Deal between india modi and usa trump for India Pakistan War Ban allegation by sanjay raut
मुंबई : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम लागला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन दोन्ही देशांतील युद्ध संपल्याची घोषणा केली. यामुळे विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच पाकिस्तानमध्ये युद्ध जिंकल्याचा आनंद असल्यामुळे देखील टीका केली जात आहे. भारत हा स्वतंत्र राष्ट्र असून अमेरिकेने निर्णय कसा काय असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि युद्धविरामावर जोरदार टीका केली आहे. खासदार राऊत म्हणाले की, “ऑपरेशन सिंदूर याच्यावर मी आता काहीच बोलणार नाही. एखादी कारवाई ही लष्कराला दिलेली जबाबदारी किंवा अधिकार आहे. या क्षणी देशातला प्रश्न इतकाच आहे पाकिस्तानमध्ये जो विजयाचा जल्लोष सुरू आहे. पाकिस्तानचे प्रधानमंत्री यांचे लष्कर प्रमुख यांचे वक्तव्य आपण ऐकले, त्यांच्या विजय मिरवणुका निघत आहेत. फार वाईट वाटत आहे डोळ्यात पाणी येत आहे. पाकिस्तान युद्ध जिंकला आहे. हिम्मत कशी होते असं बोलण्याची सांगण्याचे? हे सर्व स्वीकारून आपण पाकिस्तान पुढे झुकलेलो नाही आपण अमेरिकेपुढे झुकलेलो नाही,” असे स्पष्ट मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाकिस्तान युद्ध संपल्याची घोषणा केल्यामुळे खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. खासदार राऊत म्हणाले की, “प्रेसिडेंट ट्रम्प हे याला आपण सरपंच म्हणून नेमलेला नाही. त्यांना फौजदार की करायचा अधिकार मोदींनी कसा काय दिला? रोज ट्रम्प भारत आणि पाकिस्तान प्रश्नांविषयी आम्हाला सूचना करतात. आधी आम्ही युद्ध थांबवलं ऐकलं आता बोलत आहेत मी काश्मीरमध्ये मध्यस्थी करीन. प्रेसिडेंट ट्रम्पने शिमला करार वाचला पाहिजे. कश्मीर हा आमचा देशाचा अंतर्गत भाग आहे आणि त्याच्यामध्ये प्रेसिडेंट असेल किंवा प्रेसिडेंट पुतीन असेल कोणीही हस्तक्षेप करण्याची गरज नाही. त्यांनी सरपंच म्हणून जबाबदारी घेण्याची गरज नाही. प्रेसिडेंट ट्रम्प भारतामध्ये घुसलेला आहे. हे अत्यंत देशाच्या सार्वभौमत्तेचे दुर्दैव आहे,” अशी आक्रमक भूमिका संजय राऊत यांनी घेतली आहे.
भारत पाकिस्तान युद्धाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा
पुढे यांनी भारत आणि अमेरिकेमध्ये सौदा झाला असल्याचे देखील म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, “भारत पाकिस्तान युद्ध थांबवण्यासाठी सौदा काय आहे? कोणावरचे खटले काढून घेतले जात आहेत? अजून कोणाला काय मिळत आहेय़ अमेरिकेत कोणाला काम धाम मिळत आहेत, विशेषतः जे खटले चालू आहेत, लाचखोरीचे त्याच्यामुळे काही लाडक्या उद्योगपती मित्रांना अटकेची भीती वाटत आहे. अमेरिकेकडून ते आता भविष्यात कळेल या गोष्टी हळूहळू उघड होतात. त्याच्यामुळे सौदा काय झाला भारत आणि अमेरिकेत हे समजणे या देशाला गरजेच आहे. या क्षणी कोणाचं नाव घेणे चुकीचं आहे. युद्ध चालू आहे. या देशाच्या प्रत्येक घडामोडीची माहिती ट्रम्पला दिली जाते आणि त्यांच्याकडून सूचना येतात,” असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.