Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामती पोटनिवडणुकीवरून राजकारण चांगलंच तापणार; महाविकास आघाडीत फूट पडणार? आता अंतिम निर्णय…

बारामती आणि राहुरी संदर्भात पक्षश्रेष्ठींशी चर्चा झाली आहे. दोन्ही मतदारसंघांसाठी इच्छुकांकडून अर्ज आले असून, बारामतीसाठी ६ तर राहुरीसाठी ४ अर्ज प्राप्त झाले आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 04, 2026 | 09:48 AM
Maharashtra Politics : विधान परिषद निवडणुकीत आघाडीत दिसून आली बिघाडी; पण युती मात्र सुसाट...

Maharashtra Politics : विधान परिषद निवडणुकीत आघाडीत दिसून आली बिघाडी; पण युती मात्र सुसाट...

Follow Us
Follow Us:

मुंबई : बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने दोन्ही मतदारसंघांत निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. पक्षश्रेष्ठींकडून यासाठी हिरवा कंदील मिळाल्याची माहिती समोर आली असून, महाविकास आघाडीत तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, बारामती आणि राहुरी संदर्भात पक्षश्रेष्ठींशी चर्चा झाली आहे. दोन्ही मतदारसंघांसाठी इच्छुकांकडून अर्ज आले असून, बारामतीसाठी ६ तर राहुरीसाठी ४ अर्ज प्राप्त झाले आहेत. उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखतीही पार पडल्या असून, येत्या दोन दिवसांत पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर केली जाणार आहे. अजित पवार आणि भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे या दोन मतदारसंघांत पोटनिवडणूक होत आहे. महाविकास आघाडीत बारामती आणि राहुरी हे मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे होते. विशेषतः अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून उमेदवार न देण्याची शक्यता असताना काँग्रेसने लढण्याचा निर्णय घेतल्याने आघाडीत बिघाडी होण्याचे संकेत आहेत.

राहुरी मतदारसंघ देखील शरद पवार गटाकडे असल्याने तेथे पक्षाकडून उमेदवार दिला जाईल. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने दोन्ही ठिकाणी उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू केल्याने महाविकास आघाडीत मतभेद तीव्र होत असून, आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे संकेत मिळत आहेत.

अंतिम निर्णय एकत्र बसूनच

बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला असून, काँग्रेसने दोन्ही मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. मात्र, उमेदवारीबाबत अंतिम निर्णय महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा करूनच घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

राहुरीत शरद पवार गटाची ताकद

यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीने एकत्रित निर्णय घेण्याची गरज अधोरेखित केली. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या निधनानंतर परिस्थिती वेगळी असून, कौटुंबिक परंपरेचा विचार करून शरद पवार गट निवडणूक लढवणार नाही, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. मात्र, त्या ठिकाणी इतर कोणी उमेदवार उभा राहिल्यास त्याला विरोध करू नये, असेही त्यांनी म्हटले.

राहुरी मतदारसंघाबाबत बोलताना राऊत म्हणाले की, येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची ताकद आहे. त्यामुळे त्या पक्षालाच प्राधान्य देणे महाविकास आघाडीच्या धोरणानुसार योग्य ठरेल. दरम्यान, या दोन्ही जागांवर अंतिम निर्णय घेण्यासाठी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते लवकरच बैठक घेणार असून, भाजपला फायदा होईल अशी कोणतीही भूमिका टाळण्यावर भर दिला जाणार आहे.

मोठी बातमी ! महाविकास आघाडीत ‘या’ कारणामुळे पडली वादाची ठिणगी; ‘मातोश्री’वर होणार महत्त्वपूर्ण बैठक

Web Title: Differences persist within the maha vikas aghadi over the baramati by election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 09:48 AM

Topics:  

  • Baramati by-election
  • Maha Vikas Aghadi
  • political news

संबंधित बातम्या

Congress leader Sajjan Kumar Passes Away: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे निधन; सफदरजंग रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
1

Congress leader Sajjan Kumar Passes Away: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे निधन; सफदरजंग रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

BJP-Congress Politics: छात्रों की गुंज! फडणवीसांचा वार सतेज पाटलांचा पलटवार; पुण्यात राजकारण तापणार
2

BJP-Congress Politics: छात्रों की गुंज! फडणवीसांचा वार सतेज पाटलांचा पलटवार; पुण्यात राजकारण तापणार

नितीन नबीन यांच्या टीममध्ये पियूष गोयल; आता केंद्रीय मंत्रिपदाचा द्यावा लागणार राजीनामा?
3

नितीन नबीन यांच्या टीममध्ये पियूष गोयल; आता केंद्रीय मंत्रिपदाचा द्यावा लागणार राजीनामा?

Mumbai Politics: एसआरएमुळे पालिकेचा कोट्यवधींचा महसूल बुडाला; अश्विनी भिडेंच्या पत्राने मंत्रालयात खळबळ
4

Mumbai Politics: एसआरएमुळे पालिकेचा कोट्यवधींचा महसूल बुडाला; अश्विनी भिडेंच्या पत्राने मंत्रालयात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.