बिहार विधानसभा निवडणुकीची झाली घोषणा
दोन टप्प्यांमध्ये होणार मतदान
14 नोव्हेंबरला होणार मतदान
Bihar Election: केंद्रीय निवडणूक आयोगाने बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. बिहारमध्ये दोन टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. तर 14 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. दरम्यान बिहारमध्ये आज निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे बिहारमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. या दरम्यान कोणत्या कामांवर बंदी असणार आहे, ते जाणून घेऊयात.
बिहारमध्ये आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. आचार संहिता लागू झाल्यापासून आज अनेक कामांवर बंदी असणार आहे. त्याबाबत जाणून घेऊयात. दरम्यान बिहारमध्ये निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे.
1. बिहारमध्ये आजपासून आचार संहिता लागू झाल्यापासून सार्वजनिक निधीचा वापर करता येणार नाही.
2. सरकारी गाडी, सरकारी विमान किंवा सरकारी यंत्रणेचा वापर निवडणुकीत प्रचार करण्यासाठी वापर करता येणार नाही.
3. कोणत्याही पक्षाला किंवा उमेदवाराला सार्वजनिक वाहनांचा वापर करता येणार नाही.
4. आदर्श आचार संहिता लागू झाल्यावर सरकारी, घोषणा, भूमिपूजन, उद्घाटन असे कार्यक्रम करू शकत नाहीत.
5. सरकारी तिजोरीचा वापर करून कोणत्याही प्रकारची जाहिरात पक्षांना किंवा उमेदवारला करता येणार नाही.
6. कोणताही राजकीय पक्ष, जाती आणि धर्म यावर आधारित मते मागू शकत नाहीत.
Bihar Assembly Election 2025: ठरलं तर! ‘या’ दिवशी होणार बिहार विधानसभेच्या निवडणुका
आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास काय होते?
बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. आजपासून बिहारमध्ये आचार संहिता लागू झाली आहे. आचार संहितेचे उल्लंघन केल्यास निवडणूक आयोग कठोर कारवाई करते. राजकीय पक्ष किंवा उमेदवार यांच्याकडून आचार संहितेचे उल्लंघन झाल्यास निवडणूक आयोग दंडात्मक कारवाई करू शकते. उमेदवाराच्या निवडणूक लढण्यावर देखील बंदी आणू शकते.
‘या’ दिवशी होणार बिहार विधानसभेच्या निवडणुका
बिहारच्या विधासभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. बिहारच्या निवडणुका दोन टप्प्यात होती. यात पहिलया टप्प्यात ६ नोव्हेंबरला मतदान होती. तर दुसऱ्या टप्प्यात ११ नोव्हेंबरला मतदान होईल आणि १४ नोव्हेंबरला निकाल जाहीर केले जातील. पहिल्या टप्प्यात १२१ जागांवर आणि दुसऱ्या टप्प्यात १२२ जागांवर मतदान होणार आहे.
PM मोदींना अर्वाच्य भाषेत शिव्या दिल्याने वाद वाढला! भाजप नेत्यांकडून बिहार बंदची हाक
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले, सध्या बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार आहेत. बिहारमध्ये एकूण ९०,७१२ मतदान केंद्रांसह १४ लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करतील. बिहार विधानसभा निवडणुकीत एकूण १४ लाख नवीन मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, बिहारमध्ये एकूण ९०,७१२ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.