Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis meets Sanjay Raut: देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट; 15 मिनिटे चर्चा, राजकीय वर्तुळात चर्चंना उधाण

खासदार संजय राऊत यांचे व्याही राजेश नार्वेकर (Rajesh Narvekar) यांच्या चिरंजीवाच्या विवाह सोहळ्यात संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 03, 2025 | 03:14 PM
Devendra Fadnavis meets Sanjay Raut

Devendra Fadnavis meets Sanjay Raut

Follow Us
Close
Follow Us:
  • संजय राऊत गेल्या प्रकृतीच्या कारणास्तव सक्रीय राजकारणापासून दूर
  • देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांची भेट
  • फडणवीस–राऊत भेटीचे फोटो व्हायरल; १५ मिनिटांची गप्पा
 

Devendra Fadnavis meets Sanjay Raut:  शिवसेना ठाकरे गटाची धडाडती तोफ अशी ओळख असणार खासदार संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीच्या कारणास्तव सक्रीय राजकारणापासून दूर आहेत. संजय राऊत यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत तशी माहिती दिली होती. त्यानंतन आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खासदार संजय राऊत यांचे व्याही राजेश नार्वेकर (Rajesh Narvekar) यांच्या चिरंजीवाच्या विवाह सोहळ्यात संजय राऊत (Sanjay Raut) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांची भेट झाली. देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांच्या प्रकृतीची विचारपूसह केली. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी गंभीर आजाराचे निदान झाले होते. या आजारावर उपचार करण्यासाठी संजय राऊतांनी काही दिवस सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार असल्याचेही सांगितले. महत्त्वाची बाब म्हणजे, संजय राऊतांच्या प्रकृतीत सुधारणा दिसत असून आता ते काही कार्यक्रमांना हजेरी लावतानाही दिसत आहेत. दरम्यान आज संजय राऊतांचे व्याही राजेश नार्वेकर यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केल्याचे समजते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकेर यांनी संजय राऊत यांच्या भांडूप येथील मैत्री बंगल्यावर जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांची प्रकृती सुधारत असल्याचे सांगितले होते. तसेच लवकरच ते राजकारणात पुन्हा सक्रीय होतील, असंही त्यांनी सांगितलं होते. त्यानंतर अलीकडे संजय राऊत पुन्हा एकदा सोशल मीडियावरून राजकीय घडामोडींवर भाष्य करत असल्याचे दिसून आले. दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे हेदेखील आज संजय राऊतांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

फडणवीस–राऊत भेटीचे फोटो व्हायरल; १५ मिनिटांची गप्पा
दरम्यान, सध्या सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यातील भेट विशेष चर्चेचा विषय ठरली आहे. फडणवीस आणि राऊत यांच्यात जवळपास १५ मिनिटे चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. या वेळी आशिष शेलार हेही दोघांच्या शेजारी उपस्थित असल्याचे दिसून आले.

या सोहळ्यास उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. मात्र, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली की नाही, याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. फडणवीस आणि राऊत यांच्या अनपेक्षित संवादामुळे राजकीय वर्तुळात नवीन चर्चांना उधाण आले असून, या भेटीचे भविष्यातील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतील याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

 

 

Web Title: Devendra fadnavis meets sanjay raut 15 minute discussion sparks major political buzz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 01:14 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • MP Sanjay Raut

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! वाहतूक कोंडीतून होणार सुटका;’मेट्रो 9 आणि 2बी’मार्गिकेचे उद्घाटन, थेट अंधेरी ते मिरा-भाईंदर प्रवास
1

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! वाहतूक कोंडीतून होणार सुटका;’मेट्रो 9 आणि 2बी’मार्गिकेचे उद्घाटन, थेट अंधेरी ते मिरा-भाईंदर प्रवास

Maharashtra Politics : “सुनेत्रा पवारांना महाविकास आघाडीकडून अधिकृत पाठिंबा नाही पण..; खासदार संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
2

Maharashtra Politics : “सुनेत्रा पवारांना महाविकास आघाडीकडून अधिकृत पाठिंबा नाही पण..; खासदार संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Politics : “तुम्हाला हवे आहे म्हणून लगेच पाठिंबा द्यायचा का? बारामतीचा विषय संजय राऊतांनी एकाच वाक्यात संपवला
3

Maharashtra Politics : “तुम्हाला हवे आहे म्हणून लगेच पाठिंबा द्यायचा का? बारामतीचा विषय संजय राऊतांनी एकाच वाक्यात संपवला

Maharashtra Politics : बारामती पोटनिवडणुकीमध्ये ठाकरे गटही उतरणार? खासदार राऊतांच्या ‘या’ वक्तव्याने चर्चांना उधाण
4

Maharashtra Politics : बारामती पोटनिवडणुकीमध्ये ठाकरे गटही उतरणार? खासदार राऊतांच्या ‘या’ वक्तव्याने चर्चांना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.