Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zilla Parishad Election : निवडणूक घोषणेपूर्वीच ‘शिवसेना’ सरसावली; अलिबाग तालुक्यात उमेदवारी जाहीर करून आघाडी

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्यापूर्वीच शिवसेनेने (Shiv Sena) अलिबाग तालुक्यात निवडणुकीच्या तयारीमध्ये मोठी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 23, 2025 | 10:27 AM
निवडणूक घोषणेपूर्वीच 'शिवसेना' सरसावली; अलिबाग तालुक्यात उमेदवारी जाहीर करून आघाडी (फोटो सौजन्य-X)

निवडणूक घोषणेपूर्वीच 'शिवसेना' सरसावली; अलिबाग तालुक्यात उमेदवारी जाहीर करून आघाडी (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:
  • अलिबाग तालुक्यात निवडणुकीच्या तयारीमध्ये मोठी आघाडी
  • उमेदवारांची पहिली यादी जाहीर
  • उमेदवारांची घोषणा करण्याची शिवसेनेची ही रणनीती
भारत रांजणकर, अलिबाग: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रायगड जिल्हा परिषदेत मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी घडणार आहेत. महायुती होणार नाही असे स्पष्ट संकेत शिवसेना नेत्यांनी दिले आहेत. याचदरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्यापूर्वीच शिवसेनेने (Shiv Sena) अलिबाग तालुक्यात निवडणुकीच्या तयारीमध्ये मोठी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून विरोधकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ही घोषणा शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राजाभाई केणी यांनी केली आहे.

‘दिल्ली अजून दूर आहे, २०२९ पर्यंत मीच…’; देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा; तर महायुतीत…

काय आहे नेमकी राजकीय खेळी?

शिवसेनेने जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणासाठी आपल्या संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
जि. प. उमेदवार: रसिका राजभाई केणी (आंबेपूर जिल्हा परिषद गट ३७)
पं. स. उमेदवार (आंबेपूर): शैलेश दादा पाटील (आंबेपूर पंचायत समिती गण ६१)
पं. स. उमेदवार (भोमोली): कृष्णा दादा लोहमी (भोमोली (कुर्डूस) पंचायत समिती गण ६२)
निवडणूक आयोगाकडून अद्याप अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला नसतानाच शिवसेनेने उमेदवारांची घोषणा करून एकप्रकारे राजकीय वातावरण तापवले आहे. या निर्णयामुळे अलिबाग तालुक्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, त्यांना प्रचारासाठी अधिक वेळ मिळाला आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच उमेदवारांची घोषणा करण्याची शिवसेनेची ही रणनीती खूप महत्त्वाची आहे. यामुळे…
प्रचाराला लवकर सुरुवात: उमेदवारांना त्यांच्या गटात व गणात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि प्रचारासाठी अधिक कालावधी मिळेल.
मतदारांशी संवाद साधणे: संभाव्य मतदारांना उमेदवारांचे नाव आणि चेहरा लवकर माहिती होईल, ज्यामुळे प्रचाराची धार वाढेल.
विरोधकांवर दबाव: अचानक उमेदवारी जाहीर झाल्याने, प्रतिस्पर्धी पक्ष आणि गटांना त्यांच्या उमेदवारांची निवड करण्यासाठी व त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यासाठी घाई करावी लागेल.

शिवसेनेने घेतलेल्या या ‘अर्ली बर्ड’ निर्णयामुळे अलिबाग तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा माहोल चांगलाच तापलेला दिसत आहे. विरोधक यावर काय आणि कशी प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

BMC Election: BJP सर्वत्र युती करणार नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांचे संकेत

Web Title: Even before the election announcement shiv sena took the lead ahead by announcing candidature in alibag taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2025 | 10:26 AM

Topics:  

  • Alibag
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

Zilla Parishad Election 2025: राज्यात पुन्हा निवडणुकीचा धुराळा; जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणार
1

Zilla Parishad Election 2025: राज्यात पुन्हा निवडणुकीचा धुराळा; जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणार

ठाकरेंनी २७ वर्षात जे कमावलं ते शिंदेंनी गमावलं! स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीत निवडणुकीचा आश्चर्यकारक निकाल
2

ठाकरेंनी २७ वर्षात जे कमावलं ते शिंदेंनी गमावलं! स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीत निवडणुकीचा आश्चर्यकारक निकाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.