"...तर गावठाण कोळीवाड्यातील भूमिपुत्र महायुतीच्या विरोधात मतदान करतील"; मुंबई आगरी सेनेचा महायुतीवर हल्लाबोल
रायगड /किरण बाथम :- महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वी महायुतीच्या महाराष्ट्र सरकारकडून शेकडो निर्णय घेण्यात आले. मात्र राज्य सरकारने मुंबईतील मूळ भूमिपुत्रांकडे दुर्लक्ष केलं आहे. आगरी सेना मुंबई अध्यक्ष श्री. जयेंद्रदादा खुणे यांनी कोळीवाडयांच्या विकासाकरिता स्वतंत्र ” गावठाण विकास महामंडळ ” स्थापन करण्यात यावी अशी मागणी सरकारकडे केली होती. मात्र त्यांच्या या मागणीकडे राज्य शासनाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे महायुतीच्या सरकारवर नाराज असलेल्यामुळे मुंबई आगरी सेनेच्या वतीने जयेंद्रदादा खुणे यांनी मूळ भूमिपुत्र असलेल्या आगरी, कोळी, ईस्ट इंडियन,भंडारी,आदिवासी समाजावतीने गावठाणांचा विकास न केल्यामुळे लोकायुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील गावठाण कोळीवाड्याचा विकास न केल्यामुळे मूळ भूमिपुत्र हे महायुतीच्या विरोधात मतदान करतील असं जयेंद्रदादा खुणे यांनी सत्ताधारी सरकारला इशारा दिला आहे.
हेही वाचा-विधानसभेसाठी मनसे ॲक्शन मोडवर!अमित ठाकरे ‘या’ मतदारसंघातून देणार लढत?
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड येथील गावठाण कोळीवाडयांच्या विकासासाठी स्वतंत्र ” गावठाण विकास महामंडळ ” स्थापन करून या कोळीवाड्यातील गावांचा, पाड्यांचा, घरांचा व जमिनीचा योग्य तो विकास व्हावा अशी या भूमीपुत्रांची मागणी आहे. हीच बाब लक्षात घेत जयेंद्रदादा खुणे यांनी मंत्रालय येथे निवृत्त न्यायमूर्ती श्री. व्हि.एम. कानडे साहेब ( लोकआयुक्त , महाराष्ट्र राज्य ) यांच्याकडे धाव घेतली. याबाबत. लोकआयुक्त कार्यालयात बुधवारी दुपारी सुनावणी ठेवण्यात आली होती. या सुनावणीच्या वेळी संबंधित विविध खात्यातील अनेक शासकीय – प्रशासकीय अधिकारी सुनावणीला उपस्थित होते. महाराष्ट्राचे लोक आयुक्त निवृत्त न्यायमूर्ती मा. श्री. व्हि. एम. कानडे यांच्यासमोर गावठाण कोळीवाडयांच्या विकासासंदर्भात सकारात्मक चर्चा विनिमय करण्यात आली.
हेही वाचा- बच्चू कडू अन् मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; 4 तारखेला करणार गौप्यस्फोट
भांडुप, मुलुंड, कांजूर येथे मिठागराच्या जागेत धारावीकरांचे पुनर्वसन करण्यास येथील भुमीपुत्रांचा विरोध आहे. जर या ठिकाणी लाखो लोकांची वस्ती झाली तर मूळ भूमिपुत्रांच्या गावठाण कोळीवाड्यात खाडीतील पाणी घुसून घरं उध्वस्त होतील. गावठाण कोळीवाड्यातील मूळ भूमिपुत्रांची वाढती कुटुंबे आणि राहण्यास अपुरी जागा, एका मजल्यावर दुसरा मजला चढवायचा असेल तर मूळ जमीन मालकांच्या घरांच्या गावठाणतील बांधकामांना महानगर पालिकेमुळे होणारा त्रास आणि अपुऱ्या नागरीसुविधांमुळे भूमिपुत्रांची होणारी गैरसोय होत आहे.त्यामुळे येथे धारावीकरांना जागा देण्याअगोदर मूळ भूमिपुत्रांच्या गावठाणांचा विकास करावा,अशी मागणी जयेंद्रदादा खुणे यांनी केली. गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी गावठाण कोळीवाडयांच्या विकासासंदर्भात एकदाही आम्हाला बोलावले नाही असा आरोप जयेंद्र दादा यांनी केला. पुढे ते असंही म्हणाले की, याविषयाबाबत बैठका घेतल्या नाही म्हणूनच गावठाण कोळीवाडयांचा विकास अजूनही रखडला आहे. दरम्यान या सगळ्य़ा प्रकणावर पुढील सुनावणी जानेवारी महिन्यात होईल असं लोकआयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.