
अखेर जेजुरीच्या कारभाऱ्यांनी हाती घेतला पालिकेचा पदभार; विकासकार्याचे नवे पर्व सुरु
पुरंदर : खंडोबाच्या जेजुरी नगरपालिकेचा पदभार नवनिर्वाचित नगराध्यक्ष जयदीप बारभाई आणि उपनगराध्यक्ष गणेश निकुडेसह विजयी 17 नगरसेवकांनी संविधान स्तंभासह महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन केले. जेजुरी नगरीच्या वीज पाणी, रस्ते आणि स्वछता सारख्या मूलभूत सोयी-सुविधाना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी जेजुरी नगरीचे विकास पितामह म्हणून ओळखले जाणारे अनुभवी मार्गदर्शक माजी नगरध्यक्ष दिलीप बारभाई यांचा आशीर्वाद घेत आणि नगराध्यक्ष खुर्चीला नतमस्तक होत जयदीप बारभाई आणि गणेश निकुडे यांनी पदभार हाती घेतला.
यावेळी जालिंदर कामथे, रोहिदास कुंभार, रमेश बयास, माजी ज्येष्ठ नगरसेवक रमेश गावडे, सुहास बारभाई, मुख्य प्रचारमार्गदर्शक संदिपआप्पा जगताप, तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष उत्तम धुमाळ, उद्योजक विजय झगडे, शहर अध्यक्ष रमेश लेंडे यांच्या उपस्थितीत नगरपालिका मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले आणि पालिका प्रशासकीय कर्मचारी बाळासाहेब खोमणे यांनी प्रशासनाच्या वतीने बारभाई निकुडेसह सर्व नगरसेवकांचा सन्मान केला.
पालिका पदग्रहण होत असताना फटाक्यांची आतिषबाजी करत सर्व विजयी उमेदवारांचे भव्य स्वागत करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार विजयबापू शिवतरे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र आणि राज्य शासनाच्या प्रकल्पातून पुरंदरच्या विकासाला चालना मिळत आहे.
यात जेजुरीचा विकास साधत जेजुरी नगरी आधुनिक आणि सर्व सुविधायुक्त करणार असल्याचा विश्वास बारभाई आणि निकुडे यांनी व्यकत केला. मात्र, एकीकडे शासनाच्या जेजुरी हद्दवाढी प्रकल्प स्वप्न साकारताना मात्र अवघ्या दीड दोन किमी अंतरावरील ग्रामपंचायत निर्मितीमुळे जेजुरीनगरींची हद्दवाढ हा प्रश्न संभ्रमित करत असून, आजूबाजूच्या लोकांना त्यांच्या इच्छेनुसार पालिका प्रवाहत आणण्याचे प्रयत्न राहतील, असेही बारभाई, निकुडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
हेदेखील वाचा : “विलासराव देशमुख आठवणी पुसल्या जातील…लातूरमधील रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावरुन रंगलं राजकारण