karnataka police ganpati bappa arrest
कर्नाटक : राज्यासह देशभरामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह आहे. मोठ्या जल्लोषामध्ये गणरायाचे आगमन आणि स्वागत करण्यात आले. तसेच समपयोगी अनेक उपक्रम, देखावे यामुळे सर्वच चैतन्यमयी वातावरण निर्माण झाले आहे. कर्नाटकामध्ये मात्र उत्सवाला गालबोट लावण्याचा प्रकार घडला आहे. कर्नाटकमधील एका गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान तणावाची परस्थिती उद्भवली. यामुळे पोलिसांनी थेट गणपती बाप्पांची मूर्तीच ताब्यात घेतली आणि गाडीमध्ये ठेवली. याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. सर्वांनी कर्नाटक सरकारवर ताशेरे ओढले आहेत. तसेच गणपती बाप्पाच्या भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
नेमकं प्रकरण काय?
कर्नाटकमध्ये गणेशोत्सवाला गालबोट लागले आहे. कर्नाटकमधील मंड्या जिल्ह्यात विसर्जन मिरवणूकीदरम्यान ही घटना घडली. मंड्या जिल्ह्यातील नागमंगला येथे बुधवारी (दि.11) रात्री आठ वाजता गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. त्यानंतर दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडल्या. यामुळे परिसरामध्ये एकच खबराट आणि तणाव निर्माण झाला होता. कर्नाटक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मोठा फौजफाटा उभारला. परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यासाठी पोलिसांनी काहींना अटक देखील केली. मात्र यावेळी विसर्जन मिरवणुकीतील गणेश बाप्पांची मूर्ती पोलीसांनी ताब्यात घेतली. पोलिसांनी मूर्ती उचलून व्हॅनमध्ये ठेवण्यात आली. याचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कर्नाटकमधील घटनेचे पडसाद महाराष्ट्रामध्ये देखील उमटून असून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. कर्नाटकातील काँग्रेस सरकावर महायुतीच्या नेत्यांनी हल्लाबोल केला आहे.
महाराष्ट्रातील राजकारण्यांची जोरदार टीका
कर्नाटकमध्ये गणपती बाप्पाच्या मूर्तीची एकप्रकारे अवहेलना केली आहे. मूर्तीला उचलून थेट पोलीस वाहनामध्ये ठेवण्यात आले. यावरुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या लोकांनी कर्नाटकमध्ये गणरायाचे उत्सव बंद करण्याचं काम केलं आहे. कर्नाटकमध्ये गणपती बाप्पाला अटक करण्या काम काँग्रेस सरकारने केलंय. गणेशोत्सवात गणपती बाप्पांसोबत हे असं करता तुम्ही, कुठे फेडणार हे पाप,’ असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसला विचारला आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सोशल मीडियावर याचे फोटो शेअर करत रोष व्यक्त केला आहे. ‘महाराष्ट्रातील जनता हे दृश्य कधीच विसरणार नाही! कर्नाटक सरकारचा तीव्र निषेध!!!’ असा रोष देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
Horrible❗️Height of tyranny ❗️
People of Maharashtra will never forget and forgive this visual !
We strongly condemn Karnataka’s Congress Government!!!
महाराष्ट्रातील जनता हे दृश्य
कधीच विसरणार नाही!
कर्नाटक सरकारचा तीव्र निषेध!!!#बाप्पा_विरोधी_कांग्रेस #AntiGaneshaCongress… pic.twitter.com/sPXEq4bd45— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 14, 2024