अजित पवारांमुळे भाजपा खासदार झाले नाराज
कोल्हापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. विविध राजकीय विषयांवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोल्हापुरातील विविध विकास कामासंदर्भात आज बैठक घेतली असल्याची माहिती दिली आहे. तसेच सोशल मीडियावर अजित पवार यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ते अधिकाऱ्यांना गाड्या खरेदी करण्याबाबत सूचना करत आहेत. याबाबत बोलताना ते म्हणाले की, डीव्ही कारसाठी मागच्या वेळी सांगण्यात आलं होतं. आता 5 वाहन मागितली आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कार्यक्रमावर नाराजी व्यक्त केली. अर्थसंकल्पामध्ये नागरिकांच्या भल्याच्या चर्चाहोण्यापेक्षा इतर गोष्टींवर जास्त चर्चा झाल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “कोणी काय म्हणावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. ही लोकशाही आहे. संविधानावर चर्चेनंतर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनीही अभिनंदन केलं. इतकं सुंदर भाषण मुख्यमंत्र्यांनी केलं.अधिवेशनाच्या चार आठवड्यामध्ये आम्ही दररोज नऊ तास काम केलं. यामुळे अनेक लक्षवेधी व प्रश्न मार्गी लागले. विरोधकांकडे कोणताच मुद्दा आता राहिलेला नाही त्यामुळे ते वेगळे काही तरी मुद्दे काढत आहेत. विरोधक नुसते विधिमंडळाच्या पायऱ्यावर बसून दहा-पंधरा मिनिटे घोषणा द्यायचे आणि सभागृहात येऊन बसायचे,” असा घणाघात अजित पवार यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अजित पवार पुढे म्हणाले की, “त्यांनी मिडियाच्या माध्यमातून जनतेला आम्ही फार काही काम करत असल्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांनी केलाय. सभागृहात विरोधकांची उपस्थिती जास्त नव्हती, फार कमी लोक उपस्थिती रहायचे. जे कामकाज आम्ही हाती घेतलं होतं, हे व्यवस्थित पार पाडलेलं आहे. आमच्याकडे पूर्ण बहुमत असतानाही रेटून नेण्याचा प्रयत्न आम्ही केलेला नाही,” असे स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केले. “कोल्हापूरच्या हद्दवाढी संदर्भात नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह लोकप्रतिनिधी सोबत चर्चा केली आहे. या भागातील लोकप्रतिनिधींचा देखील ऐकून घ्यावं लागतं. त्या बैठकीत बऱ्याच अंशी मार्ग निघेल,” अशी चर्चा झाली आहे, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
लक्षवेधी घेण्यासाठी एजंटमार्फेत पैसे घेत जात असल्याचा आरोप नेत्यांकडून करण्यात आला होता. याबाबत अजित पवार म्हणाले की, “त्या संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील गंभीर दखल घेऊन चौकशी लावली आहे. खरंच त्यामध्ये तथ्य आहे का नाही हे आम्ही पडताळून पाहू. कोणताही पुरावा न देता बातम्या पसरवल्या जातात आणि त्याला काही अर्थ नसतो,” असे मत त्यांनी मांडले. सौगात-ए-मोदी अशी योजना भाजपकडून ईदच्या अनुषंगाने केली आहे. याबाबत अजित पवार म्हणाले की, “चांगला काही कार्यक्रम आणला तर त्यात वाईट वाटून घ्यायचं काय? सर्वधर्मसमभाव हे आपल्या देशाचे परंपरा आहे त्यामुळे हा एक महत्त्वाचा घटक आहे. ज्या पद्धतीने इतर सण असतात त्या पद्धतीने रमजान महिना देखील महत्त्वाचा असतो. त्यानिमित्त काही घटकाला शुभेच्छा देण्याकरता हा कार्यक्रम आणला आहे,” असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.