Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cabinet portfolio : उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकारवरच वैतागले…; म्हणाले,”अरे गप्प बसा ना बाबा”

मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आठवड्याभरानंतर आता खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. अनेक नेत्यांच्या जबाबादारीमध्ये बदल करण्यात आला आहे. याबाबत पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 22, 2024 | 10:47 AM
Cabinet portfolio : उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकारवरच वैतागले…; म्हणाले,”अरे गप्प बसा ना बाबा”
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीमुळे जोरदार राजकारण रंगले आहे. नुकतेच राज्याचे हिवाळी अधिवेशन पार पडले आहे. निवडणुकीनंतर हे पहिलेच अधिवेशन असल्यामुळे राजकीय टीका टिप्पणी करण्यात आली. तसेच सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधकांनी आंदोलन देखील केले. याच दरम्यान, महायुतीकडून खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप जाहीर कधी होणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती. यानंतर आता खातेवाटप जाहीर करण्यात आले असून अनेक मंत्र्यांची खांदेपालट करण्यात आली आहे. या खातेवाटपाबाबत प्रश्न विचारल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे पत्रकारांवर वैतागले आहेत.

अजित पवार यांनी ठाण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. अजित पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी, विधानसभेचे आमदार राजेश विटेकर आणि प्रताप पाटील चिखलीकर हे देखील उपस्थित होते. पत्रकारांनी महायुतीच्या खातेवाटपासंदर्भात अजित पवार यांना प्रश्न विचारला. मात्र त्यांच्या या प्रश्नांमुळे अजित पवार हे वैतागले असल्याचे दिसून आले.

नागपूर हिवाळी अधिवेशनासंबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अजित पवार काल (दि.21) रात्री ठाण्यातील एका कार्यक्रमासाठी आले होते. ते गाडीतून उतरताच कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असल्याचे दिसून आले. तसेच अनेक पत्रकारांनी देखील अजित पवारांवर प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी पत्रकारांनी मंत्र्यांचे खाते वाटप जाहीर झाल्याबाबत प्रश्न विचारला, तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार संतापल्याचे पहायला मिळाले. या प्रश्नाला उत्तर देताना, “अरे गप्प बासा ना बाबा “, असे म्हटल्याचे ऐकू येत आहे. त्यामुळे अजित पवार हे खातेवाटपाच्या प्रश्नावर संतापले असल्याचे दिसून आले.

राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महायुतीला यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकतर्फी यश मिळाले. मात्र मुख्यमंत्रिपद व इतर बोलणी सुरु असल्यामुळे सत्तास्थापनेला उशीर झाला. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाराजीनाट्य सुरु होते. सत्तास्थापन झाल्यानंतर देखील मंत्रिमंडळ विस्तारावरुन देखील महायुतीमध्ये वादंग झाला. नावे जाहीर झाल्यानंतर अनेक जेष्ठ नेते नाराज असल्याचे दिसून आले. यामध्ये शिंदे गटाचे तानाजी सावंत, अजित पवार गटाचे छगन भुजबळ तर भाजपचे सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याचे दिसून आले. या माजी मंत्र्यांना पुन्हा संधी न दिल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर आता खातेवाटप जाहीर झाले असून अनेकांच्या जबाबदारीमध्ये बदल करण्यात आलेला आहे.

कोणाला कोणती खाती?

महायुतीमध्ये गृह खात्यावरुन जोरदार राजकारण रंगले होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहखात्याचा कारभार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागील महायुतीच्या सरकारप्रमाणे यावेळी देखील राज्याची तिजोरी अर्थात अर्थखाते देण्यात आले आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खात्याचा कारभार देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर महसूल खाते चंद्रशेखर बावनकुळे, उच्च आणि तंत्रशिक्षण हे चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले आहे. तर धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खाते तर पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण आणि हवामान बदल व पशुसंवर्धन ही खाती देण्यात आली आहेत.

Web Title: Dcm ajit pawar got angry with journalists after asking questions regarding cabinet portfolio allocation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2024 | 10:47 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Winter Session

संबंधित बातम्या

Pravin Tarde : ‘या’ दोन राजकीय नेत्यांवर Biopic काढणं अभिनेत्याचं स्वप्न! अजित दादांच्या पात्रासाठी असा असावा नट
1

Pravin Tarde : ‘या’ दोन राजकीय नेत्यांवर Biopic काढणं अभिनेत्याचं स्वप्न! अजित दादांच्या पात्रासाठी असा असावा नट

Rohit Pawar: जनाई-शिरसाई योजनेसाठी रोहित पवार ‘ॲक्शन मोड’वर! सिंचन भवनात अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक
2

Rohit Pawar: जनाई-शिरसाई योजनेसाठी रोहित पवार ‘ॲक्शन मोड’वर! सिंचन भवनात अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.