विश्व हिंदू परिषदेने गरबा इव्हेंटमध्ये मुस्लीम मुलांना नो एन्ट्री करुन हिंदू मुलांसाठी नियमावली जारी केली (फोटो- सोशल मीडिया)
VHP on Garba Event 2025 : गुजरात : नवरात्रोत्सव सुरु झाला असून संपूर्ण देशामध्ये मोठ्या उत्साहात सण साजरा केला जातो आहे. नवरात्रीमध्ये गरबा आणि दाडिंया इव्हेंट आयोजित केले जातात. गुजरातमध्ये याचे प्रमाण जास्त असते. नवरात्रीमधील या कार्यक्रमांमध्ये केवळ हिंदू लोकांनी सहभागी व्हावे या मागणीने जोर धरला आहे. यावरुन वाद देखील निर्माण होताना दिसत आहेत. याबाबत आता विश्व हिंदू परिषदेने काही नियम जारी केले आहेत. यामध्ये कपाळावर गंध आणि टिकली असणे बंधनकारक करण्यात आले असून आधार कार्ड बघून तरुण-तरुणींना कार्यक्रमामध्ये सहभागी करावे अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे.
विश्व हिंदू परिषदेने मागणी केली आहे की, गरबा मंडपात फक्त हिंदूंनाच प्रवेश दिला जाईल. प्रवेशद्वारावर आधार कार्ड सादर करणे अनिवार्य असेल आणि पुरुषांना त्यांच्या कपाळावर तिलक लावणे आवश्यक असेल. “लव्ह जिहाद” सारख्या घटना रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. विश्व हिंदू परिषदेच्या म्हणण्यानुसार, गरबा हा केवळ नृत्य, गाणे किंवा मनोरंजनाचा प्रकार नाही तर देवी भगवतीची पूजा आणि आराधना करण्याचा एक पवित्र प्रकार आहे. संघटनेने गरबा आयोजकांसाठी सल्ला जारी केला आहे, ज्यामध्ये अनेक कडक सूचना आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याबाबत विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्रीराज नायर म्हणाले की, “मूर्तिपूजेवर विश्वास नसलेल्यांनी अशा पवित्र कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ नये.” सल्लागारानुसार, आयोजकांनी हे सुनिश्चित करावे की प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाने प्रथम आपले डोके टेकवावे आणि देवीच्या प्रतिमेसमोर प्रार्थना करावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे.
गोमूत्र शिंपडणे अन् देखरेख करणे
गरबा खेळण्यासाठी येताना हिंदू असणे महत्त्वाचे असल्याचे मत विश्व हिंदू परिषदेने व्यक्त केले आहे. नागपूरमधील विश्व हिंदू परिषदेच्या विदर्भ प्रांताचे सरचिटणीस प्रशांत तित्रे यांनी आणखी एक नियम याबाबत सांगितला आहे. यामध्ये असे म्हटले आहे की गरबाला उपस्थित राहणाऱ्या लोकांना शुद्धीकरणासाठी गोमूत्र शिंपडले जाईल. त्यांनी असेही स्पष्ट केले की विहिंप आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते गरबा मंडपांमध्ये उपस्थित राहतील आणि या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी त्यांचे बारकाईने निरीक्षण करतील. त्यांनी सांगितले की ते कोणत्याही परिस्थितीत गरबाचे पावित्र्य भंग होऊ देणार नाहीत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भोपाळमध्येही कार्यकर्त्यांनी गरब्यात म्हटले की जिहादींना गरबाला उपस्थित राहण्यास मनाई आहे. शिवाय, मध्य प्रदेशातील रतलाममध्ये काझींनी मुस्लिम समुदायाला गरबाला उपस्थित न राहण्याचे आवाहन केले.
पत्रकारांशी बोलताना, VHP विदर्भ प्रांत संयोजक नवीन जैन यांनी या नियमांमागील कारण स्पष्ट केले. ते म्हणाले, “गेल्या काही वर्षांत असे दिसून आले आहे की गरबा कार्यक्रम ‘लव्ह जिहाद’चे साधन बनत आहेत, जिथे हिंदू मुलींना लक्ष्य केले जाते. काही लोक या कार्यक्रमांमध्ये विशिष्ट मानसिकतेसह येतात, ज्यामुळे आपल्या बहिणींसाठी समस्या निर्माण होतात आणि आपल्या श्रद्धेला धक्का पोहोचतो.” गरबा स्थळांवर कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ आणि धूम्रपान पूर्णपणे बंदी घालण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली.