
Gokul Election: अध्यक्ष निवड प्रक्रियेत मोठा ट्वीस्ट; महायुतीच्या नेत्यांची गोवा-कोल्हापूर फेऱ्या वाढल्या, काही तरी मोठं शिजतंय
Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवड प्रक्रियेतील (Gokul Election) फोडाफोडीला वेग आला आहे. महाविकास आघाडीने निवडणूकीत सरसी घेतली असली तरी राज्यात सत्ते असलेल्या महायुती सरकारने आपला अध्यक्ष बसावा म्हणून हातपाय मारायला सुरुवात केली आहे.
अशात सहलीवर असलेल्या महायुतीच्या संचालकांच्या भेटीसाठी विशेष विमानाने महायुतीचे नेते गोव्याला पोहोचले व भेट घेऊन थेट कोल्हापुरात दाखल ही झाले. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या संचालकांना नेमक्या काय सूचना केल्या? याची चर्चा रंगली आहे. यामध्ये पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विनय कोरे, चंद्रदीप नरके, माजी खासदार संजय मंडलिक यांचा समावेश होता. दरम्यान, गोकुळ अध्यक्ष निवडीबाबत पत्रकार परिषद घेऊन निर्णय घोषित करणार आहे.
तसं पाहता, गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगली असून गोकुळच्या निवडणुकीमध्ये आमदार सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने 25 पैकी 13 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. मात्र, अध्यक्षपदाच्या निवडीसाठी 14 संचालकांचा कोरम पूर्ण होणे गरजेचं असल्याने अध्यक्षपदाची निवडणूक नियमावलीमध्ये अडकणार का? अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे गुरुवारी (29 ऑक्टोबर) होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी महायुतीचे संचालक उपस्थित राहणार की गैरहजर राहणार याची सुद्धा चर्चा रंगली आहे.
जर महायुतीकडून या बैठकीला दांडी मारली गेली, तर गोकुळच्या अध्यक्षपदाचे त्रांगडं कायम राहण्याचे चिन्हे आहेत. अध्यक्ष निवडीसाठी उपस्थित राहायचं की नाही याबाबत सुद्धा निर्णय घेतला जाणार आहे. सत्ताधारी आघाडीचे नेते सतेज पाटील यांनी महायुतीच्या नेत्यांसोबत फोनवरून चर्चा केली असली तरी मात्र त्यांची अजून प्रत्यक्ष गाठभेट झालेली नाही.
Raj Thackeray : आज संध्याकाळी राज गर्जना, स्थानिकांची भेट घेत ठाकरी शैलीत दिलं मोठं आश्वासंन
दरम्यान, गोकुळच्या अध्यक्षपदावरून जरी चर्चा सुरू असली, तरी या अध्यक्ष निवडीमागून जिल्हा बँकेतील निवडणुकीचं सुद्धा राजकारण रंगलं आहे. महायुतीला ज्या पद्धतीने फटका बसला आहे ते पाहता कोल्हापूर जिल्हा बँकेची निवडणूक सुद्धा सांगली जिल्हा बँकेच्या धर्तीवर बिनविरोध केली जाईल अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेतील समीकरणे साधण्यासाठी आणि वर्चस्व कायम राहावं यासाठी मुश्रीफ गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारे खोडा न घालता जिल्हा बँकेमधील मार्ग प्रशस्त करतील अशीही चर्चा कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळामध्ये आहे.
Ans: आमदार सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने २५ पैकी १३ जागा जिंकल्या आहेत.
Ans: दिलेल्या माहितीनुसार, अध्यक्षपदाच्या निवडीसाठी १४ संचालकांची उपस्थिती आवश्यक आहे.
Ans: सतेज पाटील यांच्या आघाडीकडे १३ संचालक असल्याने आणि अध्यक्ष निवडीसाठी १४ जणांचा कोरम आवश्यक असल्याने निवड प्रक्रियेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.