Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : बारामती पोटनिवडणुकीमध्ये ठाकरे गटही उतरणार? खासदार राऊतांच्या ‘या’ वक्तव्याने चर्चांना उधाण

Baramati Byelection : बारामती विधानसभा पोटनिवडणूकीला उमेदवार न देण्याचा निर्णय शरद पवार गटाने घेतला आहे. याला खासदार संजय राऊत यांनी विरोध केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 03, 2026 | 02:37 PM
MP Sanjay Raut press conference on baramati by election 2026 maharashtra political news

MP Sanjay Raut press conference on baramati by election 2026 maharashtra political news

Follow Us
Close
Follow Us:
  • खासदार संजय राऊत पत्रकार परिषद
  • बारामती पोटनिवडणुकीवर केलं भाष्य
  • शरद पवार गटाच्या बिनविरोध भूमिकेला विरोध
Baramati Byelection : जळगाव : दिवंगत नेते अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्यामुळे बारामती विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. अजित पवारांनंतर बारामतीचा दादा कोण याची चर्चा सुरु झाली आहे. ही निवडणूक (Political News) बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा महायुतीकडून केली जात आहे. मात्र यावरुन महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याचे दिसून आले आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढवण्यास काँग्रेस उत्सुक असून ठाकरे गटाने देखील त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. यामुळे महाविकास आघाडीमध्ये शरद पवार (Sharad Pawar) गटाविरोधात वातावरण निर्माण झाले.

अजित पवारांच्या निधनामुळे बारामती विधानसभा पोटनिवडणूक होत आहे. यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये युगेंद्र पवार यांनी काकाविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र पोटनिवडणुकीमध्ये शरद पवार गटाने माघार घेतली आहे. मात्र त्यांच्या या भूमिकेला महाविकास आघाडीमधून तीव्र विरोध होताना दिसत आहे. यानंतर काँग्रेस पक्ष ही निवडणूक लढणार असल्याचे वक्तव्य नेत्यांनी केले आहे. या भूमिकेला खासदार संजय राऊत यांनी पाठिंबा दिला आहे.

हे देखील वाचा :महाराष्ट्रात पुन्हा गुवाहटी वारी होणार? 50 आमदार भाजपमध्ये जाणार,बड्या नेत्याचा दावा

खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी अनेक राजकीय भाष्य करत शरद पवार गटावर निशाणा साधला. खासदार राऊत म्हणाले की, महाविकास आघाडी म्हणून बारामती व राहुरी दोन्ही निवडणुका लढण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. बारामतीच्या जागेवर शरद पवार गटाचा अधिकार आहे. या संदर्भात त्यांच्याशी आमची चर्चा होईल. या जागेबाबत आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ. अजित पवार यांच्या मृत्यूमुळे बारामती विधानसभेची निडवणूक होत आहे. कौटुंबिक धर्म म्हणून शरद पवारांचा पक्ष कदाचित ही निवडणूक लढणार नाही. इतर लढतील तर त्यांना विरोधी करता कामा नये. कारण शेवटी लोकशाही आहे. एकत्र बसून निर्णय घ्यावा लागेल, अशी भूमिका संजय राऊत यांनी घेतली.

हे देखील वाचा : तो आक्षेपार्ह व्हिडिओ अन् पक्षाची झाली थू-थू; सुनेत्रा पवारांचा थेट झिरवळांना फोन

जळगाव दौऱ्यावर असलेले राऊत म्हणाले की, जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू आहे. शेती उद्ध्वस्त झाली आहे. कुठे आहेत गिरीश महाजन? ज्यांना संकट मोचक म्हणतात ना? शेतकऱ्यांच्या संकटावेळी हे संकटमोचक कुठे असतात? ते फक्त राजकीय संकटमोचक आहेत का? शेतकऱ्यांवर संकट येतात तेव्हा हे संकटमोचक काय करताना दिसत नाही. फक्त आमदार फोडणे, नगरसेवक फोडणे, पक्ष फोडणे, हेच फक्त संकटमोचकाचे कर्तव्य आहे का? असा खोचक टोला खासदार संजय राऊत यांनी मंत्री गिरीश महाजन यांना लगावला आहे.

Web Title: Mp sanjay raut press conference on baramati by election 2026 maharashtra political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • baramati news
  • MP Sanjay Raut
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : महाराष्ट्रात पुन्हा गुवाहटी वारी होणार? 50 आमदार भाजपमध्ये जाणार,बड्या नेत्याचा दावा
1

Maharashtra Politics : महाराष्ट्रात पुन्हा गुवाहटी वारी होणार? 50 आमदार भाजपमध्ये जाणार,बड्या नेत्याचा दावा

NCP Merger Breaking: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी बड्या नेत्यांची गुप्त बैठक; पडद्यामागे घडामोडींना वेग
2

NCP Merger Breaking: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी बड्या नेत्यांची गुप्त बैठक; पडद्यामागे घडामोडींना वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.