Election Comission: मोठी बातमी! महाराष्ट्रातील तब्बल 44 पक्षांवर बंदी; निवडणूक आयोगाची कारवाई
देशभरातील 474 पक्षांची नोंदणी रद्द
केंद्रीय निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
निवडणूक व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी घेतला निर्णय
Election Comission Big Breaking: केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने देशभरातील 474 पक्षांची नोंदणी रद्द केली आहे. देशातील बिगर मान्यताप्राप्त पक्षांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील बिगर मान्यताप्राप्त पक्षांची नोंदणी रद्द केली आहे. निवडणूक आयोगाने 474 पक्षांची नोंदणी रद्द केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 44 पक्षांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील अनेक राजकीय पक्षांना मोठा धक्का बसला आहे. याआधी निवडणूक आयोगाने ऑगस्ट महिन्यात या प्रकारची कारवाई केली होती.
लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार कलम नोंदणीकृत राजकीय पक्ष निवडणुकीत सहभाग घेऊ शकतो. सलग 6 वर्षांपासून निवडणुकीपासून दूर राहणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द होते. निवडणूक आयोगाने आतापर्यंत 808 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली आहे.
EC on Rahul Gandhi : “हे आरोप बिनबुडाचे; राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपावर निवडणूक आयोग कडाडले
राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपावर निवडणूक आयोग कडाडले
अल्पसंख्याक आणि दलित लोकांना मतदारयादीतून वगळे जात असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. याबाबत सढळ पुरावे दिले असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. राहुल गांधी यांच्या मतदारयादीतील नव्या घोटाळ्याच्या आरोपावर निवडणूक आयोगाने (Election Commission) प्रत्युत्तर दिले आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. मतदार यादीतून नावे वगळली असल्याचे आरोप करण्यात आला आहे. राहुल गांधी यांनी थेट निवडणूक आयोगाचे प्रमुख ज्ञानेश कुमार यांचे नाव घेत गंभीर आरोप केले.
EC on Rahul Gandhi : “हे आरोप बिनबुडाचे; राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपावर निवडणूक आयोग कडाडले
निवडणूक आयोगाने विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. याबाबत कॉंग्रेसच्या पेजवरुन करण्यात आलेल्या लाईव्हचा फोटो शेअर करत अयोग्याचा शिक्का निवडणूक आयोगाने लावला आहे. त्याचबरोबर हे सर्व आरोप बिनवुडाचे असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे. आयोगाने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, खासदार राहुल गांधी यांनी केलेले आरोप चुकीचे आणि निराधार आहेत, अशी स्पष्ट भूमिका निवडणूक आयोगाने घेतली आहे. पुढे निवडणूक आयोगाने राहुल गांधींच्या आरोपावर फॅक्टचेक करत उत्तर दिले. निवडणूक आयोगाने सांगितले की, “खासदार राहुल गांधी यांनी गैरसमज केल्याप्रमाणे, कोणत्याही नागरिकाकडून ऑनलाइन कोणतेही मत हटवता येत नाही.