील सेव्हन इलेव्हन जिमखाना मैदानावर करण्यात आले होते. या मेळाव्याला भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आमदार नरेंद्र मेहता यांनी शहरातील विकासकामांसह सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. आपल्या भाषणातून त्यांनी शिवसेनेच्या विकासकामांमधील भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपच्या योगदानाचा पाढाच वाचला.

Navi Mumbai News: आधुनिक नवी मुंबईत संस्कृतीचा वारसा कायम; तुर्भेसह विविध गावठाणांत तुळशी विवाह साजरा

८६ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा मंजूर

मेहता म्हणाले की, मिरा-भाईंदर शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे पाणीपुरवठ्याचा प्रश्न सातत्याने गंभीर होत होता. शहराला स्टेम प्राधिकरणाकडून मिळणाऱ्या पाण्याव्यतिरिक्त एमआयडीसीकडून अतिरिक्त ८६ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा मंजूर करण्यात आला होता. २०१४ मध्ये हा निर्णय झाला, त्यावेळी राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार होते. त्यावेळी एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत होते आणि राज्यात विरोधी पक्षाच्या भूमिकेत होते, असे सांगत त्यांनी तत्कालीन राजकीय परिस्थितीची आठवण करून दिली.

यानंतर शहराची वाढती पाण्याची गरज लक्षात घेऊन सूर्या पाणीपुरवठा प्रकल्प हाती घेण्यात आला. या प्रकल्पासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुमारे १ हजार ८०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता, असे मेहता यांनी नमूद केले. त्यामुळे मिरा-भाईंदरच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने भाजपने महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा त्यांनी केला.

मेट्रो प्रकल्पावरूनही शिवसेनेला लक्ष्य

पाणीपुरवठा प्रकल्पानंतर नरेंद्र मेहता यांनी मिरा-भाईंदर मेट्रो प्रकल्पाचा मुद्दा उपस्थित केला. मेट्रो प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या वेळी शिवसेनेने विरोधाची भूमिका घेतली होती, असा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन होत असतानाही शिवसेनेने कार्यक्रमावर बहिष्कार घालत आंदोलन केले होते, असे त्यांनी सांगितले.

दोन्ही पक्ष सध्या महायुतीमध्ये सत्तेत

विशेष म्हणजे, राज्यात भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष सध्या महायुतीमध्ये सत्तेत सहभागी आहेत. मात्र, मिरा-भाईंदरमध्ये भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि शिवसेनेचे परिवहन मंत्री तथा स्थानिक नेते प्रताप सरनाईक यांच्यात विविध मुद्द्यांवरून सातत्याने राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. स्थानिक पातळीवरील हा वाद आता थेट राज्यातील नेतृत्वापर्यंत पोहोचत असल्याचे या भाषणातून स्पष्ट संकेत मिळत आहेत. मेहता यांनी विकासकामांचे श्रेय भाजपला देताना शिवसेनेच्या भूमिकेवर केलेली टीका ही केवळ स्थानिक राजकीय वक्तव्य नसून, महायुतीतील दोन्ही पक्षांमधील अंतर्गत मतभेदांचे प्रतिबिंब असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

एकीकडे महायुती म्हणून दोन्ही पक्ष एकत्र सत्तेत असताना दुसरीकडे मिरा-भाईंदरमध्ये विकासकामांच्या श्रेयावरून सुरू असलेला संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. त्यामुळे नरेंद्र मेहता यांच्या या वक्तव्याला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, शिवसेनेकडून यावर काय प्रतिक्रिया दिली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Harshwardhan Sapkal : वाढवण बंदर कायमचे रद्द करा! हर्षवर्धन सपकाळांची महायुती सरकारकडे मोठी मागणी

💡

Frequently Asked Questions

  • Que: नरेंद्र मेहता यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत कोणता सवाल उपस्थित केला?

    Ans: एकनाथ शिंदे यांचे मिरा-भाईंदर शहराच्या विकासासाठी नेमके काय योगदान आहे, असा थेट सवाल नरेंद्र मेहता यांनी उपस्थित केला.

  • Que: मिरा-भाईंदरमधील कोणत्या विकासकामांच्या श्रेयावरून वाद सुरू आहे?

    Ans: शहरातील पाणीपुरवठा आणि मेट्रो प्रकल्पाच्या श्रेयावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये राजकीय संघर्ष सुरू आहे.

  • Que: नरेंद्र मेहता यांच्या टीकेचा रोख कोणाकडे आहे?

    Ans: नरेंद्र मेहता यांच्या टीकेचा रोख शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक आणि राज्याचे नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याचे राजकीय चित्र दिसत आहे.

Web Title: Eknath shinde contribution mira bhayandar narendra mehta question sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • mira bhayandar
  • Narendra Mehta
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

Political News : ‘१५० कोटींचा भाव’ कसा सुरू होतो? संजय राऊतांच्या दाव्यावर प्रताप सरनाईकांचा घणाघात
1

Political News : ‘१५० कोटींचा भाव’ कसा सुरू होतो? संजय राऊतांच्या दाव्यावर प्रताप सरनाईकांचा घणाघात

अभिमानास्पद! अडचणी आल्या, पण जिद्द सोडली नाही; मीरा-भाईंदरच्या रेश्मा कुटे बनल्या पहिल्या महिला फुल आयर्नमॅन
2

अभिमानास्पद! अडचणी आल्या, पण जिद्द सोडली नाही; मीरा-भाईंदरच्या रेश्मा कुटे बनल्या पहिल्या महिला फुल आयर्नमॅन

Maharashtra Politics : भरत गोगावलेंनी मंत्रिपदाची ऑफर दिली अन् दुसऱ्याच दिवशी शिंदें थेट आमदाराच्या घरी! पंढरपुरात नेमकं काय घडलं?
3

Maharashtra Politics : भरत गोगावलेंनी मंत्रिपदाची ऑफर दिली अन् दुसऱ्याच दिवशी शिंदें थेट आमदाराच्या घरी! पंढरपुरात नेमकं काय घडलं?

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने एकनाथ शिंदेंची सपत्नीक शासकीय महापूजा; शिंदेंकडून तब्बल ‘इतक्या’ तोळ्यांचा हार विठूरायाला अर्पण
4

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने एकनाथ शिंदेंची सपत्नीक शासकीय महापूजा; शिंदेंकडून तब्बल ‘इतक्या’ तोळ्यांचा हार विठूरायाला अर्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.