शिवसेना-मनसे युतीत जागा वाटप फॉर्म्युला ठरला, मुंबईत कोण किती जागा लढणार ? (फोटो सौजन्य-X)
Raj Thackeray and Uddhav Thackeray Alliance News in Marathi : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (BMC Election 2025) रखडल्या असून ही निवडणूक पुढच्या वर्षी 31 जानेवारीच्या आत घेण्यात यावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे यंदा दिवाळानंतर निवडणुकांच्या प्रचाराचा धूमधडाका सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर एकत्र आल्यापासून महाराष्ट्रात ठाकरे बंधूंमधील युतीची बऱ्याच काळापासून प्रतीक्षा होती. विजयादशमीच्या निमित्ताने होणारी रॅली महत्त्वाची मानली जात आहे. याचदरम्यान आता ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र निवनिर्माण सेना या दोन पक्षांनी किती जागा लढवाव्यात यासाठीचा फॉर्म्युलाही निश्चित झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या युतीची घोषणा दसरा मेळाव्यात होणार नसून दिवाळीच्या मुहुर्तावर ती होण्याची शक्यता आहे.
राजकीय विश्लेषकांचा असा विश्वास आहे की, ठाकरे बंधूंची युती मुंबई आणि इतर महानगरपालिकांमधील समीकरणे बदलू शकते. दोन्ही भावांच्या पक्षांमध्ये ६०:४० चा फॉर्म्युला तयार होऊ शकतो. २२७ बीएमसी जागांपैकी ठाकरे गट १४७ आणि मनसे ८० जागा लढवू शकते.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना (यूबीटी) आणि मनसे युतीची अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात युतीबाबत एकमत असल्याचे दिसून येते.मात्र युतीची घोषणा लांबणीवर पडू शकते, कदाचित दिवाळीपर्यंत समजण्याची शक्यत आहे. दोन्ही पक्षांचे नेते ६०:४० च्या फॉर्म्युल्यावर विचारमंथन करत आहेत. दोन्ही पक्ष त्यांच्या ताकदीनुसार जागा वाटू शकतात. दोन्ही पक्षांमधील समस्या अशा भागात उद्भवत आहे जिथे दोन्ही पक्षांचे वर्चस्व आहे. या भागात दादर-माहीम, लालबाग, परळ, शिवडी, विक्रोळी, दिंडोशी, घाटकोपर पश्चिम, दहिसर आणि भांडुप यांचा समावेश आहे. येथे ५०-५० जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार होण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनीही घोषणा केली होती की शिवसेना, युबीटी आणि मनसे मुंबईबाहेरही निवडणूक लढवतील. मुस्लिम बहुल भागातही याच फॉर्म्युल्यानुसार जागा वाटल्या जातील. राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांचा पक्ष काँग्रेससोबत युती करणार नाही. युबीटी आणि मनसेचा मुंबई, ठाणे, नाशिक आणि कल्याण-डोंबिवलीमध्ये प्रभाव आहे. आता ठाकरे आपल्या भावांसोबत महायुती युती लढवतील की महाविकास आघाडीलाही सोबत ठेवतील हे पाहायचे आहे. काँग्रेसने राज ठाकरेंशी कोणताही वाद नसल्याचे म्हटले आहे. मुंबईतील बीएमसी निवडणुका उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. बीएमसीमधील सत्ता कमी झाल्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी पुढचा मार्ग कठीण होऊ शकतो. ठाकरे सध्या बीएमसी निवडणुकीसाठी रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. तर दुसरीकडे संजय राऊत, अनिल परब आणि अनिल देसाई सारखे नेते रणनीती आखत आहेत.