Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धनंजय मुंडेंना लवकरच मोठा धक्का बसणार? मंत्रिपदानंतर आता आमदारकीही जाण्याची शक्यता

धनंजय मुंडे यांच्या गुंडाकडून मिळणाऱ्या धमक्याबाबतही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत साखर कारखाने किंवा इतर प्रॉपर्टी कुणी खरेदी करू नये, यासाठी याचिका दाखल केल्याचे करुणा मुंडे यांनी म्हटले.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 04, 2025 | 10:50 AM
धनंजय मुंडेंना हायकोर्टाचा दिलासा; याचिकाकर्त्यांनाच ठोठावला १ लाखांचा दंड

धनंजय मुंडेंना हायकोर्टाचा दिलासा; याचिकाकर्त्यांनाच ठोठावला १ लाखांचा दंड

Follow Us
Follow Us:

मुंबई : माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी काही केल्या थांबत नसल्याचे काही दिवसांपासून दिसत आहे. आता धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. काही दिवसांपूर्वी कौटुंबिक प्रकरणात करुणा मुंडे यांना वांद्रे कुटुंब न्यायालयाने मोठा दिलासा दिला. कोर्टाने करुणा यांची पोटगी कायम ठेवण्याचा निर्णय दिला होता. त्यानंतर करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात आणखी आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली.

काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मंत्रिपदानंतर धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करण्यासाठी करुणा मुंडे यांनी कोर्टात धाव घेतली आहे. करुणा मुंडे यांनी वकील चंद्रकांत ठोंबरे यांच्यामार्फत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करण्यासाठी न्यायालयात याचिका केली आहे.

हेदेखील वाचा : Dhananjay Munde : “धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील संबंध…,” कोर्टाचा झटका, पोटगी देण्याचे आदेश

दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या गुंडाकडून मिळणाऱ्या धमक्याबाबतही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत साखर कारखाने किंवा इतर प्रॉपर्टी कुणी खरेदी करू नये, यासाठी याचिका दाखल केल्याचं करुणा मुंडे यांनी पुढे म्हटले आहे.

करुणा शर्मा यांना पोटगी देण्याचे आदेश

अजित पवार गटातील राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणी कमी होत नाहीत. मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना करुणा शर्मा यांना पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. यांचा दावा आहे की, त्या धनंजय मुंडे यांच्या पहिली पत्नी आहेत. धनंजय मुंडे विरुद्ध करुणा शर्मा यांचा खटला काय होता? न्यायालयाने म्हटले की, करुणा शर्मा यांचे संबंध हे ‘विवाहाचे स्वरूप’ असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते आणि घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत करुणा शर्मा यांना दिलासा मिळण्यास पात्र आहे. त्यानुसार, कोर्टाने करुणा मुंडे यांना पोटगी देण्याचे आदेश धनंजय मुंडे यांना दिले आहेत.

Web Title: Dhananjay mundes troubles increase

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2025 | 10:50 AM

Topics:  

  • dhananjay munde
  • karuna munde
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026 : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन: लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा 
1

Maharashtra Breaking News Today 2026 : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन: लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा 

Maharashtra Breaking News Live Updates Today:  ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच
2

Maharashtra Breaking News Live Updates Today: ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच

Mira Bhayandar News: उत्तनसह ५ गावांचे सिटी सर्वेक्षण ९ वर्षांपासून रखडले; आगरी-कोळी नागरिकांच्या मालकी हक्काचा प्रश्न ऐरणीवर
3

Mira Bhayandar News: उत्तनसह ५ गावांचे सिटी सर्वेक्षण ९ वर्षांपासून रखडले; आगरी-कोळी नागरिकांच्या मालकी हक्काचा प्रश्न ऐरणीवर

Mira Bhayandar: ५०० कोटींच्या कर्जप्रस्तावावरून भाजप अडचणीत? नगरविकास विभागाकडून महापालिकेकडे हिशोब
4

Mira Bhayandar: ५०० कोटींच्या कर्जप्रस्तावावरून भाजप अडचणीत? नगरविकास विभागाकडून महापालिकेकडे हिशोब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.