Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganesh Naik Bungalow Fire : मुंबईत खळबळ! वनमंत्री गणेश नाईक यांच्या ‘पावन गड’ बंगल्यात अचानक आग; जीवितहानी टळली

Ganesh Naik Bungalow Fire : मुंबईतील मंत्रालयासमोरील वनमंत्री गणेश नाईक यांच्या 'पावन गड' या शासकीय बंगल्यात अचानक आग लागल्याची घटना घडली.एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 11, 2026 | 03:08 PM
Fire Breaks Forest Minister Ganesh Naik's Government Bungalow in Mumbai ( मुंबईतील वनमंत्री गणेश नाईक यांच्या शासकीय बंगल्यात आग ) फोटो सौजन्य AI

Fire Breaks Forest Minister Ganesh Naik's Government Bungalow in Mumbai ( मुंबईतील वनमंत्री गणेश नाईक यांच्या शासकीय बंगल्यात आग ) फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • वनमंत्री गणेश नाईक बंगल्यामध्ये उपस्थित नव्हते  
  • या घटने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही 
  • शॉर्ट सर्किट हेच आगीचे कारण आहे का, याचीही चौकशी केली जाणार  
Ganesh Naik Bungalow Fire : मंत्री मंडळातील जेष्ठ नेते वनमंत्री गणेश नाईक यांच्या ‘पावन गड’ या शासकीय बंगल्यात आज अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. एसीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही दुर्घटना घडली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून बंगल्यातून धुराचे लोट बाहेर पडत आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मिळालेल्या माहिती नुसार ही आग एसीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे लागली. मंत्रालया समोर ही शासकीय निवास्थान आहेत. याच ठिकाणी वनमंत्री गणेश नाईक यांचा ‘पावन गड’ हा शासकीय बंगला आहे.

वनमंत्री गणेश नाईक बंगल्यामध्ये उपस्थित नव्हते

ही आग ‘लेव्हल वन’ क्षमतेची असल्याचे सांगण्यात येत आहे. जेव्हां आग लागली, तेव्हा वनमंत्री गणेश नाईक बंगल्यामध्ये उपस्थित नव्हते. मात्र, या ठिकाणी इतर कर्मचारी होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन ते तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

मुंबईच्या मंत्रालयासमोर अनेक मंत्र्यांचे शासकीय बंगले आहेत. याच ठिकाणी राजकीय पक्षांची कार्यालये आहेत. मंत्री आदिती तटकरे, मंत्री नितेश राणे, मंत्री सचिन अहिर, मंत्री दादा भुसे अशा अनेक मंत्र्यांचे बंगले आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या प्रमुख पक्षांची कार्यालये आहेत. अशा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या परिसरामध्ये अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे.

#मंत्रालय के पास मंत्री गणेश नाईक के सरकारी बंगले “पवनगढ़” में लगी #आग!
#mumbai
#mantralaya
#maharashtra https://t.co/WaFWNHymM8
— MANOJ YADAV🇮🇳 (@ManojVedanta) November 11, 2026

या घटने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही

घटना स्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस यंत्रणा उपस्थित असून आगीवर नियंत्रण आण्यासाठी अग्निशमन दलाचे ४ गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दिवाळीच्या सुट्या असल्याकारणाने सर्व कर्मचारी सुट्टीवर आहेत. या मुळे या घटने कोणालाही गंभीर दुखापत झाले नाही. अशी माहिती समोर येत आहे.

Ghansoli Fire: घणसोलीत ‘अनधिकृत’ लाकूड वखारीला भीषण आग; अनर्थ टळला पण या ‘भस्मासुराला’ कोणाचा आशीर्वाद?

शॉर्ट सर्किट हेच आगीचे कारण आहे का, याचीही चौकशी केली जाणार

आगीमुळे या शासकीय बंगल्याचे किती नुकसान झाले आहे, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. ही आग नेमकी कशामुळे लागली, याचा तपास सुरू आहे. एसीमधील शॉर्ट सर्किट हेच आगीचे कारण आहे का, याचीही चौकशी केली जाणार आहे. या घटनेबाबत अधिक माहिती मिळण्याची प्रतीक्षा आहे.

या आधी सुद्धा शासकीय इमारतींना आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये सर्वात मोठी घटना ही २१ जून २०१२ रोजी घडली होती. मुंबई मंत्रालयात मोठी आग लागली होती. ही आग तत्कालीन मंत्री बाबनराव पाचपुते यांच्या चौथ्या मजल्यावरील केबिनमध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागली होती.

या आगीत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांची कार्यालये पूर्णपणे जळून खाक झाली होती. हजारो फाईल्स आणि महत्त्वाची कागदपत्रे नष्ट झाली होती. या आगीमध्ये मंत्रालयाच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले होते.

Kirit Somaiya: ‘MHADA च्या 110 फ्लॅट्सवर घुसखोर बांग्लादेशींचा कब्जा…’, किरीट सोमैयांचा ‘लँड जिहाद’ आरोप, काय आहे प्रकरण

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: गणेश नाईक यांच्या बंगल्याला कुठे आग लागली?

    Ans: मंत्रालयासमोरील 'पावन गड' या त्यांच्या शासकीय बंगल्यात आग लागली.

  • Que: बंगल्याला आग कशामुळे लागली?

    Ans: एसीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अधिकृत तपासानंतरच आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल.

  • Que: गणेश नाईक बंगल्यात उपस्थित होते का?

    Ans: आग लागली तेव्हा वनमंत्री गणेश नाईक बंगल्यात उपस्थित नव्हते.

Web Title: Ganesh naik pavan gad government bungalow fire mumbai sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • BJP
  • Eknath shinde Shivsena
  • Ganesh Naik
  • Maharashtra Goverment
  • Mantralaya

संबंधित बातम्या

Sanjay Raut: भाजपसोबत जाणे म्हणजे लाचारी, स्वाभिमान सोडणे! संजय राऊतांचा शिंदे गटावर घणाघात
1

Sanjay Raut: भाजपसोबत जाणे म्हणजे लाचारी, स्वाभिमान सोडणे! संजय राऊतांचा शिंदे गटावर घणाघात

Hasan Mushrif ED Case : 2700 पानांची तक्रार कुठे गेली? हसन मुश्रीफ प्रकरणावरून काँग्रेसनं भाजपला घेरलं
2

Hasan Mushrif ED Case : 2700 पानांची तक्रार कुठे गेली? हसन मुश्रीफ प्रकरणावरून काँग्रेसनं भाजपला घेरलं

Mumbai Housing Project: मूळ मुंबईकरांना मुंबईतच हक्काची घरे मिळणार! बीडीडी चाळ पुनर्विकासातील ५५७ रहिवाशांना सदनिकांचे वाटप
3

Mumbai Housing Project: मूळ मुंबईकरांना मुंबईतच हक्काची घरे मिळणार! बीडीडी चाळ पुनर्विकासातील ५५७ रहिवाशांना सदनिकांचे वाटप

Ulhasnagar Metro Project: मेट्रोचे श्रेय भाजपचे की शिवसेनेचे? शहाड ब्रिजवरूनही राजकीय संघर्ष; कुमार आयलानी विरुद्ध कमलेश निकम
4

Ulhasnagar Metro Project: मेट्रोचे श्रेय भाजपचे की शिवसेनेचे? शहाड ब्रिजवरूनही राजकीय संघर्ष; कुमार आयलानी विरुद्ध कमलेश निकम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.