Devendra Fadnavis News:
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपमध्ये मोठी जबाबदारी स्वीकारून दिल्लीला जाणार असल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत असतात, याबाबत वेळोवेळी चर्चा होतात. राज्यात गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतरही देवेंद्र फडणवीस दिल्लीत केंद्रीय मंत्री होणार असल्याच्या चर्चा झाल्या होत्या. पण त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद देण्यात आले. यानंतरही एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत फडणवीस यांनी दिल्लीत मंत्रीपदाच्या ऑफर आणि चर्चांवर भाष्य केलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत मंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चा आहे, असे विचारले असता, फडणवीस म्हणाले की, जोपर्यंत मला महाराष्ट्रात काम करावे लागेल तोपर्यंत मी इथेच काम करेल.ज्या दिवशी मी म्हणेन की मला दिल्लीत काम करायचे आहे, तोपर्यंत मी दिल्लीत काम करेन. ज्या दिवशी मी म्हणेन की मला दोन्ही ठिकाणी काम करायचे नाही, त्यानंतर मी घरी जाईन. हा भाजप आहे. प्रश्न संपला आहे.”
VHP on Garba Event 2025 : कपाळावर कुंकू, गोमुत्र आणि आधार कार्ड…; गरबा खेळण्यासाठी नियमावली जाहीर
मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आले की, “तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जवळ आहात आणि आरएसएसशी जवळचे संबंध आहेत, तर तुमची पुढची मोठी बढती कधी होणार?” तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पंतप्रधानांशी संबंधित असलेल्यांना हे माहित आहे की पंतप्रधान मोदींसाठी कोणी आवडीचं नाही आणि नावडतेही नाही. पण जर कोणी चूक केली तर त्याला फटकारले जाते आणि मी चूक केली तर मलाही फटकारले जाते.”
काही दिवसांपूर्वी तुमचे छत्रपती शिवाजी महाराजांंच्या प्रतिमेला फूले वाहतानाचा एक फोटो राज्यभरात प्रसिद्ध झाला होता. पण त्यावरून तुमच्याच सहकाऱ्यांना दु:ख झाले. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, ज्यांच्या मनात जातीवाद आहे, त्यांना जास्त त्रास झाला. त्यांना जास्त मिर्ची लागली. मग त्यांना मिर्ची लागली तर मी काय करू, अशी उपहासात्मक प्रतिक्रीयाही फडणवीस यांनी यावेळी दिली. पण माझ्या कोणत्याही सहकाऱ्यांना त्रास झाला नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
दरम्यान, पोलिसांनी तुम्हाला एक यादी दिली होती, त्यात मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना आर्थिक मदत करणाऱ्या नेत्यांची नावे होती. यात तुमच्या मंत्रिमंडळातील काही नेत्यांचीही नावे होती. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, जरांगे पाटील यांना कोण कोण मदत करतय याची लिस्ट माझ्याकडे येत राहते. पण त्यावर मी काहीच बोलू इच्छित नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील आमदार, खासदार आणि मंत्री जरांगे पाटील यांना पैसे देऊन मदत करत आहे, हे योग्य आहे की अयोग्य यावर बोलताना फडणवीसांनी सांगितलं, सध्या तरी याबाबत माझ्याकडे कोणतीही माहिती आलेली नाही. असं म्हणत त्यांनी या प्रश्नाला बगल दिली.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत तुमचं नाते कसं सुरू आहे. शिंदेंच्या खात्यातील सर्व फायली आधी तुमच्याकडे येतात आणि मग पुढे जातात, तुमच्यात फाईल युद्ध सुरू आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, सर्वांसोबत माझं नातं चांगलेच सुरू आहे. पण माझ्याकडे कोणतीही फाईल थांबत नाही.