भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये विलासराव देशमुख आठवणी पुसल्या जातील असे वक्तव्य केले (फोटो - सोशल मीडिया)
लातूरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रचार सभा घेतली. लातूर हे आजही विलासराव देशमुख यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. लातूरमध्ये रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुखांच्या आठवणी 100 टक्के पुसल्या जातील असे वक्तव्य केले. चव्हाण म्हणाले की, , “लातूरमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळतोय. हा उत्साह पाहून लक्षात येते की, लातूर शहरातून विलासराव देशमुख यांच्या आठवणी 100 टक्के पुसल्या जातील, यात कोणतीही शंका नाही”. असे वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केले.
हे देखील वाचा : राघवेंद्र बाप्पू मानकर यांच्यासह भाजप उमेदवारांच्या प्रचाराला उदंड प्रतिसाद
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला. सपकाळ म्हणाले की, स्व. विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणी लातूर जिल्ह्यातून पुसू शकणारा अजून कोणी निर्माण नाही झाला. अनेक जण इच्छा बाळगून आलेत आणि स्वाभिमानी लातूरकरांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली,” असा टोला हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला आहे.
हे देखील वाचा : “आज पाणी पित असलो तरी…”; पुण्यनगरीतून धडाडली CM फडणवीसांची तोफ
पुढे ते म्हणाले की, “विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्ह्याला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली, त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य लातूरच्या विकासासाठी समर्पित केलं. आज त्यांच्याबद्दल हे सत्तेचा माज असलेले भाजप नेते लातूरात येऊन बरळून जातात की साहेबांच्या आठवणी पुसल्या गेल्यात. त्यांना काय समजणार विलासराव देशमुख साहेबांचं लातूर शी असलेलं नातं. लातूरच्या कर्तुत्वसंपन्न सुपुत्राचा अपमान लातूरकर कधीही सहन करणार नाही, भाजपवाल्यांनो याद राखा, करारा जवाब मिलेगा!” असा आक्रमक पवित्रा हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतला आहे.
<
स्व. विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणी लातूर जिल्ह्यातून पुसू शकणारा अजून कोणी निर्माण नाही झाला. अनेक जण इच्छा बाळगून आलेत आणि स्वाभिमानी लातूरकरांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिलीय. विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्ह्याला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली, त्यांनी आपलं… pic.twitter.com/5lAWjPI54s — Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) January 5, 2026






