
Devyani Farande emotional after Vinayak Pandey, Yatin Wagh, and Shahu Khaire joined the BJP
राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सत्तेमध्ये असलेल्या भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुकांची मोठी मांदियाळी आहे. मात्र यामुळे भाजपमध्ये पूर्वीपासून असलेल्या निष्ठावंतांची गोची होत आहे. भाजपमध्ये आधीपासून असलेल्या नेत्यांना संधी न मिळाता बाहेरून आलेल्या नेत्यांना संधी दिली जात आहे. यावरुन भाजपमध्ये जोरदार नाराजीनाट्य सुरु आहे. भाजपच्या आमदार आणि नेत्या देवयानी फरांदे यांनी देखील या पक्षप्रवेशाला विरोध करत सोशल मीडियावर पोस्ट केली होती, या दोघांना पक्षात प्रवेश देताना आपल्या सोबत कोणतीही चर्चा करण्यात आली नाही, असं फरांदे यांनी म्हटले होते. यामुळे भाजपच्या कार्यालयाबाहेर मोठा गदारोळ झाल्याचे देखील दिसून आले. मात्र यानंतर देखील विनायक पांडे, यतीन वाघ आणि शाहू खैरे यांचा पक्षप्रवेश पार पडला आहे.
हे देखील वाचा : अटल बिहारी वाजपेयींनी का नाही केले लग्न? प्रेम केले व्यक्त पण राहिले अपूर्ण…वाचा Love Story
यावर निवडणूक प्रमुख आणि आमदार देवयानी फरांदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “मी विरोध करण्यापेक्षा माझं मत त्या मतदारसंघाची आमदार म्हणून असं होतं, त्या ठिकाणी एक अतिशय सक्षम उमेदवार बबलू शेलार यांचा पक्षप्रवेश झाला होता. आणि आमचे जे उर्वरीत उमेदवार होते, त्यांना घेऊन शेलार यांच्यासह जर पॅनल केलं असतं तर ते शंभर टक्के निवडून येणार होते, असं लोकप्रतिनिधी या नात्यानं माझं मत होतं. त्यामुळे कोणच्या पक्षप्रवेशाला विरोध करण्याचं माझं कारण नाही,” असे मत देवयानी फरांदे यांनी व्यक्त केले.
पुढे त्या म्हणाल्या की, “वर्षानुवर्ष कार्यकर्ते त्या ठाकाणी काम करतात, आणि ते निवडून येण्याचे संकेत दिसत आहेत, असं मला लोकप्रतिनिधी म्हणून वाटत होतं. या ठिकाणी बाहेरून आलेला एक आणि इतर जर तीन दिले तर निश्चित स्वरुपात पक्ष विजयी होईल, त्यासाठी मी आजची भूमिका मांडली होती. तुम्ही सर्व जण मला ओळखता, मी गेल्या चाळीस वर्षांमध्ये माझ्यावर कधी अन्याय झाला असेल, पक्षाने काही भूमिका घेतली असेल तरी देखील मी माझ्या स्वत:साठी कधीही भूमिका घेतली नाही. मी पक्षाची निष्ठावान कार्यकर्ती आहे. त्यामुळे भूमिका मी कधीही घेणार नाही, परंतु सर्वांनीच नेते व्हायचं, आणि प्रत्येकाने आप आपलं बघायचं, मग पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना कोणी पाठबळ द्यायचं?” असा सवाल देवयानी फरांदे यांनी उपस्थित केला आहे.
हे देखील वाचा : भाकरी फिरणार अन् MVA तुटणार? ‘हा’ पक्ष बाहेर पडणार? तिसरी आघाडी…
देवयानी फरांदे यांनी पक्षप्रवेशाच्या विरोधात सोशल मीडिया पोस्ट केली होती. यामुळे नाशिकमधील भाजपचे नाराजीनाट्य समोर आले होते. याबाबत त्या म्हणाल्या की,”मी सकाळी सोशल मीडियावर पोस्ट टाकली, एवढाच विषय आहे. मला गहिवरून येण्याचा कारण म्हणजे मी एक अतिशय सामान्य कार्यकर्ती आहे, आणि माझ्यासमोर जर कार्यकर्त्यांचा बळी दिला जात असेल तर हे काही मला बरोबर वाटलं नाही. जे आज पक्षात आले आहेत, पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी म्हणून मी त्यांचं स्वागत करते. पण आज जे घडलं ते मला काही आवडलेलं नाही,” अशा शब्दांमध्ये देवयानी फरांदे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.